You are currently viewing मशरूमची शेती देऊ शकते लाखोंचं उत्पन्न, गुंतवणूक फक्त 5 हजार रूपये : Mushroom farming Marathi
Mushroom Farming Business

मशरूमची शेती देऊ शकते लाखोंचं उत्पन्न, गुंतवणूक फक्त 5 हजार रूपये : Mushroom farming Marathi

मुंबई : (Mushroom farming Marathi) एखाद्या व्यक्तीने घरात शेती करून लाखो रूपये कमावल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो, पण वास्तवात हे शक्य आहे का अशी शंका जर तुम्हाला असेल तर त्याचे उत्तर हो असं आहे. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटेल की काही लोकं एका खोलीत शेती करून खरंच महिन्याला लाखो रुपये कमवत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेस आयडियाबद्दल सांगणार आहोत, जी तुम्ही तुमच्या एका छोट्या खोलीत सुरू करून लाखो रुपयांचा नफा कमवू शकता. आज आम्ही मशरूमच्या शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. या व्यावसायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात गुंतवणूक अत्यंत कमी आणि नफा भरपूर आहे. मशरूमची शेती करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपये गुंतवावे लागतील.

मशरूम व्यावसायाची सुरूवात कशी करावी?

मशरूमची लागवड करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या खोलीत बांबूची झोपडी बनवावी लागेल. त्यात तुम्हाला मशरूम वाढवायची आहेत.  तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, देशात दरवर्षी 1.44 लाख मेट्रिक टन मशरूमचे उत्पादन होते आणि त्याची मागणी दररोज वाढत आहे. हा असा व्यवसाय आहे ज्याची मागणी वर्षानुवर्षे वाढतच आहे.

मशरूमची लागवड करण्याची पद्धत काय आहे?

जर तुम्ही मशरूमची लागवड करण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला त्याची लागवड ऑक्टोबर ते मार्च दरम्यान करावी लागेल. कोणत्याही शेतीसाठी महत्त्वाचे असते ते खत.  मशरूमच्या लागवडीमध्ये वापरले जाणारे खत गहू किंवा तांदळाचा पेंढा आणि काही रसायने मिसळून तयार केले जाते, जे तयार होण्यासाठी एक महिना लागतो.

कंपोस्ट तयार झाल्यानंतर, तुम्हाला मशरूमचे बियाणे तुमच्या खोलीतील कठीण जागेवर 6-8 इंच जाडीचा थर पसरवून तयार कंपोस्टने झाकून टाकावे लागेल.  मशरूम 40 ते 50 दिवसात तयार होईल. हे मशरूम बाजारात विक्रासाठी तयार आहेत.

येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की मशरूमची लागवड खुल्या जागेवर केली जात नाही, यासाठी आपल्याला छायांकित क्षेत्र आवश्यक आहे.

या व्यावसायातून कमाई किती असेल?

हा असा व्यवसाय आहे ज्याची मागणी दरवर्षी वाढते आणि तुमचा नफा कधीच कमी होणार नाही हे उघड आहे. या व्यवसायात तुम्हाला तुमच्या खर्चाच्या 10 पट नफा मिळू शकतो.

Mushroom Farming at home
मशरूमची शेती

या गोष्टी लक्षात ठेवा

  • बरेच शेतकरी मशरूमची लागवड करत नाहीत कारण त्यासाठी खूप काळजी आणि सावधगिरी बाळगावी लागते. यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या आहेत ते जाणून घेऊया.
  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तापमान, जे 15-22 अंश दरम्यान असावे. तापमान जास्त असेल तर शेती करणे शक्य होणार नाही.
  • त्याच्या लागवडीसाठी, आर्द्रता 80-90 टक्के असावी.
  • मशरूमच्या लागवडीसाठी, चांगले कंपोस्ट असावे, जे तयार करण्यासाठी सुमारे एक महिना मेहनत घ्यावी लागते.
  • या शेतीसाठी फार जुने बियाणे घेऊ नका, अन्यथा त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो.
  • मशरूम तोडताना, ते काळजीपूर्वक तोडले पाहिजेत जेणेकरून बाकीचे नुकसान होणार नाही.
  • मशरूम तोडल्यानंतर, ते लवकरात लवकर बाजारात घेऊन जा आणि त्यांची विक्री करा, जेणेकरून तुम्हाला ताज्या मशरूमची चांगली किंमत मिळेल.

मशरूमचे आरोग्यदायी फायदे

मशरूमचे एक नाही तर अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्याची भाजी चविष्ट तर असतेच पण पचायलासुद्धा हलकी असते. प्रथिने, खनिज क्षार आणि जीवनसत्त्वे बी, सी आणि डी देखील मशरूममध्ये आढळतात. त्यात फॉलिक ॲसिड देखील असते, जे शरीरात रक्त तयार करण्यास मदत करते. याशिवाय रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित विविध आजारांवरही याचे सेवन फायदेशीर ठरते. आता तुम्हाला समजले असेलच की मशरूमला इतकी मागणी का आहे.

उत्पादनानंतर विक्री कुठे करावी?

मशरूमच्या लागवडीत तुम्हाला खर्चाच्या 8-10 पट नफा मिळू शकतो. म्हणजेच 1 लाख रुपये गुंतवून तुम्ही 8-10 लाख रुपये कमवू शकता. तुम्ही मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना किंवा थेट ग्राहकांना विकल्यास तुमचा नफा आणखी जास्त असू शकतो. अशा स्थितीत घाऊक व्यापारी जे मार्जिन घेतात तेही तुमच्या वाट्याला येईल. मशरूम उत्पादनासाठी लागणारी लागत 25 ते 30 रुपये किलो आहे, तर तीच मशरूम बाजारात 250 ते 300 रुपये किलो दराने विकली जाते. जर तुम्ही मोठ्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्सना त्यांच्या आवडीनुसार थेट मशरूमचा पुरवठा करत असाल तर तुम्हाला ते 500 रुपये प्रति किलो दराने मिळू शकतात.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply