नुकत्याच सादर झालेल्या महायुतीच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या नोंदणीला आजपासून प्रारंभ झाला आहे. 

Created By- Chapa Kata Team

ज्या महिलांचे वय 21  ते  61 दरम्यान आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

Created By- Chapa Kata Team

योजनेच्या पहिल्याच दिवशी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी अनेक महिलांनी सेतू केंद्रावर गर्दी केली असल्याचे दिसले.  

Created By- Chapa Kata Team

या योजनेत महिलांची नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांची यादी जारी केली जाणार आहे. 

Created By- Chapa Kata Team

मध्य प्रदेश सरकारच्या 'लाडली बहना' योजनेच्या धर्तीवर 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना सुरु करण्यात आली आहे. 

Created By- Chapa Kata Team

या योजने अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे. यासाठी शासन दरवर्षी 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.  

Created By- Chapa Kata Team

विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रूपये आहे, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

Created By- Chapa Kata Team

घरात कोणी Tax भरत असेल, कोणी सरकारी नोकरीत असेल, सरकारी पेंशन मिळत असेल, पाच एकर पेक्षा जास्त शेती असेल तर अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

Created By- Chapa Kata Team

लागणारी कागदपत्रे - आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो.

Created By- Chapa Kata Team