मुंबई : मध्यमवर्गीय लोकं आपल्यावरचा ‘मिडल क्लास’ (Middle Class Trap) हा ठपका पुसण्यासाठी वर्षानुवर्षे चपला झिजवतात. अनेक जण अपार कष्ट करून आपला आर्थिक स्थर बदलण्यात यशस्वी होतातही. तर, दुसरीकडे अनेक जण असेही आहेत जे स्वतःला उच्च मध्यम वर्गीय किंवा श्रीमंत असल्याचे भासवतात. श्रीमंत नसताना तसे भासवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. भारतासारख्या सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण देशात आर्थिक विषमताचे प्रमाण मोठे आहे. प्राइज या वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील 4 टक्के लोकसंख्या श्रीमंत आणि 13 टक्के गरीब असल्याचे सांगितले. PRICE (People Research on India’s Consumer Economy) च्या सर्वेक्षणात असे म्हटले आहेिकी एका वर्षात 1.25 लाख रुपयांपेक्षा कमी कमावणारे कुटुंब गरीब आहे. याच सर्वेक्षणात 2 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या कुटुंबांना श्रीमंत या श्रेणीत समाविष्ट केले आहे. PRICE नुसार, 5 लाख ते 30 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेली कुटुंबे मध्यमवर्गात येतात.
लोकसंख्येच्या बाबतीत, देशातील 31 टक्के लोकसंख्या मध्यमवर्गीय आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांची वार्षिक उत्पन्नाची श्रेणी 1.25 लाख ते 5 लाखांपर्यंत ठेवण्यात आली आहे. PRICE चा अंदाज आहे की पुढील 25 वर्षांत मध्यमवर्गीय लोकसंख्येची टक्केवारी 64 टक्क्यांपर्यंत वाढू शकते. उत्पन्नाच्या आधारे वर्ग ठरवण्याचे निकष वेगळे असतात. विविध सर्वेक्षणे/अहवालांमध्ये मध्यमवर्गीय कोण आणि श्रीमंत कोण हे समजून घेऊया.
Liquor Policy Scam : असा आहे मद्य घोटाळा ज्यामुळे केजरीवाल फसले
गरीब श्रीमंत आणि मध्यम वर्गीयांची आकडेवारी
- PRICE च्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की देशातील 3 टक्के कुटुंब श्रीमंत वर्गात मोडतात. ही अशी कुटुंब आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 30 लाखांपेक्षा जास्त आहे. भारतातील केवळ 3 टक्के लोकसंख्या श्रीमंत या श्रेणीत येते.
- देशात 30 टक्के कुटुंब आहेत ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख ते 30 लाख रुपये आहे. त्यांना मध्यमवर्गात ठेवण्यात आले आहे. कमाईपासून ते खर्च आणि बचत करण्यापर्यंत मध्यमवर्ग आघाडीवर आहे. लोकसंख्येमध्ये मध्यमवर्गीयांचा वाटा 31 टक्के आहे.
- देशातील 52 टक्के परिवार निम्न मध्यमवर्गीय श्रेणीत मोडतात. लोकसंख्येमध्येही त्यांचा समान वाटा आहे. वार्षिक 1.25 लाख ते 5 लाख रुपये कमावणाऱ्या कुटुंबांना या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. बचतीत निम्न मध्यमवर्गाचा वाटा फक्त 1 टक्का आहे.
- 1.25 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना ‘निराधार’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. देशातील 13 टक्के लोकसंख्या आणि 15 टक्के कुटुंबे या श्रेणीत येतात. या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचे आव्हान आहे, बचतीचा प्रश्नच उद्भवत नाही.
श्रीमंतांची संख्या झपाट्याने वाढली आहे
PRICE नुसार, 1994-95 मध्ये भारतातील ‘अतिश्रीमंत’ कुटुंबांची संख्या 98,000 होती. 2020-21 मधील आकडेवारी दर्शवते की देशातील 18 लाख कुटुंबं ‘अतिश्रीमंत’ आहेत. सर्वाधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या यादीत सुरत आणि नागपूरने सर्वात मोठी झेप घेतली आहे. लक्षात घ्या की, ही आकडेवारी 2020-21 ची आहे. 2024 ची आकडेवारी अद्याप उपलब्ध नाही. मात्र आपण अंदाज लावू शकतो.
भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबे कुठे राहतात?
महाराष्ट्रातील 6.4 लाख कुटुंबे ‘अतिश्रीमंत’ श्रेणीत मोडतात. 2021 मध्ये या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. PRICE च्या सर्वेक्षण निकालानुसार, महाराष्ट्र हे सर्वात श्रीमंत राज्य आहे. दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे जिथे 1.81 लाख ‘सुपर रिच’ घरे आहेत. गुजरातमध्ये 1.41 लाख आणि तामिळनाडूमध्ये 1.37 लाख ‘अतिश्रीमंत’ कुटुंब आहेत. PRICE च्या अहवालाला The Rise Of India’s Middle Class असे नाव देण्यात आले आहे.
प्रत्येक श्रीमंत कुटुंबाकडे आहेत तीन कार
सर्वेक्षणाच्या निकालावरून असे दिसून आले आहे की, ‘गरीब’ घरांमध्ये कार त्वचित आहेत. 2020-21 च्या आकडेवारीनुसार, प्रत्येक 10 पैकी 5 ‘निम्न मध्यमवर्गीय’ कुटुंबांकडे एक वाहन होते. 5 ते 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक 10 पैकी तीन कुटुंबांकडे कार आहे. 30 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या प्रत्येक कुटुंबाकडे कार आहे. ‘लक्षाधिशांच्या’ यादीतील प्रत्येक कुटुंबाकडे सरासरी तीन कार आहेत. प्रत्येक 100 पैकी 2 निम्न-मध्यमवर्गीय घरांमध्ये एअर कंडिशनर आहे. सर्वेक्षणानुसार, ‘अतिश्रीमंत’ वर्गातील निम्म्या घरांमध्ये एसी आहे.
मध्यमवर्गिय कुटूंबीयांनी या चुका टाळा
भारतातील बहुतेक मध्यमवर्गीय लोक श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात. परंतु, आर्थिक बाबींशी संबंधित चुकीच्या निर्णयांमुळे व्यक्ती चांगली बचत करू शकत नाही किंवा कुठेही गुंतवणूक करू शकत नाही, त्यामुळे श्रीमंत होण्याचे स्वप्न स्वप्नच राहते. त्याच वेळी ही प्रवृत्ती त्याला आणखी गरीब होण्याकडे ढकलते. अशा परिस्थितीत, काही चुका अवश्य टाळाव्या.
अनियंत्रित खर्च : अनेकदा मध्यमवर्गीय लोक पगार मिळताच पार्ट्यांना जातात किंवा महागड्या वस्तूंची खरेदी करतात. अनेक वेळा या वस्तूंचीही गरजही भासत नाही. एवढेच नाही तर आवश्यकतेपेक्षा महागडे मोबाईल किंवा टीव्ही खरेदी करणे यासारख्या खर्चामुळेही मध्यमवर्गीय लोक बचत करण्यापासून रोखतात. अशा परिस्थितीत ते टाळले पाहिजे.
क्रेडिट कार्डचा वापर : एकीकडे, क्रेडिट कार्ड ही खूप चांगली गोष्ट आहे जी आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडते. पण, विशेषत: मध्यमवर्गीय लोक आपला छंद पूर्ण करण्यासाठी त्याचा अनावश्यक वापर करू लागतात. मग खर्च वाढतात आणि ते वेळेवर भरू शकत नाहीत आणि शेवटी कर्जबाजारी होतात. अशा परिस्थितीत हे देखील टाळले पाहिजे.
फॅन्सी कारचा छंद : कार ही एक अशी वस्तू आहे ज्याचे मूल्य सतत कमी होत जाते. अशा परिस्थितीत, कोणतीही गरज नसताना आणि चांगली गुंतवणूक न करता फॅन्सी कार खरेदी करणे टाळा. मध्यमवर्गीय कुटुंबातील लोक अनेकदा चुकीचे निर्णय घेतात. तुम्हाला कार घ्यायची असली तरी सेकंड हँड कारकडे जाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
सबस्क्रिबशन : आजकाल, मध्यमवर्गीय लोक विविध रिटेल स्टोअर्स किंवा ऑनलाइन ॲप्सचे सदस्यत्व घेतात. यामध्ये लोक खूप पैसाही खर्च करतात. तर, या सदस्यत्वासाठी इतर अनेक पर्याय असू शकतात. हा अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो.