You are currently viewing Zudio Case Study : झुडिओत कपडे स्वस्त का मिळतात?
Zudio Case Study Marathi

Zudio Case Study : झुडिओत कपडे स्वस्त का मिळतात?

मुंबई : (Zudio Case Study) स्वस्तात मस्त कपडे खरेदी करायचे असेल आणि तेही मॉलमधून तर सर्वात आधी डोक्यात विचार येतो झुडिओचा. सर्वसामान्याना परवडणाऱ्या किंमतीत चांगल्या दर्जाचे कपडे विकून ब्रँडेड आउटलेटच्या यादीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या स्वस्तात कपडे आणि बाकीचे उत्पादनं विकूनही झुडिओ कोट्यावधींचा नफा कमावतोय. हे कसं शक्य आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तर त्यांच्या बिजनेस मॉडेलमध्ये दडलेले आहे. स्वस्तात कपडे विकणं झुडिओला कसं परवडतं ते  या केस स्टडीमध्ये आपण जाणून घेऊया.

व्यवसायाची पद्धत

कोणताही व्यवसाय सशस्वी होण्यामागे तो कोणत्या पद्धतीने केला जातोय याचाच सर्वात मोठा वाटा असतो. ज्याला आपण बिजनेस स्ट्रॅटेजी म्हणतो.  कोणताही व्यवसाय मोठा होण्यामागे त्याचा युएसपी (Unique Selling Proposition) म्हणजे इतरांपेक्षा तुम्ही काय वेगळं देतायं किंवा तुमच्या व्यवसायात इतरांपेक्षा वेगळ काय हे महत्त्वाचं आहे.

झुडिओचे युएसपी आहे कमी किंमतीत फॅशनेबल आउटफीट! झुडिओ हा टाटाचा ब्रॅँड आहे. भारतात टाटाच्या सर्वच उत्पादनाला दर्जात्मक मानक आहे. सर्वसान्यांसाठी टाटाने जी उत्पादने आणि सेवा दिली आहे ती विश्वासाच्या पातळीवर खरी उतरल्याचे आपण जाणतो. असं असलं तरी झुडिओच्या पॅरेंट कपनीचे नाव ट्रेंट असं आहे. ही कंपना भारतातल्या रिटेल क्षेत्रातील नामांकित कंपनीपैकी एक आहे.

झुडिओ त्याच्या मार्केटींगवर विशेष खर्च करत नाही. रस्त्याच्या कडेला किंवा चौकात झुडिओचे होर्डिंग तुम्ही कधीच पाहिले नसेल. याशिवाय कंपनी आपले उत्पादने ऑनलाईन विकत नाही. यामागचे कारण म्हणजे झुडिओ कमी प्रॉफिट मार्जीनमध्ये काम करते. ऑनलाईन खरेदीमध्ये प्रॉडक्ट परत करण्याच्या भानगडीमध्ये शिपींग चार्च मोठ्या प्रमाणात लागतो. याचा फटका कंपनीला बसतो. त्यामुळे झुडिओने ही भानगडच ठेवली नाही.

सद्य स्थितीमध्ये झुडिओ जितके स्वस्तात कपडे विकतेय तितके स्वस्त मार्केटमध्ये कोणीही नाही. थोडक्यात काय तर झुडीओला थेट स्पर्धक कोणीही नाही. स्वस्तात कपडे आणि इतर गोष्टी मिळत असल्याने त्याचा मौखीक प्रचार मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय टाटाचा ब्रँड असल्याने लोकांना अधिक विश्वास आहे.

झुडिओचा सगळ्यात जास्त पैसा जर कुठे वाचत असेल तर तो म्हणजे त्याचे स्टोअरचे भाडे. झुडिओ स्वतः आपले स्टोअर खरेदी करत नाही तसेच त्याचे भाडेही देत नाही. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?

येथे वाचतो सर्वाधिक पैसै

झुडिओ फ्रेंचायसी मॉडेलवर चालतं. एखादी व्यक्ती झुडिओची फ्रेंचायसी घेते त्याच्या स्टोअरमध्ये काम करणारे लोकांना पगार मात्र झुडिओ देतो. याशिवाय झुडिओ त्याच्या नफ्यातला काही हिस्सा फ्रेंचायसीला देतो. याचा फायदा दोघांनाही होतो. शोरूम खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च किंवा शोरूमचे भाडे यामध्ये बचत होत असल्याने झुडिओला त्याची लागत काढण्यासाठी उत्पादनांचे भाव वाढवण्याची गरज नाही.

झुडिओचा कोणीही ब्रँड एम्बॅसिटर नाही. ब्रँड एम्बॅसिटरला द्यावी लागणारी कोट्यावधीची फी झुडिओ वाचतोय. झुडिओची वेबसाईटसुद्धा अगदीच साधी आहे. अनावश्य खर्च टाळण्याकडे कंपनीचा कल आहे. हा पैसा कंपनी नवीन स्टोअर सुरू करण्यामध्ये गुंतवते. झुडिओचे भारतात एकुण 551 स्टोअर आहे.

या गोष्टी आहेत झुडिओसाठी जमेच्या बाजू

उत्पादन श्रेणी विस्तारत आहे – त्यांच्या ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी, नवीन आणि रोमांचक ऑफर समाविष्ट करण्यासाठी Zoodio नियमितपणे त्याची उत्पादन श्रेणी वाढवत आहे. ही रणनीती कंपनीला उद्योगात संबंधित राहण्यास तसेच फॅशन पर्याय शोधत असलेल्या नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यास सक्षम करते. त्याच्या उत्पादन लाइनचा विस्तार करून, Zoodio त्याच्या ग्राहकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि रोमांचक असल्याचे सुनिश्चित करतो.

स्टोअर विस्तार – Zoodo च्या स्टोअर्सचा विस्तार करण्याच्या धोरणामुळे ब्रँडला संपूर्ण भारतातील अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये नवीन स्टोअर्स उघडून, Zoodio ने त्याच्या ब्रँडची उपस्थिती वाढवली आहे आणि त्याची उत्पादने अधिक लोकांपर्यंत पोहोचवली आहेत. Zoodio च्या वाढीसाठी आणि यशासाठी ही विस्ताराची रणनीती महत्त्वपूर्ण ठरली आहे, ज्यामुळे ब्रँडला अधिक ग्राहकांशी कनेक्ट होण्यास आणि बाजारपेठेतील त्याचे स्थान मजबूत करण्यात मदत झाली आहे.

सीझनल कलेक्शन – झूडिओ आपल्या ग्राहकांच्या बदलत्या फॅशन प्राधान्यांनुसार हंगामी निवडी ऑफर करतो. उन्हाळ्याच्या आवश्यक वस्तूंपासून ते हिवाळ्यातील कपड्यांपर्यंत, Zoodio चे हंगामी संग्रह ग्राहकांना प्रत्येक हंगामासाठी योग्य पोशाख शोधू शकतील याची खात्री देते. ही रणनीती हमी देते की ग्राहक नेहमीच फॅशनेबल आणि ऋतूनुसार योग्य पोशाख निवडू शकतात, कंपनीला वर्तमान आणि संबंधित राहण्यास मदत करते.

(टिप- हा लेख माहिती हेतूने देण्यात आला आहे. ब्रँन्डचे प्रमोशन हा उद्देश नाही)

अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply