You are currently viewing Pravin Dabas Accident : अभिनेता प्रविण डबास कार अपघातात गंभीर जखमी, काय आहेत हेल्थ अपडेट्स?
प्रविण डबास अपघात

Pravin Dabas Accident : अभिनेता प्रविण डबास कार अपघातात गंभीर जखमी, काय आहेत हेल्थ अपडेट्स?

मुंबई : (Pravin Dabas Accident) बॉलिवूड अभिनेता प्रवीण डबास याचा आज सकाळी भिषण कार अपघात झाला.अपघातात प्रविण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर 50 वर्षीय प्रवीण डबास यांना मुंबईतील वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. माय नेम इज खान, रागिनी MMS, खोसला का घोसला या गाजलेल्या चित्रपटात प्रविण यांनी काम केले आहे. याशिवाय ते प्रो पंचा लीगचे सह संस्थापकही आहेत.

प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती (Pravin Dabas Health Updates)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण डबास यांची प्रकृती सध्या अत्यंत नाजूक आहे. अपघाताच्या वेळी प्रवीण डबास स्वत: कार चालवत होते, आज सकाळी हा अपघात किती वाजता झाला, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. होलीक्रॉस रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आलेले नाही. घटनेची माहिता मिळाल्यानंतर प्रविण यांच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे.

प्रवीण डबास यांची पत्नी प्रीती झांगियानी यांनी एक निवेदन जारी केले आहे (Preeti Jhangiani)

प्रवीण डबास यांची पत्नी प्रीती झांगियानी यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “या अपघातानंतर मला आणि माझ्या कुटुंबाला यावेळी प्रचंड धक्का बसला आहे. वैद्यकीय अपडेटनुसार, त्यांना गंभीर दुखापत झाली आहे की नाही हे जाणून घेण्यात येत आहे. सध्या त्यांची प्रकृती नाजुक असल्याचे कळते, ते या क्षणी जास्त हालचाल करू शकत नाही. काम संपवून पहाटे ते स्वतः गाडी चालवत येत असताना त्यांचा अपघात झाला असे त्यांनी सांगितले.

प्रवीण डबास यांचे चित्रपट (Pravin Dabas Movie)

प्रवीणने दिल्लगी, मान्सून वेडिंग, खोसला का घोंसला, द हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय, मैने गांधी को नही मारा, ये है जिंदगी, कुछ मीठा हो जाए, इंदू सरकार, रागिनी एमएमएस 2 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. प्रवीणने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, पण अभिनेता म्हणून त्याला विशेष यश मिळाले नाही.

अलीकडेच तो थेट OTT (Amazon Prime) वर प्रदर्शित झालेल्या ‘शर्मा जी की बेटी’ चित्रपटातही दिसला होता. 2011 मध्ये त्यांनी ‘सही बंदे, गलात धांधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते, 2020 मध्ये प्रवीण डबास यांनी भारतात प्रो-पंजा लीग स्पर्धाही लाँच केली आणि लाँचिंग प्रसंगी, क्रीडा मंत्री किरण रिजुजू आणि बॉक्सर विजेंदर. सिंग आदी उपस्थित होते.

Pravin dabas Accident
प्रविण डबास

प्रो पंजा लीगने जारी केले निवेदन (pro panja league)

प्रो पंजा लीगने प्रवीणच्या अपघाताबाबत निवेदन जारी केले आहे. अभिनेता या व्यावसायिक आर्म रेसलिंग लीगचा सह-संस्थापक देखील आहे. प्रो पंजा लीगने लिहिले की, ‘हे कळविण्यात दुःख होत आहे की, प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक प्रवीण डबास सध्या वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत.

शनिवारी सकाळी झालेल्या कार अपघातानंतर त्यांना येथे दाखल करण्यात आले आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत.

प्रीती झांगियानी यांचे करिअर

प्रवीणची पत्नी प्रीती झांगियानी हिने आदित्य चोप्राच्या ‘मोहब्बतें’ (2008) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि अनेक चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर 2008 मध्ये प्रवीणसोबत लग्न केले. प्रविण आणि प्रिती यांना दोन मुले आहेत.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply