ज्यांचे इनकम म्हणजेच आय जास्त असते ते इनकम टॅक्स वाचवण्यासाठ अनेक पर्याय शोधत असतात. 

इनकम टॅक्स वाचवण्याचे अनेक मार्ग आहेत. 

एलआयसी प्रीमियम, ईपीएफ, पीपीएफ आणि पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने आयकरमध्ये सुट मिळते. 

पाल्यांची ट्यूशन फी देत असाल तर त्यामध्येदेखील आयकर परताव्यात सुट मिळते. 

होम लोनच्या निव्वळ रक्कमेवर फॉर्म 80 C अंतर्गत सुट मिळवते. यामध्ये 1,50,000 रूपयांची मर्यादा आहे. 

केंद्र सरकारच्या पेंशन स्किममध्ये गुंतवणूक केल्यास 80 CCD (B1) अंतर्गत जास्तीत जास्त 50,000 हजार रूपयांची सुट मिळू शकते.  

वैद्यकीय खर्चांवर 80DD 1B अंतर्गत 40,000 रूपयांपर्यंत सूट मिळू शकते. 

शैक्षणीक खर्च आणि घर भाड्यावर देखील मोठ्या प्रमाणात कर सवलत मिळते.