मुंबई : (Shrawan 2024 Astrology) हिंदी भाषिकांचा श्रावण महिना सुरू झालेला आहे. हा महिना सर्व राशींसाठी उत्तम असणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती बहुतेक राशींसाठी अनुकूल राहणार आहे. कर्क राशीत सूर्य देव विराजमान आहे. त्याच वेळी शुक्र सध्या कर्क राशीत आहे. तर आगामी काळात शुक्र कर्क राशीतून बाहेर पडून सिंह राशीत प्रवेश करेल. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. यापैकी चार राशीच्या लोकांसाठी यंदा विवाहयोग जूळून येत आहेत. चला, जाणून घेऊया या चार राशी कोणकोणत्या आहेत.
शुक्र राशिचक्र बदलाचा परिणाम
सुखाचा कारक असलेला शुक्र 31 जुलैला दुपारी 02:33 वाजता कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करेल. या राशीत शुक्र 24 दिवस राहील. या दरम्यान शुक्र 11 ऑगस्टला पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात आणि 22 ऑगस्टला उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करेल. यानंतर 25 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश करेल.
मेष राशीच्या लोकांसाठी परिणाम
मेष राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना शुभ ठरणार आहे. सुखाचा कारक असेल्या शुक्राची तूमच्यावर कृपादृष्टी होणार आहे. यामुळे मेष राशीच्या लोकांना प्रेमसंबंधात यश मिळेल. याशिवाय वैवाहिक जीवनात गोडवा जाणवेल. प्रेमप्रकरणात अडकलेल्या लोकांना जोडीदाराकडून पूर्ण प्रेम मिळेल. जर तुमचे कोणावर प्रेम असेल तर तुम्ही ते श्रावण महिन्यात व्यक्त करू शकता. तुमची आवडती व्यक्ती तुमचा प्रस्ताव नक्कीच स्वीकारेल. इच्छित प्रेम मिळविण्यासाठी, श्रावण सोमवारी भगवान शिवाला मध आणि दूधाने अभिषेक करा.
वृषभ आणि तुळ राशीवर काय काय परिणाम होणार?
वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि उपासनेची देवी माता दुर्गा आहे. या दोन्ही राशींवर भगवान शुक्राचा विशेष आशीर्वाद आहे. शुक्र बलवान झाल्यामुळे तूळ राशीच्या लोकांना प्रेम सुख मिळते. जर तुमची राशी वृषभ किंवा तूळ असेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी स्नान आणि ध्यानानंतर भगवान शिवाला कच्च्या दुधाचा किंवा शुद्ध दह्याचा अभिषेक करा. या उपायाचा अवलंब केल्याने एखाद्याला इच्छित जीवनसाथी मिळतो. तसेच प्रेमसंबंध अधिक घट्ट होतात.
कुंभ राशीच्या जातकांसाठी श्रावण महिना असणार अत्यंत फलदायी
शुक्र हा प्रेम आणि विवाहाचा कारक मानला जातो. पत्रिकेत बलवान शुक्र असल्यामुळे अविवाहित लोकांचे लग्न लवकर होते. पत्रिकेतील शुक्र बलवान होण्यासाठी ज्योतिषी भगवान शिवाची पूजा करण्याचा आणि सोळा सोमवार उपवास करण्याचा सल्ला देतात. सुखाचे कारण शुक्राची कृपा कुंभ राशीच्या लोकांवर सावन महिन्यात होईल. राशीच्या बदलादरम्यान, शुक्र कुंभ राशीच्या विवाह घरावर आपली नजर टाकेल. यामुळे प्रेमात पडलेल्या लोकांमधील नाते अधिक गोड होईल. त्याच वेळी, अनेकांना श्रावण महिन्यात खरे प्रेम मिळू शकते. नाते मधुर ठेवण्यासाठी श्रावण सोमवारी भगवान शिवाला दूध, दही, तूप, मध आणि पंचामृताने अभिषेक करा.
विवाह योग जुळून येण्यासाठी श्रावण महिन्यात करा हे उपाय
श्रावण महिन्यात केलेल्या काही उपायामुळे विवाहयोग लवकर जूळून येतो. धार्मिक मान्यतेनुसार विवाह इच्छूक तरूण किंवा तरूणीने श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास ठेवला तर सुयोग्य जोडिदार मिळतो. याशिवाय वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर श्रावण सोमवारी उपवास केल्यास सर्व समस्या दूर होतील.
जर तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचण येत असेल आणि काही कारणास्तव तुमचे लग्न होत नसेल तर हा उपाय अवश्य करा. श्रावण सोमवारी ब्रह्म मुहूर्त उठा, आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाका आणि गरहर गंगे असा जप करीत आंघोळ करा. त्यानंतर शिवमंदिरांमध्ये जाऊन विधीनुसार भगवान शिवाची पूजा करावी आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा.
पिवळे कपडे घालावेत
याशिवाय श्रावणामध्ये देवाधिदेव महादेव आणि माता पार्वतीची पूजा करताना 108 बेलची पाने घ्या आणि प्रत्येक बेलच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहा. यानंतर देवाधिदेव महादेवाच्या शिवलिंगाला एक एक करून अर्पण करा. असे केल्यास तुमचे लवकरच लग्न होऊ शकते. श्रावण महिन्यात विवाहित मुलाने किंवा विवाहित मुलीने पिवळ्या रंगाचे कपडे घालावेत. पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून शिवलिंगाला जल अर्पण करावे.
भगवान शंकराला पिवळे फुले अर्पण करा. याशिवाय सलग 10 दिवस शिवलिंगावर अत्तर अर्पण करावे. असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते. दुसरीकडे, श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी, शिवाच्या मंदिरात शिवलिंगाला पाच नारळ अर्पण केल्यानंतर, ओम श्री वर प्रदाय श्री नमः जप करा.
(अस्विकरण : वरिल माहिती उपलब्ध स्तोतावरून देण्यात आलेली आहे. आम्ही अंधश्रद्धेला दूजोरा देत नाही)