You are currently viewing शिवकालीन वस्तूंच्या प्रतिकृती घडवणाऱ्या सत्यजीत वैद्य यांचा प्रेरणादायी प्रवास

शिवकालीन वस्तूंच्या प्रतिकृती घडवणाऱ्या सत्यजीत वैद्य यांचा प्रेरणादायी प्रवास

पुणेः छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज प्रत्त्येक मराठी माणसासाठी आराध्य दैवत आहे. महाराजांच्या इतिहासात डोकावून पाहिल्यास त्यांचा पराक्रम आणि संघर्ष डोळ्यासमोर आणताच कुणाच्याही अंगावर शहारे येणे सहाजीक आहे. महाराजांच्या काळात वापरले जाणारे शस्त्र आणि त्या काळातली संस्कृती दर्शवणाऱ्या वस्तू पुण्याच्या सत्यजीत वैद्य यांनी अतिशय सुबक पणे साकारले आहेत. सत्यजीत यांचे रूद्र आर्ट्स (Rudra Arts Pune) हे दालन म्हणजे कोणत्याही शिव प्रेमीला सहज मोहित करणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्ती बाजारात अनेक ठिकाणी सहज उपलब्ध आहेत पण येथे मिळणाऱ्या मुर्ती बाजारातल्या मुर्तींपेक्षा वेगळ्या आहेत. याचं वेळपण म्हणजे त्या इतिहासातील संदर्भातून साकारल्या गेल्या आहेत. महाराजांचे उपलब्ध असलेले छायाचित्र आणि इतिहासकारांनी त्यांच्याबद्दल ज्या नोंदी केलेल्या आहेत त्या आधारे या सर्व प्रतिकृती साकारल्या गेलेल्या आहेत.

सत्यजीत वैद्य यांचे बालपण कर्नाटक-महाराष्ट्र सिमेवरच्या निपाणी या गावात गेले. लहानपणापासूनच त्यांच्या आईकडून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत होते. लहानपणी झालेले संस्कार खोलवर रूजले गेले आणि महाराजांवरचे प्रेम दिवसागनिक वाढतच गेले. त्यांना शिवकालीन शस्त्रांमध्ये विशेष रूची होती. सुरूवातीला त्यांनी TCS कंपनीत नोकरी केली पण त्यांचं मन मात्र शिवकालीन शस्त्रांमध्ये जास्त होते. नोकरीसोबतच त्यांनी शस्त्रांच्या प्रतिकृती बनवायला सुरूवात केली. त्याच्या या कामाचे कौतूकही होऊ लागले. नोकरी आणि कला  यामध्ये त्यांनी आपल्या कलेला प्राधान्य देण्याचे ठरविले. गेल्या नऊ वर्षांपासून ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. यात त्यांना त्यांच्या पत्नीची मोलाची साथ लाभली आहे. पुण्याच्या नवी सांगवी येथे असलेल्या रूद्र आर्ट्स येथे त्यांचे वर्कशॉप आहे. शिवकालीन शस्त्र, महारांचे जिरेटोप, मावळ्यांच्या प्रतिकृती आणि त्यांच्या पगड्या, शिवमुद्रा आणि अशा बऱ्याच वस्तू रूद्र आर्ट्स येथे उपलब्ध आहे. त्यांच्या या कलाकृतींना मोठी मागणी आहे. अनेक शिवप्रेमी त्यांच्या आप्तेष्टांना भेट देण्यासाठी किंवा घर सजावटींसाठी या वस्तूंची खरेदी करतात. तुम्हालासुद्धा रूद्र आर्ट येथे भेट द्यायची असल्यास संपर्कासाठी पत्ता आणि नंबर खाली दिलेला आहे.

पत्ता-

गणेश नगर, समता नगर गल्ली नं. १, नवी सांगवी, पुणे

मो. नं-

७०२८९९६६६६

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

This Post Has 2 Comments

  1. Finance

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी आणि शस्त्रांबद्दलचे हे प्रेम त्यांना यशाच्या मार्गावर घेऊन गेले का?

  2. Personal Finance

    सत्यजीत वैद्य यांच्या जीवनात शिवकालीन शस्त्रांवरील प्रेम आणि त्यांच्या कलेचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. त्यांनी केवळ शस्त्रांच्या प्रतिकृती बनवल्या नाहीत तर त्यांच्या कलेला प्राधान्यही दिले. त्यांच्या कामाला मोठी मागणी आहे आणि अनेक शिवप्रेमी त्यांच्या कलाकृतींची वाहवा करतात. त्यांच्या वर्कशॉपमध्ये विविध शिवकालीन वस्तू उपलब्ध आहेत. तुम्ही त्यांच्या कलेबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता का?

Leave a Reply