बऱ्याचदा प्रचंड मेहनत करूनही आर्थीक प्रगती होत नाही.
अशावेळी वास्तुशास्त्र मधील काही उपाय केल्यास अचानक धनलाभाचा योग जुळून येतो.
वास्तूशास्त्रात आणि फेंगशुईमध्ये क्रासुला झाडाला कुबेराचे झाड म्हंटले गेले आहे.
क्रासुलाचे झाड घरात लागवल्यास पैसा चुंबकासारखा आकर्षित होतो.
क्रॅसुला ही वनस्पती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. शुक्र बळकट असल्यास आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही.
हे झाड घराच्या उत्तर दिशेला लावल्यास विशेष फायदा होईल. लागवड करताना रोप अंधारात राहू नये याची विशेष काळजी घ्यावी.
जर तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती हवी असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला हे रोप लावा. याशिवाय हे झाड ऑफिसच्या डेस्कवरही ठेवता येते.