सुनील छेत्री हा भारतीय फुटबॉल संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. 

भारतीय संघाच्या कर्णधारासोबतच तो भारतातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. 

सक्रिय पुरुष फुटबॉलपटूंमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोच्या मागे आणि दिग्गज लिओनेल मेस्सीच्या पुढे दुसरा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय गोल करणारा खेळाडू आहे. 

3 ऑगस्ट 1984 रोजी आंध्र प्रदेशातील सिकंदराबाद येथे जन्मलेल्या सुनील छेत्रीला फुटबॉलचे बळकडू आई वडिलांकडूनच मिळाले.

छेत्रीने शाळेत फुटबॉलमध्ये प्रावीण्य मिळवले, परंतु त्याने कधीही व्यावसायिक फुटबॉलपटू बनण्याचा विचार नव्हता केला 

2001 मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या आशियाई स्कूल चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी त्याला भारतीय संघात बोलावण्यात आले. 

भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध फुटबॉल क्लबपैकी एक असलेल्या मोहन बागानने या स्पर्धेत सुनील छेत्रीची प्रतिभा पाहिली  

आगामी देशांतर्गत हंगामासाठी त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.