You are currently viewing Shrawan Somwar Upay Marathi : श्रावण सोमवारी घरी घेऊन या महादेवाच्या प्रिय चार वस्तू, पूर्ण होतील सर्व मनोकामना
Shrawan Somwar Upay

Shrawan Somwar Upay Marathi : श्रावण सोमवारी घरी घेऊन या महादेवाच्या प्रिय चार वस्तू, पूर्ण होतील सर्व मनोकामना

मुंबई : (Shrawan Somwar Upay Marathi) सनातन धर्मात सावन महिन्याचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यात भगवान शंकरासोबत माता पार्वतीची पूजा केली जाते. तसेच महादेवाला प्रसन्न करण्यासाठी सोमवारी उपवासही केला जातो. श्रावण सोमवारचे व्रत केल्यास साधकाला अपेक्षित फळ मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच सर्व प्रकारचे दु:ख, संकटे दूर होतात. ज्योतिषशास्त्रात श्रावण सोमवारी विशेष उपाय करण्याचे वर्णन आहे. हे उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होते. जर तुम्हालाही पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर श्रावण सोमवारी भगवान शंकराच्या आवडत्या वस्तू घरी आणा. यामुळे वास्तूदोष दूर होतो.

भगवान शिवाच्या आवडत्या गोष्टी

  • वास्तू दोष दूर करायचा असेल तर श्रावण  सोमवारी डमरू घरी आणा. त्याचबरोबर पूजेनंतर घरातील सर्व खोल्यांमध्ये डमरू वाजवा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरही वाजवू शकता. हा उपाय केल्याने वास्तुदोष दूर होतात.
  • जर तुम्हाला सुख, समृद्धी आणि संपत्तीत वाढ हवी असेल तर श्रावण सोमवारी दगडी किंवा चांदीचा नंदी (बैल) घरी आणा. मंदिरात नंदीची प्रतिष्ठापना करा आणि त्यांची पूजा करा. यानंतर, हवे असल्यास तूम्ही तो तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता.
  • आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी चांदीपासून बनवलेले बेलपत्र घरी आणा. आता विधीनुसार भगवान शिवाची पूजा करा.
  • यावेळी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करा. त्याचबरोबर पूजा संपल्यानंतर बेलपत्र घराच्या तिजोरीत ठेवावे.
  • शिवलिंग घरी बसवायचे असेल तर श्रावण सोमवारी पारद शिवलिंग आणू शकता. स्नान आणि ध्यान केल्यानंतर पारद शिवलिंगाची स्थापना करा आणि विधीनुसार भगवान शंकराची पूजा करा. पारद शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी तुम्ही पंडितजींचा सल्लाही घेऊ शकता.

 संपत्ती वाढवण्यासाठी टिप्स आर्थिक लाभ होण्यासाठी हा उपाय करा

श्रावण महिन्यातील कोणत्याही रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावून शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. जर तुमच्या घरात पैशाची समस्या असेल तर हे उपाय केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होऊ शकते. तुम्हाला संपत्ती आणि समृद्धी देखील प्राप्त होऊ शकते.

कर्जापासून मुक्त होण्यासाठी उपाय

जर तुम्ही कर्जामुळे त्रस्त असाल आणि लवकरात लवकर यातून सुटका हवी असेल तर श्रावणाच्या कोणत्याही रात्री पाण्यात अक्षत मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा. असे केल्याने तुमचा कर्जाचा बोजा कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुम्हाला अडकलेले पैसेही मिळू लागतील.

दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय

जर तुम्ही शनीच्या प्रभावाखाली असाल आणि तुमच्या जीवनातील समस्या संपत नसतील तर या महिन्यातील कोणत्याही रात्री शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या त्रासांपासून आराम मिळेल.

नोकरी आणि व्यवसायातील प्रगतीसाठी

ज्योतिष शास्त्रानुसार नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी श्रावण महिन्यातील शिवरात्रीला देवी पार्वतीला चांदीचे जोडवे किंवा पैंजण अर्पण केल्याने संपत्तीच्या नवीन संधी मिळतील.

श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीला केशर मिश्रित खीर अर्पण केल्याने धनसंपत्तीचा मार्ग खुला होतो.

श्रावण महिन्यात पती-पत्नीने मिळून शंकराला पंचामृताने अभिषेक केल्यास वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.

तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी श्रावणाच्या सोमवारी शिवशंभूला डाळिंबाच्या रसाने अभिषेक करा.

विवाहित जोडप्यांनी श्रावण महिन्यातील सर्व सोमवार व्रत पाळल्यास त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात.

श्रावणाच्या कोणत्याही सोमवारी मोहरीच्या तेलाने शिवाचा रुद्राभिषेक केल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांना रोग आणि दोषांपासून मुक्ती मिळते.

वास्तूदोष दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात खालील उपाय देखील करू शकता

  • भगवान शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहे. शिवपुराणानुसार ज्या ठिकाणी बेलाचे झाड असते ती जागा काशीसारखी पवित्र मानली जाते. बेलाच्या झाडाला जल अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते. वास्तूनुसार बेलाचे झाड उत्तर-पूर्व दिशेला लावावे.
  • पूजेच्या ठिकाणी भगवान शिव किंवा भगवान शिव यांच्या कुटुंबाचे चित्र लावावे. वास्तूनुसार भगवान शिवाच्या कुटुंबाचे चित्रे उत्तर दिशेला लावावे.
    शिव हे परिपूर्णतेचे प्रतीक आहे. शिव तांडव मूर्ती किंवा भगवान शंकराची क्रोधी चित्रे घरात ठेवू नका.
  • जर तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग बसवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सावन महिना उत्तम पर्याय आहे. मात्र, शिवलिंगाची दिशा लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शिवलिंग घराच्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये ठेवा. उत्तर आणि पूर्वेतील दिशा नेहमीच शुभ असते.
  • वास्तुशास्त्रात ही दिशा अत्यंत शुभ मानली जाते. या दिशेला देवी-देवतांची दिशा म्हणतात. तसेच श्रावण काळात “ओम नमः शिवाय” चा जप अवश्य करा.
  • श्रावण महिन्यातील त्रयोदशी व शिवरात्रीच्या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नान वगैरे करून शमीचे रोप लावावे. शमीचे झाड लावण्यापूर्वी त्याखाली सुपारी आणि काही नाणी टाकावे.

 

(अस्विकरण- वरिल माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दूजोरा देत नाही.)

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply