मुंबई : (How to reduce stress Marathi) आजच्या काळात, तणाव आणि चिंता या अतिशय सामान्य समस्या झाल्या आहेत, प्रत्त्येक दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा तणाव आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? की, सतत तणावात राहणे दीर्घकालीन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यामुळेच सध्या जगभरातील लोक पुढे येत आहेत आणि तणावाविषयी खुलेपणाने बोलत आहेत आणि समाजात त्याबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहेत. तणावपूर्ण आयुष्य अनेक गंभिर समस्यांना आमंत्रण देत असतं. त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल त्याबद्दल आपण जाणून घेऊया.
तणाव आणि चिंता टाळण्यासाठी महत्वाच्या टिप्स (Tips to reduce stress)
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण सुरुवातीपासूनच तणाव आणि चिंता गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. म्हणून, येथे आपण तणाव आणि चिंता टाळण्यासाठी आणि त्यावर मात करण्यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत.
व्यायाम हे सर्वात मोठे औषध (Stress Reduce medicine)
तणाव आणि चिंता टाळण्यासाठी सर्वप्रथम रोज व्यायाम करण्याची सवय लावा. असे केल्याने, आनंदी हार्मोन्स शरीरात सोडले निर्माण, ज्यामुळे मूड सुधारतो आणि मानसिक तणाव दूर होतो. यासाठी श्वासोच्छवासाचे व्यायाम देखील फायदेशीर मानले जातात. त्यामुळे रोज सकाळी किमान अर्धा तास झुंबा, एरोबिक्स, योगासने यांसारखी तुमची आवडती कसरत करा. अगदीच जीमला जाणे शक्य नसल्यास युट्यूबवर काही गायडेड व्यायाम तुम्ही करू शकता. व्यायामासारखे दुसरे औषध नाही.
पुरेशी झोप घ्या
जर एखाद्या दिवशी तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या मूड आणि एनर्जी लेव्हलवर दिसून येतो. अशा स्थितीत विचार करा की जर तुम्ही तणावामुळे रोज नीट झोपत नसाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर किती वाईट परिणाम होईल. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोपण्याआधी कोमट पाण्याने आंघोळ केल्यास शांत झोप लागते. झोपण्याआधी तुम्ही युट्यूबवर गाईडेड मेडीटेशन करू शकता. किंवा स्ट्रेस रिलीफ करणारे पॉडकास्टसुद्धा पाहू शकता. दुरऱ्या दिवशीची चिंता करण्यापेक्षा त्या दिवसासाठी प्लॅनिंग आखा आणि त्यानुसार काम करा.
आहारात पोषक तत्वे किती आहेत याचा अंदाज घ्या
आजकाल जंक फूड आपल्या आजूबाजूला आहे. तुम्ही स्वतःला यापासून कितीही दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जंक फूड तुमच्यापर्यंत एक ना एक मार्गाने पोहोचेल. परंतु, तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होणार आहे. निरोगी आहाराचे नियमित पालन करणे सोपे काम नाही, परंतु आरोग्यासाठी ते करावेच लागते. शक्यतो आपल्या आहारात संपूर्ण धान्य, ताजी फळे आणि भाज्या, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. तुम्ही घेत असलेल्या अन्नात किती पोषक तत्व आहेत तसेच तुम्हाला दिवसभरात किती पोषक तत्वांची आवश्यकता आहे याचा विचार करूनच आहाराला प्राधान्य द्या.
‘स्क्रीन टाईम’ कमी करा
कॉम्प्युटरवर काम करण्यापासून ते टीव्ही पाहणे आणि फोन वापरण्यापर्यंत, आपण सर्व करतो. पण जास्त स्क्रीन टाइमचा मानसिक आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो हे तुम्हाला माहीत आहे का? म्हणून, स्क्रीन वेळ कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. जसे ऑफिसच्या कामानंतर कॉम्प्युटर वापरू नका. मोबाईलवर तासनतास व्हिडिओ पाहणे टाळा. अनेकांना रिल्स पाहाण्याचे वेसन असते. याचा मानसीक आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो. तुमची प्राथमिकता लक्षात घ्या. दिवसभरात आपण किती प्रॉडक्टीव्ह वेळ घालवतोय याचा विचार करा. तासंतास रिल्स पाहत रेंगाळत बसल्याने आपल्याला त्यातून काय मिळणार आहे ते समजणे आवश्यक आहे.
मोबाईल आणि इंटरनेटवर वेल घालवण्यापेक्षा अशा मित्र मैत्रीनींना भेटा ज्यांच्याशी तुम्ही मनमोकळेपणाने गप्पा मारू शकता. तुमच्या जीवणातल्या समस्या किंवा अनुभव त्यांच्याशी शेअर केल्याने तुम्हाला एक वेगळा दृष्टीकोण समजू शकतो. तुम्ही नेमके कोणत्या ट्रॅकवर आहात हे समजल्याने आयुष्यातील तणाव कमी करण्याच्या दृष्टीने तुम्ही पाऊंलं उचलू शकता.
कॅफिनचे सेवन कमी करा
जर तुम्हाला कॉफी किंवा चहा पिण्याची सवय असेल तर ती आजच कमी करा. चहा प्यायल्याने तुमचा ताण कमी होईल असे वाटत असले तरी. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. त्यात असलेले कॅफीन तुमच्या मानसिक आरोग्यावर आणखी परिणाम करते, ज्यामुळे तणाव आणि चिंतेची लक्षणे तीव्र होऊ शकतात. अनेकांना चहा किंवा कॉफी गोड लागते.
सतत बैठे काम करणारे इतरांच्या तुलनेत जास्त चहा-कॉफीचे सेवन करतात. बैठे काम करणाऱ्याची शारिरीक हालचालही कमी असते त्यामुळे त्यांच्या कॅलरी खर्च होण्याचे प्रमाणही कमीच असते. अशात जास्त प्रमाणात चहा कॉफीचे सेवन केल्याने दिर्घकालीन समस्या तर उद्भवतातच शिवाय झोपेचे तंत्र बिघडल्याने तणावही वाढतो. चहा कॉफीपेक्षा ग्रिन टीला प्राधान्य दिल्यास तणाव तर कमी होईलच शिवाय तुमच्या शरिरात कॅलरी इनटेकसुद्धा कमी होईल.