You are currently viewing Shrawan 2024 Upay Marathi : महादेवाला बेलपत्र वाहताना ‘हे’ नियम अवश्य पाळा
Shrawan 2024

Shrawan 2024 Upay Marathi : महादेवाला बेलपत्र वाहताना ‘हे’ नियम अवश्य पाळा

मुंबई : (Shrawan 2024 Upay Marathi) श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हा महिना देवांचे देव महादेवाचा प्रिय महिना आहे. श्रावण महिन्यात महादेवाला प्रसन्न केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. महादेवाला बेलपत्र अतिशय प्रिय आहे. श्रावण महिन्यात विशेषतः श्रावण सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र वाहल्याने महादेवाची विशेष कृपा प्राप्त होते. बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत. ते पाळणे आवश्यक आहे. तुम्हीसुद्धा श्रावण महिन्यात महादेवाला बेलपत्र अर्पण करणार असाल तर हे नियम अवश्य पाळा.

या दिवशी बेलपत्र तोडू नये

श्रावणातील सोमवारी कधीही बेलपत्र तोडू नये. कारण मान्यतेनुसार या दिवशी सर्व देवी-देवता बेलपत्रात वास करतात आणि ते तोडणे हा त्यांचा अपमान मानला जातो. यासोबतच चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलपत्र तोडणे शुभ मानले जात नाही.

या गोष्टीही लक्षात ठेवा

असे मानले जाते की बेलपत्र पाच दिवस शिळे होत नाही, म्हणून तुम्ही बेलपत्र अर्पण करण्यापूर्वी एक दोन दिवस आधी तोडून ठेवावे. तुमच्या आवश्यकतेनुसार शिवलिंगाला अर्पण करू शकता. हे देखील लक्षात ठेवा की बेलपत्र कधीही डहाळीसह अर्पण करू नये.

अशा प्रकारे अर्पण करा

भगवान शंकराला अर्पण करण्यासाठी नेहमी तीन पानांचे बेलपत्र घ्यावे. भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करण्यासाठी फक्त अंगठा, अनामिका आणि मधले बोट वापरावे. मनोकामना पूर्ण करण्यासाठी 11, 21, 51 किंवा 108 बेलची पाने शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते.

हा मंत्र म्हणा

बेलपत्र तोडताना ‘ओम नमः शिवाय’ चा जप करावा. तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि साधकाला त्यांचा आशीर्वाद मिळतो.

शिवपूजेत बेलपत्राला का आहे विशेष महत्त्व

पौराणिक कथेनुसार, जेव्हा समुद्रमंथनाच्या वेळी विष बाहेर पडले, तेव्हा भगवान शिवांनी विश्वाचे रक्षण करण्यासाठी ते आपल्या कंठात स्थिर केले. कंठात विष धारण केल्याने त्याचा भगवान शंकरावर परिणाम होऊ लागला. या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व देवी-देवतांनी शिवाला बेलपत्र खाऊ घालण्यास सुरुवात केली. भगवान शंकराला बेलपत्र आणि पाणी दिल्याने त्यांच्या शरीराचे तापमान हळूहळू कमी होऊ लागले. तेव्हापासून भगवान शंकराला बेलपत्र आणि जल अर्पण करण्याची प्रथा सुरू झाली.

असे मानले जाते की ज्या लोकांच्या घरात बेलपत्राचे झाड असते, त्यांना धन, धान्य आणि सुख-समृद्धीची कमतरता नसते. भगवान शंकराच्या पूजेमध्ये बेलपत्र अर्पण केल्याने सर्व प्रकारचे दुःख दूर होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. शिवलिंगावर बेलपत्राचा तीन पानांचा भाग अर्पण करण्याचे महत्त्व आहे. कारण बेलपत्राच्या तीन पानांमध्ये सर्व पवित्र स्थाने वास करतात.

Health benefits of Belpatra
Health benefits of Belpatra

बेलपत्राचे आरोग्यदायी फायदे

बेलपत्र सकाळी रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बेलपत्र खूप महत्त्वाचे ठरते. बेलपत्रामध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते.  बेलपत्र रोज रिकाम्या पोटी खाल्ल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास होत नाही आणि वारंवार आजारी पडत नाही.

बेलपत्रामुळे पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो

बेलपत्रामध्ये भरपूर फायबर असते, त्यामुळे ते पचनासाठी खूप फायदेशीर मानले जाते. तुम्हाला पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तुम्ही रोज सकाळी रिकाम्यापोटी बेलपत्राचे सेवन करू शकता. रोज सकाळी बेलपत्राचे सेवन केल्याने गॅस, ॲसिडिटी आणि अपचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. याशिवाय त्वचेशी संबंधीत आजारांपासून लोकांना आराम मिळतो. वारंवार अॅसिडीटीचा त्रआस होत असल्यास बेलपत्राचे नियमित सेवन केल्यास आराम मिळतो.

ह्रदयासाठी फायदेशीर बेलपत्र

बेलपत्र हे हृदयाच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केले तर ते हृदयाचे आरोग्य सुधारेल.  बेलपत्रामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे तुम्हाला सर्व आजारांपासून वाचवतात. बेलपत्र खाल्ल्याने हृदय मजबूत होते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो. बेलपत्र सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास हृदयरोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.

बेलपत्रामुळे शरीराला थंडावा मिळतो

रोज सकाळी बेलपत्र खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. वास्तविक, बेलपत्राचा शीतल प्रभाव असतो आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही बेलपत्राचे सेवन केले तर तुमचे शरीर दिवसभर थंड राहते. विशेषतः उन्हाळ्यात बेलपत्र खाणे अधिक फायदेशीर आहे, परंतु बेलपत्र आणि बेल शरबत पिऊन अनेकांना उष्णतेमध्ये थंडावा जाणवतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तोंडात फोडं येत असतील तर दररोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केल्याने देखील तोंडातील फोडं दूर होतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेलपत्र फायदेशीर

बेलपत्र हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन करू शकता. मधुमेही रुग्णांनी बेलपत्राची 10 कोवळी पाने सक संध्याकाळ चावून खाल्ल्यास मधुमेही रुग्णांना खूप आराम मिळतो. बेलपत्रामध्ये असलेले फायबर आणि इतर पोषक घटक मधुमेहाच्या आजारांसाठी आवश्यक आहेत. रिकाम्या पोटी बेलपत्र खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

(वरिल माहिती उपलब्ध स्तोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दूजोरा देत नाही.)

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply