नवी दिल्ली, (Manu Bhaker and Neeraj Chopra Relationship) स्टार शूटर मनू भाकर आणि नीरज चोप्रा यांच्यात तसं काहीतरी आहे याच्या चर्चा समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. निरज आणि मनू यांचा विजयानंतरचा आनंद व्यक्त करतानाचा व्हिडीयो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यावरून अनेकांनी दोघांच जमलं असं ठरवून मोकळे झाले आणि त्यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगवू लागले.
खरं तर निरज आणि मनू हे दोघेही त्यांच्या करियरशी अत्यंत प्रामाणिक आहेत. मनू भाकर हिने 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्य पदक पटकाविले आहे. तिच्या या कामगिरीने भारताच्या खेळ विश्वात नवा विक्रम तयार केला आहे. मात्र सध्या तिच्या यशापेक्षा जास्त चर्चा तिच्या आणि निरज चोप्रा याच्या रिलेशनशीपची जास्त चर्चा होताना दिसतेयं. निरजला ऑलिंम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये रौप्य पदक मिळाले आहे.
लग्नाच्या अफवेला मनूचे प्रतिउत्तर
रिलेशनशीपच्या अफवेला मनूने पूर्णविराम दिला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या या दोन खेळाडूंमधील संभाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर ही अफवा सुरू झाली. मनू भाकरची आई नीरज चोप्राच्या डोक्यावर हात ठेवून कौतूक करताना दिसली तेव्हा अशा बातम्यांना आणखी चालना मिळाली. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले आहे.
22 वर्षीय नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकच्या यशाबद्दल माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लग्नाच्या अफवेलाही प्रत्युत्तर दिले. ती स्पष्ट शब्दात म्हणाली की, ‘माझ्या आणि नीरजमध्ये जे घडतंय तसं काही नाही. तो माझा वरिष्ठ खेळाडू आहे.’ मनू भाकर 10 आणि 25 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत खेळते. नीरज चोप्रा हा भालाफेकपटू आहे.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर मनू भाकर 3 महिन्यांचा ब्रेक घेत आहे. ती म्हणाली, ‘मी ब्रेकच्या वेळी व्हायोलिन वाजवणार आणि घोडेस्वारी संस्थेत सहभागी होणार आहे. साशिवाय तिने पुढच्या वेळी चांगली कामगिरी करेल असे आश्वासनही दिले. पुढील ऑलिम्पिक 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणार आहे.
पॅरिस 2024 मध्ये पहिले पदक जिंकल्यानंतर मनू भाकरने सांगितले होते की, मला यात भगवत गीताचीही मदत मिळाली. ती म्हणाली की, ‘गीता माझ्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवर उपाय आहे. पहिल्यांदा आईने मला गीता वाचायला सांगितले. मी वाचायला सुरुवात केली आणि मला त्याचा फायदा झाला. भगवत गीता मनूच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. मनू भाकर भारतात आल्यावर तीचे जंगी स्वागत करण्यात आले. यासंबंधित एका प्रश्नावर मनूने सांगितले की, अशा भव्य स्वागताची अपेक्षा तिला मुळीच नव्हती.
मनू भाकरबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?
वयाच्या 16 व्या वर्षी मनू भाकरने राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. सध्या ती पंजाब विद्यापीठातून लोक प्रशासनात पदवी घेत आहे.
वयाच्या 14 व्या वर्षी शूटिंगला सुरुवात केली
चॅम्पियन मनूला टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसारखे खेळ खेळायला नेहमीच आवडायचे. वयाच्या 14 व्या वर्षी तीने नेमबाजीत हात आजमावण्याचा निर्णय घेतला.
ती सध्या काय करते?
लेडी श्री राममधून मनू भाकरने युनिव्हर्सल पब्लिक सेकेंडरी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. मनूने 2021 मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली.
मनू भाकर हिचे खेळाव्यतिरिक्त छंद
अर्जेंटिना (2018) ब्युनोस आयर्स येथे झालेल्या युवा ऑलिम्पिक खेळांच्या उद्घाटन समारंभात मनूची भारतासाठी ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली. मनूला खेळाव्यतिरिक्त संगीत, वाचन, चित्रकला, स्केचिंग, नृत्य आणि कोडी सोडवण्याची आवड आहे.
निरज चोप्राबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?
नीरज चोप्राचा जन्म हरियाणातील पानिपत जिल्ह्यात झाला, पानिपत हे युद्धासाठी प्रसिद्ध आहे. नीरजचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी येथील खांद्रा या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या घरात झाला. नीरजने प्राथमिक शिक्षण पानिपत येथूनच केले. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर नीरज चोप्रा यांनी चंदीगडमधील बीबीए महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि तिथून पदवी प्राप्त केली.
लहानपणी लठ्ठ होते, म्हणून स्टेडियमला जायला लागले
नीरज लहानपणी खूप लठ्ठ होता, त्यामुळे गावातील इतर मुलं त्याची चेष्टा करत असत, त्याच्या लठ्ठपणामुळे त्याच्या घरातील सदस्यांनाही त्रास होत होता, त्यामुळे त्याचे काका त्याला वयाच्या 13 व्या वर्षापासून धावण्यासाठी स्टेडियममध्ये घेऊन जाऊ लागले. मात्र यानंतरही त्याला शर्यतीचे काही वाटले नाही. स्टेडियममध्ये जाताना त्याने इतर खेळाडूंना भाला फेकताना पाहिले, त्यामुळे त्यानेही त्यात भाग घेतला. तिथून त्याने जी भालाफेक करायला सुरुवात केली ती आता ऑलिम्पिकच्या लक्ष्यावर आली आहे.
2016 मध्ये लष्कराचे नायब सुभेदार झाले
अभ्यासासोबतच तो भालाफेकीचा सरावही करत राहिला, या दरम्यान त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली. नीरजने पोलंडमध्ये 2016 IAAF वर्ल्ड U-20 चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. यावर खूश होऊन लष्कराने त्यांची राजपुताना रेजिमेंटमध्ये कनिष्ठ आयोग अधिकारी म्हणून नायब सुभेदार म्हणून नियुक्ती केली. खेळाडूंना सैन्यात अधिकारी म्हणून क्वचितच नियुक्ती मिळते, पण नीरजला त्याच्या कौशल्यामुळे थेट अधिकारी बनवले गेले.