You are currently viewing कलेला स्वयंप्रकाशित करण्याची प्रेरणा देणारा काजवा स्टार्टअप

कलेला स्वयंप्रकाशित करण्याची प्रेरणा देणारा काजवा स्टार्टअप

(Kajva Pune) आजच्या आधुनिक काळात आपली संस्कृती आणि परंपरा किती चांगल्या प्रकारे जपल्या जावू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शैलेश बडगुजर (Shailesh Badgujar) यांचा काजवा हा स्टार्टअप आहे. आपली मराठी संस्कृती दर्शवणाऱ्या शेकडो वस्तूंच्या प्रतिकृती तुम्हाला येथे पाहायला मिळेल. एखादी व्यक्ती तिच्या बालपणात हरवून जाईल असा अनुभव काजवा इथे भेट दिल्यानंतर हमखास येतो. इंजिनियरींगचे शिक्षण घेऊन दहा वर्ष सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून नोकरी केल्यानंतर शैलेश यांनी आपली कला जोपासत काहीतरी नवीन करण्याचे ठरविले आणि त्यातूनच काजवा या स्टार्टअपची सुरूवात झाली.

काळानुसार मागे पडत असलेली कारागीरांनी घडवलेली कलाकृती आपल्या स्टार्टअच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरच कौतुकास्पद आहे. आकर्षक अशा लाकडी देवळी, पोस्ट बॉक्स, लाकडी खेळणी, हँन्डमेड डायरी, वासुदेवाची प्रतिकृती, आकाश कंदील आणि अशा बऱ्याच गोष्टी पाहून त्या खरेदी करण्याचा मोह कदाचितच कोणाला आवरता येईल. येथे बनवलेल्या वस्तूंना फक्त महाराष्ट्रातच नाही तर विदेशातही मागणी आहे. काजवा या स्टार्टअपमुळे कारागिरांनी बनवलेल्या सुरेख कलाकृतींसाठी एक  चांगले व्यासपीठ तर लाभलेच आहे शिवाय आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी देखील याची मोठी मदत होत आहे.

कलेला व्यावसायीक स्वरूप देणे शक्य आहे

शैलेश बडगुजर यांचा काजवा हा स्टार्टअप सुरू करण्यामागची प्रेरणा अतिशय भावनिक आहे. आपल्यापैकी बहुतांश जण हे समाजाने आखून दिलेल्या चौकटीत संपूर्ण जीवन व्यतीत करतात. प्रत्येकाच्याच आत एक कला दडलेली असते. ती कला कुठलीही असू शकते. फार कमी जण ती जोपासत एक समाधानी आयुष्य जगतात. मात्र अनेकांना आपल्या भौतीक गरजा पुर्ण करण्यासाठी मनाविरूद्ध नोकरी किंवा व्यावसाय करावा लागतो. आपल्यात असलेल्या कलेतून घर खर्च चालवणे शक्य होईलच असा आत्मविश्वास फार कमी जणांना असतो.

आपल्याला एकच आयुष्य लाभलेलं आहे, योग्य प्रयत्न आणि नियोजन केल्यास प्रत्येकाला त्यातून समाधानकारक पैसा कमावणे शक्य आहे. आपल्या कलेवर विश्वास ठेवून त्याला व्यावसायीक रूप कसे देता येईल याचा विचार केल्यास नक्कीच मार्ग सापडतो. याच आत्मविश्वासाने शैलेश यांनीसुद्धा सॉफ्टवेर डेव्हलपरची नोकरी सोडून आपल्या कलेला व्यावसायीक स्वरूप देण्याचे ठरविले आणि काजवा या अतिशय सुंदर स्टार्टअपचा जन्म झाला. आज या स्टार्टअपच्या माध्यमातून ते समाधानकारक उत्पन्न तर कमवतच आहेत शिवाय इतरांसाठी प्रेरणा देखील ठरत आहेत.

संपर्क-

काजवा
Shop Number 9, Mangalprabha Society, Pipeline Road Shinde vasti, Ravet, Pimpri Chinchwad, Pune 412101
📞7798633344

 

 

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply