नवी दिल्ली : (Kargil Vijay Diwas 2024 Marathi) कारगिल विजय दिवसाच्या 25 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलै रोजी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देणार आहेत. ते शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतील. रविवारी, लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर, ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बीडी मिश्रा यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात सचिवालयात बैठक घेतली. एलजीने विभागीय सचिव / उपायुक्त कारगिल, पोलिस आणि लष्करी अधिकाऱ्यांशी अनेक मुद्यांवर चर्चा केली. कारगिल युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण समारंभास उपस्थित राहण्याबरोबरच पंतप्रधान शूर महिलांशीही संवाद साधतील. त्यांच्यासाठी हेलिपॅडवर ग्रीन रुम तयार करण्यात येणार आहे.
सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना मिश्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एलजी 24 जुलै रोजी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला भेट देतील आणि व्यवस्थेची पाहणी करतील.
23 तारखेला पोहोचेल SPG टीम
मेजर जनरल मलिक म्हणाले की, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) टीम 23 जुलै रोजी येथे पोहोचेल आणि लष्कर, पोलीस आणि नागरी प्रशासन यांच्याशी समन्वय साधण्यासाठी बैठक घेणार आहे.
बलिदानाची भूमी असलेले कारगिल आता पर्यटन स्थळ झाले आहे. कारगिल, जिथे 25 वर्षांपूर्वी पाकिस्तानी तोफा घुसल्या होत्या, आज भारतीय लष्कराच्या शूर जवानांचे असामान्य शौर्य देशवासीयांना आकर्षित करते.
1999 च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढलेले कारगिलचे रहिवासी आज वाढत्या पर्यटनात चांगले भविष्य शोधत आहेत. कारगिल विजयाच्या रौप्यमहोत्सवाची जय्यत तयारी सुरू असतानाच या भागात सध्या पर्यटकांची गर्दी होत आहे. पूर्वीचे पर्यटक कारगिलला न थांबता थेट लेहला जात असत.मात्र आता लडाखला जाणारे पर्यटक द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला नक्कीच भेट देतात आणि येथील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करूण त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.
लष्कराने नुकतेच कारगिलच्या आर्यन व्हॅलीमध्ये असलेले खालुबर युद्ध स्मारक पर्यटकांसाठी खुले केले आहे. परमवीर चक्र विजेते कॅप्टन मनोज पांडे आणि महावीर चक्र विजेते कॅप्टन केसी नुंगरुम यांना या ठिकाणी विरगती प्राप्त झाली होती .
1999 नंतरच्या युद्धाचे पुढचे वर्ष शत्रूच्या गोळीबारामुळे प्रभावित कारगिलसाठी फारसे चांगले नव्हते. सन 2000 मध्ये कारगिलमध्ये तीन डझनहून कमी पर्यटक पोहोचले होते, मात्र आज 25 वर्षांनंतर हा आकडा तीन लाखांवर पोहोचू लागला आहे.
2023 मध्ये सुमारे तीन लाख पर्यटक कारगिलला पोहोचले होते, त्यापैकी 4655 परदेशी होते. या वर्षी आतापर्यंत सुमारे 1.90 लाख पर्यटक आले असून त्यापैकी 1550 परदेशी आहेत. हा आकडा वाढतच जाणार आहे. कारगिल जिल्ह्य़ात मे ते सप्टेंबर या कालावधीत पर्यटनाला सुगीचे दिवस असतात.
2018 सालापर्यंत कारगिलमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या एक लाखापेक्षा कमी होती. गेल्या पाच वर्षांत पर्यटनात जवळपास तिपटीने वाढ झाली आहे. यामुळे राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. टूर अँड ट्रॅव्हलशी संबंधित कारगिलचे हसन पाशा सांगतात की, पर्यटनात झालेली वाढ उत्साहवर्धक आहे.
गेल्या दोन दशकांत कारगिल जिल्ह्यात हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होम स्टेची संख्या झपाट्याने वाढली आहे. पर्यटन क्षेत्रात लोकांना सहज रोजगार मिळत आहे.
1999 पर्यंत कारगिलमध्ये मोजकीच हॉटेल्स होती. आज जवळपास तीनशे हॉटेल्स, गेस्ट हाऊस आणि होम स्टे आहेत. लडाखमधील नवीन होम स्टे धोरणांतर्गत लोकांना होम स्टे बनवण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. यासोबतच पर्यटकांना त्यांच्या होम स्टेमध्ये चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे प्रशिक्षण दिले जात आहे.
युद्धाच्या आठवणी पाहून पर्यटक होतात भावूक
चंदीगडहून वडिलांसोबत कारगिलला पोहोचलेली सारिका सांगते की, द्रासला आल्यानंतर ती अवाक झाली आहे. सैन्यातील सैनिकांनी कोणत्या परिस्थितीत उंच आणि दुर्गम शिखरे चढून शत्रूचा पराभव करून विजय संपादन केला असेल, हे ती शब्दांत व्यक्त करू शकत नाही.
सारिकाप्रमाणेच द्रास वॉर मेमोरियलमध्ये पोहोचलेले इतर पर्यटकही तेथील संग्रहालयात लष्कराने जतन केलेल्या युद्धाच्या आठवणी पाहून भावूक होतात.
नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्याचे काम : सहाय्यक पर्यटन संचालक
कारगिलमधील पर्यटन विभागाचे सहाय्यक संचालक रहमतुल्ला बट्ट सांगतात की, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. नवीन पर्यटन स्थळे विकसित करण्याचे काम सुरू आहे.
कारगिलमध्ये साहसी पर्यटन आणि हिवाळी पर्यटनासाठी प्रचंड क्षमता आहे. देश-विदेशातील पर्यटकांना येथे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
कारगिलला भेट देणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने कारवाई करत आहोत. अशा परिस्थितीत पर्यटन विभागही जिल्ह्यात हॉटेल आणि होम स्टे बांधण्यासाठी लोकांना प्रवृत्त करत आहे.
कारगिल युद्धाचा इतिहास (Kargil War History)
1999 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा विवादामुळे कारगिल युद्ध सुरू झाले. पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीतील कारगिलची उंच शिखरे काबीज केली, त्या बदल्यात भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ केले.
60 दिवस चालले कारगिल युद्ध
पाकिस्तानी घुसखोरांना हुसकावून लावताना भारताच्या शूर सैनिकांनी टायगर हिल आणि इतर चौक्यांवर कब्जा केला. कारगिल, लडाखमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील हे युद्ध 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालले. या युद्धात भारताचे 2 लाख सैनिक सहभागी झाले होते.
भारतीय सैन्याची कारगिल शौर्यगाथा
सैन्याचे मिशन यशस्वी करण्यासाठी अनेक शूर सुपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यापैकी एक म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने युद्धात विजय घोषित केला. कारगिल युद्धात भारतीय लष्कराच्या 527 जवानांच्या हौतात्म्यासोबतच पाकिस्तानचे 357 जवानही मारले गेले होते.
कारगिलला कसे जायचे? (How To Reach Kargil)
द्रास सेक्टर आणि कारगिलच्या इतर प्रेक्षणीय स्थळांवर जाण्यासाठी प्रथम तुम्हाला रस्त्याने किंवा विमानाने श्रीनगरला पोहोचावे लागेल. तिथून तुम्ही टॅक्सीद्वारे चार तासांत द्रासला पोहोचू शकता. इतर स्वस्त पर्याय देखील उपलब्ध आहेत.
तुम्ही लेहहून कारगिलच्या दिशेनेही येऊ शकता, परंतु रोमांचक प्रवासासाठी, बहुतेक पर्यटक श्रीनगरहून कारगिलला जाण्यास प्राधान्य देतात. यावेळी तुम्ही प्रवासादरम्यान सुंदर दृश्ये टिपू शकाल. श्रीनगरपासून द्रास सेक्टर 143 किलोमीटर अंतरावर आहे. कारगिल शहर तेथून 58 किलोमीटर अंतरावर आहे.