You are currently viewing Google Core Update 2024 Marathi : गुगलच्या नव्या अपडेट्सने वाजवले अनेक ब्लॉगर्सचे बारा!
Google Core Update 2024 Marathi

Google Core Update 2024 Marathi : गुगलच्या नव्या अपडेट्सने वाजवले अनेक ब्लॉगर्सचे बारा!

मुंबई : (Google Core Update 2024 Marathi) गुगलवर ब्लॉगींग करून लाखो रूपये कमावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांसाठी हा पूर्णवेळ व्यावसाय आहे. गुगलवर वेबसाईट बनवून त्यावर लेख म्हणजेच आर्टिकल पोस्ट करणे आणि त्यावरून वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमावणे हा सध्याच्या काळातला अतिशय ट्रेंडिंग व्यवसायांपैकी एक आहे. यामध्ये काही जण स्वतः मेहनत घेऊन, रिसर्च करून ब्लॉग तयार करतात. तर काही जण इतरांचे आर्टिकल कॉपी पेस्ट किंवा त्यामध्ये थोडा फार थोडा फार बदल करून ब्लॉग बनवतात. याशिवाय काही ब्लॉगर्स त्यांच्या वेबसाईटच्या माध्यमातून Affiliate Marketing देखील करतात. अनेक जण काही चोरटे मार्ग वापरून गुगलवरून मोठी कमाई करत असल्याने गुगलला याचा फटका सहन करावा लागत होता.

या सगळ्यांवर लगाम लावण्यासाठी गुगलने नवा अपडेट जारी केला आहे. गुगल कोअर अपडेट  2024  असं नाव त्याला देण्यात आलं आहे. या अपडेटमुळे अनेक ब्लॉगर्सला आणि वेबसाईटला याचा फटका बसला आहे. यामध्ये काही न्युज वेबसाईटचाही समावेश आहे. या नव्या अपटडेटच्या प्रभावाबद्दल अनेक जण उघडपणे बोलताना दिसत आहेत. तर अनेकांनी याबद्दल अनेकांनी चर्चा न करणे पसंत केले आहे.

या अपडेटमध्ये नेमके काय आहे आणि याचा कोणा कोणाला फटका बसणार आहे. तसेच याचा कोणाला फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार घेऊया.

काय आहे नवा अपडेट?

गुगल वेळोवेळी नवे अपडेट्स जारी करत असतो. याद्वारे काही पॉलीसी अपडेट केल्या जातात. यामागचा उद्देश म्हणजे अनाधिकृत गोष्टींना लगाम लावणे आणि गुगलच्या वापरकर्त्यांना चांगली सेवा आणि अनुभव प्रदान करणे हा आहे.  गुगलच्या नव्या अपडेट्स नुसार इतिहासात पहिल्यांदाच कंपनीने काही ठोस पाऊलं उचलली आहेत. गुगलने लो कॉलीटी कंटेन्ट पब्लिश करणाऱ्या वेबसाईटला सर्च रिजल्टमधून बाजूला करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लो क्लॉलिटी कंटेंट म्हणजेच खालच्या किंवा खराब दर्जाच्या कंटेंटमुळे गुगलच्या वापरकर्त्यांना असमाधानकारक अनुभवाचा सामना करावा लागत होता. अनेक वेबसाईट चोरट्या मार्गाने पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे ट्रिक्स वापरायचे ज्यामुळे वापरकर्त्यांची दिशाभूल होत असल्याचे गुगलला लक्षात आहे. या नव्या अपडेटनुसार असे करणाऱ्या सर्व वेबसाईट्स आता कचऱ्याच्या डब्यात जाणार आहेत.

एक्पायर डोमेनना गैरवापर करणाऱ्यांवर चाप

गुगलवर लाखोंच्या संख्येने वेबसाईट्स आहेत. अनेक वेबसाईट्स काही कारणास्तव आपले डोमेन रिन्युव करत नाही. परिणामी ते डोमेन एक्पायर होते. अश्या डोमेनवर आधी काम झाले असल्याने त्यावर पुन्हा काही कंटेंट अपलोड केल्यास सर्च रिझल्टमध्ये लवकर रॅन्क होते. वेबसाईटवर ट्राफिक लवकर आले तर Google Ad sense च्या माध्यमातून सुरू होणारी कमाई झटपट सुरू होते. Expiredomain.in  या वेबसाईटवर अशा डोमेनची खरेदी होते. यामध्ये काही डोमेनची किंमत तर लाखो रूपयांमध्ये आहे.

असे डोमेन खरेदी करण्यामागचे कारण म्हणजे त्यांचे बॅकलिंक अधीपासूनच अस्तितवात असतात याचा वापर करून अनेक जण लाखो रूपयांची कमाई करत होते. मात्र गुगलने आता नवीन अपडेटच्या माध्यमातून अशा सर्व साईटवर कडक कारवाई केली आहे. यासर्व साईट सर्च रिझल्टमधून बाद करण्यात आल्या आहेत.

न्युज बेवसाईलाही बसणार फटका

सध्या प्रत्त्येक न्युज चॅनलची स्वतःची बेवसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून कंपनी महिन्याला कोट्यावधींची कमाई करते. न्युज बेवसाठी काम करणाऱ्या कंटेंट राईटरला त्यांच्या मानधनाच्या तुलनेत मोठे टार्गेट दिले जाते. वेबसाईटवर युजर्स आणण्यासाठी दबाव टाकण्यात येतो. अशावेळी ते कंटेंट राईटर काही चोरट्या मार्गाचा वापर करतात. वाचकांची दिशाभूल करणारे हेडींग दिल्या जाते.

थोडक्यात काय तर बातमीचे हेडींग असे असते की यामध्ये अतिशय स्पोटक किंवा गोपनिय माहिती आहे ज्याला ‘क्लिकबेट हेडिंग असेही म्हणतात’ अनेक जण हे हेडिंग वाचून लिंकवर क्लिक तर करतात मात्र त्याच्या आत दिलेली बातमी किंवा माहिती ही अतिशय पांचट आणि तर्कहीन असते.

असे करून वेबसाईटला युजर तर मिळतात पण साईटची ऑथोरिटी कमी होते. कंटेंट रायटरचं काम सोपं होतं पण वेबसाईटला याचा फटका बसतो. या नव्या  Google core update 2024 नुसार अशा सर्व वेबसाईटवर कारवाई करण्यात येणार आहे. याचा थेट परिणाम या न्युज वेबसाईटच्या कमाईवर होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात  न्युज वेबसाईटसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळही येऊ शकते.

अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s

Affiliate Marketing  करणाऱ्या वेबसाईटही रडारावर

अनेक ब्लॉगर्स Affiliate Marketing च्या माध्यमातून लाखोंची कमाई करतात. वेबसाईटवर एखाद्या उत्पादनाची तोकडी आणि अर्धवट माहिती देऊन त्या खाली आपली Affiliate लिंक देतात. ती लिंक वापरून एखाद्याने खरेदी केल्यास ब्लॉगरला त्याचे कमिशन मिळते. गुगलने अशा वेबसाईट्सला स्पॅम कॅटेगरीत टाकले आहे.

वेबसाईटवर निश कंटेंट म्हणजेच ठराविक विषयाशी संबंधीत कंटेंट टाकून तसेच संपूर्ण आणि खरी माहिती देऊन त्याखाली Affiliate लिंक दिल्यास ते योग्य समजल्या जाणार आहे.

नव्या ब्लॉगर्सला होणार फायदा

Google  update 2024 मुळे अनेक वेबसाईटस् तसेच ब्लॉगर्सचे बारा बाजणार आहे. गुगलने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार तब्बल 40 टक्के वेबसाईट्सला याचा फटका बसणार आहे. याचा फायदा नवीन ब्लॉगर्सला होऊ शकतो.

ज्यांनी नुकतेच ब्लॉगींग सुरू केले आहे आणि आपल्या वेबसाईटवर जाणारा कंटेंट शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि मेहनत घेऊन टाकण्यावर भर देत आहेत त्यांना रॅन्क करण्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply