You are currently viewing Tips For Hair fall : हे चार हॉट हेअर ऑईल केसांना करतील मजबुत, केसगळती होईल शुन्य
Tips For Hair fall

Tips For Hair fall : हे चार हॉट हेअर ऑईल केसांना करतील मजबुत, केसगळती होईल शुन्य

मुंबई : (Tips For Hair fall) निरोगी आणि घनटाट केस प्रत्त्येकालाच आवडतात , परंतु खराब जीवनशैली, प्रदूषण आणि पोषणाचा अभाव यामुळे लोकांना केसाशी संबंधीत अनेक समस्यांना समोर जावे लागते. केस गळणे, तुटणे आणि कोरडेपणा या समस्या आज प्रत्त्येक दुसरी व्यक्ती अनुभवत आहे. अशा परिस्थितीत केसांना पोषण देण्यासाठी नेहमी तेल लावावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे कोंडा, कोरडेपणा आणि केस तुटणे तसेच गळणे या समस्या कमी होतात. बाजारात अनेक प्रकारचे हेअर ऑइल उपलब्ध आहेत जे तुमच्या केसांसाठी चांगले असू शकतात, परंतु आज आपण अशाच काही केसांच्या तेलांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या केसांना आतून बळकटी देईल आणि केसगळतीला विराम लावेल.

या चार प्रकाच्या तेलाने करा केसांना मसाज

जोजोबा तेल (Jojoba Oil)

जोजोबा तेल केसांसाठी खूप चांगले मानले जाते. अनेक तज्ञ हे वापरण्याचा सल्ला देतात. हे तेल केस मजबूत करते आणि केसांना खोल पोषण देते, तसेच नुकसान होण्यापासून संरक्षण करते. आठवड्यातून दोनदा केसांना जोजोबा तेल लावल्याने केसांची वाढ जलद होते. जोजोबा तेलात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे केसांची वाढ होते.

ऑलिव तेल (Olive Oil)

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, अनेक अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओलिक ॲसिड आढळतात ज्यामुळे केस मजबूत होतात. यामुळे केसांना मुळापासून पोषण मिळते आणि त्यांची वाढ होण्यास मदत होते. आंघोळीच्या दोन तास आधी केसांना ऑलिव्ह ऑईल लावा आणि नंतर शॅम्पू करा. याने केस लवकर वाढतात.

एरंडेल तेल (Arendal Oil)

एरंडेल तेलात व्हिटॅमिन ई, प्रथिने आणि खनिजे आढळतात. याशिवाय, त्यात अँटी-मायक्रोबियल गुणधर्म देखील आहेत जे केसांना कोंडा आणि टाळूच्या समस्यांपासून वाचवतात. एरंडेल तेल टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुधारते आणि केसांना आर्द्रता देते. तुमच्या बोटांच्या टोकांनी टाळूला तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. तीन ते चार तास ते तसेच राहू द्या. यानंतर आपले केस धुवा.

खोबरेल तेल (Coconut Oil)

केसांसाठी खोबरेल तेल हे एक प्रकारचे अन्न आहे जे शतकानुशतके चालू आहे आणि भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. खोबरेल तेलात अनेक जीवनसत्त्वे असतात. खोबरेल तेलाने केसांना मसाज केल्याने केसांची वाढ वाढते. याशिवाय, यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म देखील आहेत. हे स्कॅल्पमधील बॅक्टेरिया किंवा फंगसची समस्या दूर करते आणि केस तुटण्यास प्रतिबंध करते. त्यात फॅटी ॲसिड आढळते जे केसांना पोषण आणि चमक देते.

आता केसगळतीच्या कारणांबद्दलही जाणून घेऊया ज्यामुळे आपल्याला होत असलेल्या समस्येचे नेमके कारण काय आहे हे समजणे सोपे होईल. केस गळणे किंवा तुटणे ही समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याची अनेक कारणे असू शकतात, त्यामुळे केसगळतीचे कारण आधी शोधले पाहिजे. योग्य उपचार करून आणि काही सवयी बदलून केस गळणे थांबवता येते.

Tips For Hair fall
Tips For Hair fall

केस गळण्याची कारणे (Hair fall reasons)

केस गळण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे तणाव, पौष्टिकतेची कमतरता, कोंडा, टाळूमध्ये जास्त तेल, रोग आणि थायरॉईड असंतुलन. याशिवाय केसांना कलरिंग किंवा ब्लीचिंग, केमिकल ट्रिटमेंट जसे की स्ट्रेटनिंग, परमिंग इ. रजोनिवृत्ती दरम्यान किंवा गर्भधारणेनंतर हार्मोनल असंतुलन देखील केस गळतीचे कारण असू शकते.

पौष्टिक अन्नाचा अभाव

पौष्टिकतेची कमतरता हे केस गळण्याचे सर्वात सामान्य कारण आहे, म्हणून निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे. निरोगी आहारामुळे केस मजबूत होतात आणि केस गळणे थांबते. केस हेल्दी बनवण्यासाठी आणि केस गळती रोखण्यासाठी रोजच्या आहारात अंकुरलेल्या धान्यांचा समावेश करा.

स्प्राउट्समध्ये अमीनो ॲसिड असतात, जे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. तुमच्या रोजच्या आहारात फळे, कोशिंबीर, हिरव्या पालेभाज्या, संपूर्ण धान्य आणि दही यांचा समावेश करा.

टाळू तेलकट असेल किंवा कोंडा असेल तर भरपूर पाणी प्या. एका ग्लास पाण्यात एका लिंबाचा रस मिसळा आणि सकाळी अंशापोटी सेवन करा.

ताण

ताण म्हणजेच स्ट्रेस हे केस गळणे आणि केसांच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. आजच्या युगात वाढत्या स्पर्धेमुळे तणाव टाळणे कठीण झाले आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच आपल्या केसांवरही याचा परिणाम होतो. योग आणि श्वासोच्छवासाच्या व्यायामाने (प्राणायाम) तणाव कमी करता येतो.

आजार

याशिवाय, जर तुम्हाला अलीकडेच कोणत्याही आजाराने ग्रासले असेल तर ते केस गळण्यास कारणीभूत ठरू शकते. थायरॉईडचे असंतुलन हे देखील केस गळण्याचे प्रमुख कारण असू शकते.

रजोनिवृत्ती

जर तुमचे केस अचानक झपाट्याने गळू लागले असतील तर त्याचे कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे वयही यासाठी कारण असू शकते. सामान्यतः रजोनिवृत्तीच्या काळात महिलांचे केस झपाट्याने गळू लागतात.

गर्भधारणा

गर्भधारणेनंतर केस गळणे सामान्य आहे. गर्भधारणेदरम्यान इस्ट्रोजेनची पातळी वाढते, ज्यामुळे केसांना फायदा होतो. पण गर्भधारणेनंतर त्याची पातळी कमी होऊ लागते, त्यामुळे केस गळायला लागतात. हार्मोनल असंतुलन दुरुस्त झाल्यावर केस गळणे थांबते. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर केसांची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

थायरॉईड

थायरॉईडच्या असंतुलनामुळे केस लवकर गळतात. हे केसांच्या संरचनेवर देखील परिणाम करू शकते. थायरॉईड असंतुलन झाल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि उपचार करा. थायरॉईडवर योग्य उपचार केल्यास केस गळणे थांबते.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply