You are currently viewing How To use Google Trends Marathi : गुगल ट्रेंड्सचा वापर कसा करावा?
Google trends Marathi 3

How To use Google Trends Marathi : गुगल ट्रेंड्सचा वापर कसा करावा?

मुंबई : (How To use Google Trends Marathi) तुम्ही जर ब्लॉगींग करत असाल किंवा वेबसाईटवर कंटेंट अपलोड करण्याचा व्यावसाय किंवा नोकरी करत असाल तर तुमच्या समोर एक प्रश्न कायमच राहत असेल, तो म्हणजे सध्या लोकं गुगलवर काय सर्च करत आहेत. याची माहिती गुगल स्वतःच देते. गुगलच्या या टुलचे नाव आहे. गुगल ट्रेंड्सचा नेमका फायदा काय? ते कसे वापरावे? याबद्दल अनेकांना फार कमी माहिती आहे. त्याचा वापर करून आपण एखादा कंटेंट कसा बनवू शकतो हे या लेखातून जाणून घेणार आहोत.

गुगल ट्रेंड्स कसे वापरावे?

तुम्ही जर ब्लॉगींग करत असाल किंवा बेवसाईटवर कंटेंट अपलोड करत असाल तर गुगल ट्रेंड्स हे तुमच्यासाठी खुप कामाचे टुल आहे. सध्याच्या घडीला गुगलवर लोकं नेमकं काय सर्च करत आहेत हे माहिती करण्यासाठी या टुलचा पावर होतो.

जगात किंवा देशात लोकं गुगलवर काय सर्च करत आहेत याची माहिती गुगल ट्रेंडच्या माध्यमातून मिळते. हे टुल पावरण्यासाठी तुम्हाला गुगल ट्रेंड्सच्या trends.google.com या वेबसाईटवर जावे लागेल.  यामध्ये तुम्हाला Home, Explore आणि Trending असे तीन कॅटेगरी दिसतील. यामध्ये तुम्ही Trending या कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर 8 टॉपीकची यादी दिसेल. हे टॉपीक म्हणजे किवड्स आहेत.

How To use Google trends
How To use Google trends

त्याच्या समोरच एक आकडा असेल हा आकडा म्हणजे किती लोकं या टॉपीकशी संबंधीत गुगल सर्च करत आहेत. च्याचा सर्च सर्वात जास्त आहे तो टॉपीक सर्वात वर दाखवला जातो. असे उतरत्या क्रमाने आठ सात ते आठ टॉपीकची यादी देण्यात येते. तुम्ही तुमच्या सोयीने या टॉपीक्सवर काही कंटेंट पब्लिश केला तर तो रॅन्क होण्याची शक्यता अधिक असते. मात्र यासाठी तुमच्या साईटची रॅन्कींग चागली असणे आवश्यक आहे.

How To use Google trends (1)
How To use Google trends (1)

नवीन वेबसाईटने या किवर्ड्सवर काम केल्यास त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता फार कमी आहे. यामचे कारण म्हणजे अशा किवर्ड्सवर स्पर्धा मोठ्या प्रमाणात असते. मोठमोठ्या साईट्स या किवर्ड्सवर आधीच काम करत असताता. अशात नवीन वेबसाईटने या किवर्डवर काही कंटेंट अपलोड केल्यास त्याची बेबसाईट रॅन्क करण्याची शक्यता कमी असते. पण सातत्याने असे टॉपीक निवडून किंवा त्याच्याशी संबंधीत किवर्ड्सवर काम केल्यास भविष्यात याचा मोठा लाभ नक्कीच होण्याची शक्यता आहे.

या शिवाय तुम्ही एखाद्या किवर्डबद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तो ठराविक किवर्ड गत काळात कसा चालला म्हणजे त्यावर किती लोकांनी सर्च केलं या संबंधी सगळा ग्राफ तुम्हाला तारखेनुसार उपलब्ध होतो. आपण तयार करत असलेला कंटेंट आऊट ऑफ ट्रेंड तर नाही ना हे तपासण्यासाठी या टुलचा सर्वाधिक वापर होतो.

गुगल ट्रेंड्सचे फायदे जाणून घेऊया

सध्या कोणता विषय ट्रेंडींगमध्ये आहे ते जाणून घेऊ शकता

कंटेंन्ट सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा कणा आहे. कमी दर्जाच्या लेखांसह, तुमच्या वेबसाइटवर क्लिक केले तरीही ते पूर्णपणे दुर्लक्षित केले जाईल. म्हणूनच तुम्हाला तुमच्या सामग्रीमध्ये मूल्य जोडण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून लोक तुम्हाला शोधू शकतील, तुमच्याबद्दल बोलू शकतील आणि तुमच्या वेबसाइटची सदस्यता घेऊ शकतील, यामुळे तुम्हाला चांगला प्रेक्षक वर्ग मिळेल. यासाठी गुगल ट्रेंड्स महत्त्वाची भूमीका बजावतो.

Google Trends वापरून, तुम्ही एका विशिष्ट वेळी आणि ठिकाणी सर्वाधिक चर्चेत असलेले ऑनलाइन विषय कोणते आहेत हे शोधू शकता. हे तुमच्या कंटेन्ट क्रिएशनला चालना देऊ शकते आणि कोणते लेख वाचकांना सर्वात जास्त गुंतवून ठेवतील याची कल्पना देऊ शकते. फक्त संबंधीत कंटेन्ट तुमच्या व्यवसाय किंवा उद्योगाशी संबंधित असल्याची खात्री करा. उदाहरणार्थ, तुमच्या मालकीचे कॉफी शॉप असल्यास आणि Google वर मेक्सिकन खाद्यपदार्थ प्रचलित असल्याचे पाहिल्यास, त्याबद्दल लिहिल्याने कदाचित काही फायदा होणार नाही.

वरील कॉफी शॉपचे उदाहरण वापरून ब्रॉड कीवर्ड्ससह प्रारंभ करणे ही एक चांगली रणनीती आहे, उदाहरणार्थ ‘कॉफी’ साठी ट्रेंड पहा. त्यावर काय ट्रेंडिंग आहे ते पहा आणि त्यावर कंटेंट लिहा. असे केल्याने, तुम्हाला आढळेल की व्हिएतनामी आइस्ड कॉफी हा तुमच्या क्षेत्रातील ट्रेंडिंग शोध विषय आहे, त्यामुळे त्याबद्दल लेख लिहिणे तुमच्या ब्लॉगसाठी उत्तम ठरू शकते.

बॅक लिंकिंगसाठी साइट उपलब्ध होतील

नेहमी लक्षात ठेवा की बॅक लिंकिंग करत असताना, तुम्ही विश्वासार्ह साइटशी लिंक करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यांना अधिकाराची भावना आहे. तुमची वेबसाइट जितकी जास्त ठिकाणांशी लिंक असेल तितकी तुमची लोकप्रियता Google आणि Bing सारख्या टॉप सर्च इंजिनमध्ये असेल.

पुन्हा, आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे, तुमच्या व्यवसाय आणि उद्योगाशी संबंधित लेख आणि दुवे निवडण्याची खात्री करा. असंबद्ध सामग्री स्पॅम म्हणून पाहिली जाऊ शकते आणि प्रत्यक्षात आपल्या एकूण शोध परिणामांना हानी पोहोचवू शकते.

अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply