मुंबई : (Ladka Bhau Yojana) भारताता बेरोजगारीची समस्या हा चिंतेचा विषय आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीतसुद्धा विरोधकांनी याच मुद्यावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी भारत सरकार आणि राज्य सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. जेणेकरून बेरोजगार तरूणांचा रोजगाराचा प्रश्न मार्गी लागू शकेल. बेरोजगार तरूणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार तरूणांना दरमहा दहा हजार रूपये भत्ता देणार आहे.
नुकत्याच सादर झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात तरूण बेरोजगारांसाठी एक योजना सुरू केली गेली आहे. ज्याचं नाव मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) आहे पण त्याला लाडका भाऊ योजना देखील म्हंटलं जात आहे. (लाडका भाऊ योजना हे योजनेचं अधिकृत नाव नाही) या योजनेअंतर्गत राज्य सरकार युवकांना मोफत प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षण घेताना तरूणांना आर्थिक पाठबळ मिळणेही आवश्यक आहे त्यासाठी सरकार प्रशिक्षणासोबतच दरमहा दहा हजार रूपयांची मदतही करणार आहे.
या योजनेअंतर्गत तब्बत 10 लाख बेरोजगार तरूणांना लाडका भाऊ योजनेचा लाभ होणार आहे. राज्यातील बहूसंख्य तरूणांकडे शैक्षणीक पात्रता आहे, मात्र त्यांच्यात कौशल्याचा अभाव आहे. राज्यातल्या तरूणांना कौशल्य विकासासाठी मिळणारी ही सुवर्ण संधी आहे.
या योजनेअंतर्गत युवक त्यांच्यातील कौशल्य विकसीत करू शकतात व त्या आधारे कुठेही नोकरी मिळवू शकतात. इतकेच काय तर स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात. राज्यातील जास्तीत जास्त तरूणांना याचा लाभ घेता यावा यासाठी सरकार 6,000 कोटी रूपये खर्च करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेचे उद्दिष्ट
बेरोजगारीच्या समस्येवर तोडगा काढणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्यातील तरूण तांत्रिक कौशल्य विकसित करू शकतात. या कौशल्याच्या बळावर त्यांना भविष्यात नोकरी किंवा व्यवसायासाठी दारं उघडले जातील. सध्याच्या घडीला अनेक क्षेत्रात कुशल तरूणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे मात्र कौशल्याअभावी या संधीचा लाभ तरूणांना घेता येत नाही. ही तूट भरून काढण्यासाठी या योजनेचा फायदा होऊ शकतो.
लाडका भाऊ योजनेचे फायदे (Ladka Bhau Yojana Benefits)
- राज्यातील बेरोजगार तरूणांना या योजनेचा लाभ कसा होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया.
- या योजनेअंतर्गत राज्य सरकार दरवर्षी 10 लाख लाभार्थ्यांना मोफत कौशल्य तांत्रिक प्रशिक्षण देणार आहे.
- लाडका भाऊ योजनेअंतर्गत फक्त मोफत प्रशिक्षणच नाही तर लाभार्थ्याला दरमहा दहा दजार रूपयांचा भत्ता देखील देण्यात येणार आहे.
- याशिवाय जे तरूण 12 वी उत्तीर्ण आहेत त्यांना दरमहा 6,000 रूपये देण्यात येणार आहे.
- आयटीआयचा डिप्लोमा असणाऱ्यांना दरमहा 8,000 रूपये भत्ता मिळणार आहे.
- या योजनेचा कालावधी हा सहा महिन्यांचा आहे. म्हणजे लाभार्थ्याला इंटनशीपसाठी सहा महिने भत्ता मिळेल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला मिळणारी रक्कम त्याच्या बँक खात्यात थेट हस्तांतरीत होणार आहे. यामध्ये कोणीही मध्यस्थी राहाणार नाही.
- या योजनेच्या लाभार्थ्याला कौशल्य प्रशिक्षण सहज घेता येईल आणि स्वतःचा रोजगार देखील सुरू करता येईल.
- लाडका भाऊ योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या युवकांना तांत्रिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. राज्यातील बेरोजगारी कमी होण्यासाठी मदत होईल. युवक स्वावलंबी होतील.
महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे? (Who can apply for ladka bhau yojana)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही निकष दिलेले आहेत. या नियमांची पुर्तता करणाऱ्या बेरोजगार तरूणांना याचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचे पात्रता निकष काय आहे ते जाणून घेऊया.
या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील तरुण नागरीक घेऊ शकतात. अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे, तसेच 35 वर्षांपेक्षा जास्त नको.
युवक हा डिप्लोमा पास किंवा स्नातकोत्तर असावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवक बेरोजगार असणे आवश्यक आहे. ज्याची डिग्री किंवा डिप्लोमा हा शासनमान्य संस्थेतून असणे आवश्यक आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराचे आधारकार्ड त्याच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच काही कागदपत्रांची आवश्यकता आहे.
लाडका भाऊ योजनेसाठी लागणारे कागदपत्र (Ladka Bhau Yojna Documents)
- आधार कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- वय प्रमाणपत्र
- चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- बँक खाते
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करावा? (How to apply for ladka bhau yojana)
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट https://www.rojgar.mahaswayam.gov.in वर जावे लागेल.
- वेबसाईटच्या होम पेजवरच तुम्हाला नोंदणी असे लिहलेले दिसेल त्यावर क्लिक करावे.
- क्लिक केल्यानंतर योजनेशी संबंधित अर्ज तुमच्यासमोर उघडेल. या अर्जामध्ये तुम्हाला सर्व माहिती काळजीपूर्वक तपशीलवार भरावी लागेल. ही माहिती अचूक असणे आवश्यक आहे.
- नाव आणि जन्मतारिख ही आधार कार्डवर नमुद असलेलीच टाकावी.
- सर्व माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल.
- तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड सेट करावा लागेल.
- तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो तुम्हाला वेबसाईटवर टाकावा लागेल. Conform वर क्लिक केल्यानंतर आणखी एक विंडो ओपन होईल.
- त्यात तुम्हाला आणखी काही माहिती भरायची आहे. जसे की, शैक्षणीक पात्रता, जात प्रवर्ग आणि इतर माहिती विचारल्या प्रमाणे
- आपण स्यंरोजगार करण्यासाठी इच्छुक आहात का हे हो किंवा नाही मध्ये प्रविष्ठ करायचे आहे.
- सर्व माहिती भरून झाल्यानंतर परत एकदा पासवर्ड विचारण्यात येईल जो तुम्ही आधिच बनवलेला असेल. तो टाकल्यानंतर फर्म सबमिट करावा.
- अशाप्रकारे तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.
लाडका भाऊ या योजनेशी संबंधीत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न- महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
उत्तर- या योजनेचा लाभ बेरोजगार विद्यार्थी युवकांना मिळणार आहे. ज्यांचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि 35 वर्षांपेक्षा कमी आहे.
प्रश्न- महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेंतर्गत किती आर्थिक मदत दिली जाईल?
या योजनेंतर्गत युवकांना प्रशिक्षणादरम्यान स्नातक आणि स्नातकोत्तर युवकांना 10,000 रूपये, आयटीआय डिप्लोमा धारकांना 8,000 रूपये आणि 12 वी पास युवकांना 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
प्रश्न- महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेसाठी विहित पात्रता काय आहे?
या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या तरुण लाभार्थीचे वय 18 वर्षांवरील आणि 35 वर्षाखालील असावे. उमेदवार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
प्रश्न- महाराष्ट्र लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करावा?
तुम्ही https://www.rojgar.mahaswayam.gov.in/ अधिकृत वेबसाइटवर नोंदणी फॉर्म भरून या योजनेसाठी अर्ज करू शकता.
प्रश्न- लाडका भाऊ योजनेंतर्गत कसा लाभ मिळणार?
या योजनेंतर्गत दरवर्षी 10 लाख लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. सध्या या योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. ज्या संस्था किंवा कंपन्यांकडे कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असतील ते सरकारच्या पोर्टलवर माहिती देतील. त्यामाहितीच्या आधारे नोंदणी केलेला उमेदवार अर्ज करू शकेल. संबंधीत कंपनीने उमेदवारास इंटर्नशीपसाठी होकार दिल्यास इंटर्नशीप सुरू केल्यानंतर पात्रतेनुसार भत्ता खात्यात जमा होईल.