Paper Bag Manufacturing Business Idea: पर्यावरणाचे सर्वाधिक नुकसान करणाऱ्या घटकांपैकी प्लास्टिक एक महत्त्वाचा घटक आहे. सरकारने अनेक वेळा प्लास्टिकवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु प्लास्टिकला योग्य असा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्याचा वापर थांबवणे बऱ्याचदा आव्हानात्मक ठरते. बंदी असूनही प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, कागदी पिशव्यांचा (पेपर बॅग) वापर काही प्रमाणात प्लास्टिकचा वापर कमी करण्यात मदत करतो.
जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर पेपर बॅग व्यवसायाचा पर्याय उत्तम ठरू शकतो. आजकाल लोक प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्यांचा वापर करण्यावर भर देत आहेत. भविष्यात प्लास्टिकवर अधिक कठोर बंदी येण्याची शक्यता असल्यामुळे या व्यवसायाला चांगले यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. चला, जाणून घेऊया हा व्यवसाय कसा सुरू करता येईल.
व्यवसायाची सुरुवात कशी करावी?
पेपर बॅगचा व्यवसाय सुरू करण्यासाठी फारशा गोष्टींची गरज नाही. यासाठी तुम्हाला मुख्यतः कागदी रोल्स, पॉलिमर स्टीरिओ, फ्लेक्सो रंग, आणि पेपर बॅग बनवण्याची यंत्रणा यांची गरज भासेल. या सर्व वस्तू तुम्ही बाजारातून घाऊक भावात खरेदी करू शकता. पेपर बॅग मेकिंग मशीनची किंमत साधारणतः 3 लाख रुपयांपासून सुरू होते. यंत्र तुमच्या बजेटनुसार निवडता येते.
मशीनशिवायही पेपर बॅग तयार करता येतात
जर तुमच्याकडे मशीन खरेदी करण्याचे बजेट नसेल, तर तुम्ही हाताने देखील पेपर बॅग सहज तयार करू शकता. घरच्या घरी पेपर बॅग बनवणे सोपे असून यासाठी कमी खर्च होतो. यासाठी तुम्हाला कागदी रोल्ससह गोंद (ग्लू), कात्री, पंचिंग मशीन इत्यादी वस्तूंची आवश्यकता असेल. मात्र, हाताने तयार केल्यामुळे उत्पादनाची गती मशीनच्या तुलनेत कमी असेल.

स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत कर्जाची सुविधा
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्जही सहज मिळू शकते. केंद्र सरकारने नवीन स्टार्टअप्सला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत कर्ज देण्याची सुविधा दिली आहे. तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. सध्या बाजारात कागदी पिशव्यांची मागणी खूप वाढली आहे. अनेक मोठे ब्रॅंड्स आणि दुकानदार प्लास्टिकऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करतात.
उत्तम नफा कमावण्याची संधी
कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय तुम्हाला चांगला नफा मिळवून देऊ शकतो. वाढत्या पर्यावरणीय जाणीवेच्या पार्श्वभूमीवर, हा व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरेल. घाऊक दरात तुम्ही या पेपर बॅग्सची ॲार्डर मिळवू शकला तर मिळणारा नफा हा लाखोंच्या घरात जावू शकतो.