नितीन कामत हे झिरो दा या शेअर ब्रोकींग कंपनीचे फाउंडर आहेत.
अतिशय यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची जगभरात ओळख आहे.
नितीन कामत यांनी शुन्यातून विश्व निर्माण करून 30,000 कोटी रूपयांची कंपनी उभारली आहे.
2001 मध्ये नितीन एका कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होते. तिथे त्यांचा पगार 8,000 रूपये होता.
पगारातली काही रक्कम ते शेअर मार्केटमध्ये गुंतवायचे. त्यांनी शेअर मार्केटचे सखोल ज्ञान घेतले.
त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून सब ब्रोकर बनण्याचा निर्णय घेतला.
ब्रोकींग कंपन्या शेअर ट्रेडींगसाठी मोठी फी आकारत असल्याने अनेकांना ते परवडायचे नाही.
मार्केटमधला हा 'लूप होल' लक्षात घेत त्यांनी झीरो दा ही ब्रोकींग कंपनी उभी केली.