देशातील पहिला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. 

आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कथित सेक्स स्कँडलमधील आरोपी असलेल्या जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांचा पराभव झाला आहे. 

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांचा काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी पराभव केला आहे. 

कर्नाटक राज्यामधील जनता दल सेक्युलर पक्षाचे (JDS) हसन लोकसभा मतदरासंघाचे खासदार प्रज्वल रेवण्णा 2976 व्हिडीओ व्हायरल झाले होते. 

देशातील दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल 2024 रोजी होणार होतं. यामध्ये कर्नाटक राज्यामधील 24 जागांवर मतदान होणार होतं. कर्नाटकमधील हसन मतदारसंघाचाही समावेश होता.  

प्रज्वल रेवण्णा उभे राहिलेल्या मतदारसंघात चार दिवसआधी म्हणजेच 24 एप्रिल 2024 या दिवशी काही लोकांनी पेन ड्राईव्ह फेकले होते. या पेन ड्राईव्हमध्ये रेवण्णांचे व्हिडीओ होते. 

निवडणुकीच्या तोंडावर व्हिडीओ पसरवत रेवण्णांचा गेम केला गेला. 

काँग्रेस पक्षाला हसन मतदारसंघात 25 वर्षांनंतर यश मिळालं आहे.  काँग्रेसचे उमेदवार श्रेयस पटेल यांना मतदान करत महिलांनी आरोपी असलेल्या रेवण्णाचा पराभव केलाय.