मुंबई : (Shardiya Navratri Upay Marathi) शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2024) हा सनातन धर्मातील प्रमुख सणांपैकी एक मानला जातो. तो देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. सर्वपितृ अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून नवरात्रीचा हा पवित्र सण सुरू होतो. यावेळी शारदीय नवरात्री शनिवार, 3 ऑक्टोबरपासून सुरू होत असून देवीच्या उपासनेचा हा सण 12 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. नऊ दिवस धूमधडाक्यात साजरा होणारा हा सण देवी दुर्गाला समर्पित आहे. नवरात्रीच्या दिवसात शक्ती स्वरूप देवीची पूजा केली जाते. अनेक जण नऊ दिवस उपवास करतात, पूजा करतात आणि मातेला प्रसन्न करण्यासाठी काही सिद्ध उपाय देखील करतात. शारदीय नवरात्रीमध्ये काही विशेष उपाय केल्याने देवी प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. जाणून घेऊया काही चमत्कारिक उपायांबद्दल.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे उपाय करा
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये कलश अवश्य स्थापित करा. याने घरात देवीचे आगमन होते आणि ती प्रसन्न होते.
कलश स्थापना केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करून व्रताचा संकल्प घ्यावा. याने दुर्गा माता अत्यंत प्रसन्न होते आणि भक्ताला आशीर्वाद देते.
पारिजातक ही वनस्पती दुर्गादेवीला अतिशय प्रिय आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घराच्या बागेत पारिजातकाचे रोप लावल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.
तुमच्या घराच्या बागेत दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावा. यामुळे लक्ष्मी आणि दुर्गा देवी या दोघीही प्रसन्न होतात, त्यामुळे घरातील तिजोरी संपत्तीने भरलेली असते.
माता दुर्गेला जासवंदाचे फूल खूप आवडते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जासवंदाचे फुले अर्पण केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते आणि भक्ताला इच्छित फळ प्रदान करते.
स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय करा
जर तुम्ही स्वतःचे घर बांधण्याचा किंवा विकत घेण्याचा विचार करत असाल तर नवरात्रीच्या काळात मातीचे छोटे घर बनवा आणि पूजेच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने देवी तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण करेल.
प्रगतीच्या मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी
नवरात्रीत कोणत्याही दिवशी घरात तुळशीचे रोप लावा. जर तुमच्या घरी आधीपासून तुळशीचे रोप असेल तर एक नाणे हातात धरून तुमची इच्छा मनातल्या मनात बोला आणि नंतर हे नाणे तुळशीच्या रोपाखाली मातीत गाडून टाका. यामुळे तुमच्या प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील.
घरातील क्लेश दूर करण्याचे उपाय
जर तुमच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असेल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर सतत नऊ दिवस कुंकू ठेवा आणि दुर्गा स्तोत्र आणि दुर्गा नामावलीचा पाठ करा. यामुळे घरात सकारात्मक उर्जा वाहू लागेल.
आर्थिक समस्या दूर करण्यासाठी
जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असाल तर नवरात्रीच्या काळात विड्याच्या पानावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवा आणि माता दुर्गाला अर्पण करा. असे केल्याने धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते. या उपायाने तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागणार नाही.
नोकरी आणि व्यावसायातील प्रगतीसाठी हे उपाय करा
नोकरीत प्रमोशन आणि बिझनेसमध्ये वाढ होण्यासाठी नवरात्रीच्या काळात विड्याचे पान घेऊन त्याच्या दोन्ही बाजूंना मोहरीचे तेल लावावे. त्यानंतर ते दुर्गा मातेला अर्पण करावे. डोक्याजवळ सुपारी घेऊन झोपा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून हे सुपारी दुर्गा मंदिराच्या मागे ठेवावे. असे केल्याने नोकरी किंवा व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील.
ग्रह दोष दूर करण्यासाठी हा उपाय करा
नवरात्रीच्या नवव्या दिवशी 5 हळदीचे कांडं घेऊन ते लाल कपड्यात बांधून तुळशीच्या रोपाजवळ ठेवाव्यात. असे केल्याने ग्रह दोष दूर होतात. असे मानले जाते की हा उपाय केल्याने शनि, राहू आणि केतूशी संबंधित वाईट प्रभाव दूर होऊ लागतात आणि तुमच्या जीवनात आनंद येतो.
या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे उपाय करून पहा
जर तुम्हाला कोणताही जुनाट आजार असेल किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांची तब्येत सतत बिघडत असेल तर महानवमीच्या दिवशी दुर्गा मातेचे ध्यान करताना आग्नेय दिशेला म्हणजेच आग्नेय कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. हा उपाय केल्याने रोगांपासून मुक्ती मिळते आणि उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. याशिवाय हा उपाय तुम्हाला तुमच्या शत्रूंवर विजय मिळवून देतो.
इच्छा पूर्ण करण्यासाठी हे उपाय करा
तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही महानवमीच्या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पठण केले पाहिजे. यामुळे मानसिक शांती मिळते. जर तुम्हाला या दिवशी संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करता येत नसेल, तर तुम्ही किमान त्याच्या बाराव्या अध्यायाचे पठण करावे. असे केल्याने मनोकामना पूर्ण होते.
सवाश्न महिलांनी हे उपाय करावेत
विवाहित महिलांनी नवरात्रीच्या नवव्या तिथीला माता सिद्धिदात्रीला सौभाग्याचे साहित्य अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात आणि तुम्हाला सौभाग्यही मिळते.
नवरात्रीची नवमी तिथी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी वरील उपायांचे पालन केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. यासोबतच काही नवीन सुरुवात करायची असेल तर हा दिवस खूप शुभ आहे. या दिवशी नवीन काम सुरू केल्याने नक्कीच यश मिळते.
(डिस्केमर- वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दूजोरा देत नाही.)