You are currently viewing Zomato case Study : झोमॅटो आणि स्विगी पैसे कसे कमावतात?
झोमॅटो आणि स्विगी पैसे कसे कमावतात?

Zomato case Study : झोमॅटो आणि स्विगी पैसे कसे कमावतात?

Zomato case Study मुंबई,  फुड डिलेव्हरी सर्विस प्रोव्हाईड करणारे झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांकडे सक्सेसफु स्टार्टअप म्हणून पाहिले जाते. आज आपण या स्टार्टअपची केस स्टडी करणार आहोत.   तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का? की, झोमॅटो आणि स्विगी (Zomato Swiggy Case Study) या कंपन्या इतका डिस्काउंट देऊनही प्रॉफिट कशा कमावतात? कंपन्या खरंच प्रॉफीट कमवत आहेत की फक्त इनवेस्टरचा पैसा उडवत आहेत? तसचं, झोमॅटो स्विगीमुळे रेस्टोरंटला किती फायदा होतोय? झोमॅटो आणि स्विगीचा नेमका बिजनेस मॉडल आहे तरी काय? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा. या व्हिडीओत ऑनलाईन डिलेव्हरी कंपन्या नेमक्या कसा पैसा कमावतात याची कल्पना येईल.

झोमॅटो आणि स्विगी या ऍपवरून जेव्हा तुम्ही फुड ऑर्डर करता तेव्हा तुम्ही ‘ग्रेट ऑफर्स’ हे फिलटर नक्कीच लावत असाल. हे फिलटर लावताच तुम्हाला ज्या रेस्टोरंटने सर्वाधीक डिस्काउंट दिला आहे त्यांची लिस्ट दिसते. मग प्रश्न असा पडतो की, इतका ऑफर देणं त्यांना कसं काय परवडतं? याला एक उदाहरणावरून समजून घेऊया. जेव्हा 40 टक्के डिस्काउंट बद्दल सांगितल्या जातं तेव्हा त्यासोबतच काही अटी देखील असतात, जसं की ‘मीनीमम ऑर्डर व्हॅलू’. म्हणजेच जेव्हा तुम्ही ठरावीक किंमतीचा ऑर्डर  करता तेव्हाच हे डिस्काउंड तुम्हाला दिलं जातं.

दुसरं म्हणजे या डिस्काउंटची रक्कम जास्तीत जास्त 50 ते 80 रूपये असते.  म्हणजे तुमची ऑर्डर व्हॅलू जर एक हजार रूपये आहे आणि 40 टक्के डिस्काउंट जर अप्लाय केला जात असेल तर तुम्हाला ते फुड आयडीअली 600 रूपयांना पडायला पाहिजे पण जास्तीत जास्त 80 रूपयांपर्यंत सूट मिळत असल्याने  ते तुम्हाला 920 रूपयांना पडेल. म्हणजे तुम्हाला जो डिस्काउंट मिळालेला आहे तो आठंच टक्के आहे हे लक्षात घ्या. 

आता वळूया दुसऱ्या मुद्याकडे. झोमॅटो आणि स्विगीवर जे रेस्टोरंट लिस्टेड आहेत ते पर ऑर्डरमागे या कंपन्यांना 25 ते 30 टक्के कमिशन देतात. आता हा पुर्ण डिस्काउंट रेस्टोरंटला स्वःताच्या खिशातून देणं परवडणारं नाही. म्हणून ते झोमॅटो स्विगीवर किंमती वाढवून लिस्टकरतात. म्हणजेच रेस्टोरंटमध्ये एखादी डिश जर 100 रूपयांना मिळत असेल तर झोमॅटोवर ती कदाचीत 120 रूपयांना किंवा त्यापेक्षा महाग मिळेल. शिवाय डाइन इन करण्यापेक्षा पार्सल देणं हे रेस्टोरंटला जास्त फायद्याचं आहे.

 मग प्रश्न असा पडतो की, रेस्टोरंटकडून 25 ते 30 टक्के कमीशम घेऊन झोमॅटो स्विगी प्रॉफीट कमावतात का? तर, उत्तर आहे नाही. कारण डिलेव्हरी बॉयचा पगार,कस्टमर केअर सर्विस, सॉफ्टवेअर आणि अशा अनेक गोष्टींसाठी खुप पैसा खर्च होतो. या कंपन्या आपला खर्च काढण्यासाठी रेस्टोरंटला ऍड रन करायला लावतात म्हणजेच जे रेस्टोरंट पैसे देऊन ऍड रन करतील त्यांचे नाव लिस्टमध्ये टॉपवर दिसेल.   

झोमॅटो आणि स्विगीचा मुख्य इनकम सोर्स

मित्रांनो झोमॅटो आणि स्विगीचा आणखी एक मोठा इनकम सोर्स आहे तो म्हणजे बिजनेस कंसल्टंसी सर्वीस. या दोन्ही कंपन्यांकडे रेस्टॉरंट इंडस्ट्रीचा मोठा डेटा आहे. याचा वापर करून ते रेस्टोरंट्सला बिजनेस वाढवण्यासाठी कस्टमाईज प्लॅन तयार करून देतात. जसे की त्यांच्या एरीयात सर्वात जास्त कोणत्या डिशची डिमांड आहे. त्या डिशची किंमत किती ठेवावी, वैगरे वैगरे.

सध्या ऑनलाईन फुड डिलेव्हरी ऍपमुळे रेस्टोरंट सेक्टरमध्ये आणखी एका बिजनेस मॉडलची भर पडली आहे. ती म्हणजे क्लाउड किचन. क्लाउड किचन म्हणजे असं रेस्टोरंट जे डाइन इन सर्वीस न देता फक्त ऑनलाईन डिलेव्हरी प्रोव्हाईड करते.

या बिजनेस मॉडेलमुळे रेस्टोरंट सेटअप करण्याचा खर्च वाचतो. त्यामुळे कर्टमरला पॉकेट फ्रेंडली फुड प्रोव्हाईड करणं रेस्टोरंटला परवडतं. शिवाय क्लाउड किचन एखादी व्यक्ती घरूनसुद्धा सुरू करू शकते.

आधी सांगितल्याप्रमाणे झोमॅटो आणि स्विगीकडे रेस्टोरंट इंडस्ट्रीचा मोठा टेडा आहे. होऊ शकते की भविष्यात ते स्वःताची रेस्टोरंट चैनही काढतील. याच कारणामुळे इव्हेस्टरही त्यांच्यावर पैसा लावत आहेत.

 फुड डिलेव्हरीचे दुसरे नाव आहे झोमॅटो

आज झोमॅटो हे फक्त एक नाव नाही तर ते फुड डिलेव्हरीचे दुसरे नाव बनले आहे. ही कंपनी आता फक्त स्कॅन केलेल्या मेनूसाठी नाही तर बहुतेक लोकांसाठी त्यांच्या परिपूर्ण जेवणाचा स्रोत बनली आहे.

जेव्हा Zomato ला मिळाले पहिले फंडिंग

कोणतीही कंपनी फंडिंगशिवाय चालू शकत नाही. यामध्ये झोमॅटो खूप लकी ठरला आहे. एके दिवशी दीपंदरला इन्फो एजचे संस्थापक संजीव बिखचंदानी यांचा ईमेल आला (ज्यांची मालकी Naukri.com आहे). सुरुवातीला दीपंदरने मार्केटिंग ईमेल असल्याचे समजून त्याकडे जवळजवळ दुर्लक्ष केले. पण शेवटी दीपंदर संजीवला भेटला.

संजीवने कंपनीतील 33 टक्के इक्विटी स्टेकच्या बदल्यात झोमॅटोला $1 मिलियनचा पहिला निधी दिला. YourStory च्या रिपोर्टनुसार, हा करार अवघ्या आठ मिनिटांत झाला. त्यानंतर झोमॅटोने मागे वळून पाहिले नाही.

आज Zomato ने भारताची खाण्याची पद्धत बदलली आहे. रेस्टॉरंट मेनू स्कॅन करण्यापासून ते फूड डिलिव्हरीमध्ये मार्केट लीडर बनण्यापर्यंतचा कंपनीचा प्रवास खूपच रोमांचक राहिला आहे. Zomato ने भारतातील लाखो लोकांसाठी अन्न वितरण सुलभ, सोयीस्कर आणि प्रवेशयोग्य बनवले आहे.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

This Post Has One Comment

Leave a Reply