You are currently viewing गारमेंट मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात अशा प्रकारे व्यवसाय करून कमावू शकता लाखो रूपये
Garment Business

गारमेंट मॅन्युफॅक्चरींग क्षेत्रात अशा प्रकारे व्यवसाय करून कमावू शकता लाखो रूपये

(Garment Manufactures in Pune) मॅन्युफॅक्चरींगशी संबंधीत व्यावसाय सध्या ट्रेंडींगमध्ये आहे. अशाच एका व्यवसायाची माहिती आपण घेणार आहोत. हा व्यवसाय आहे गारमेंट मॅन्युफॅक्चरींगचा. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहेत त्यामुळे कापड उद्योगाला कधीही मरण नाही. योग्य वेळी योग्य ग्राकांपर्यंत पोहचता आले तर या व्यवसायात मोठा नफा कमाविणे शक्य आहे. तुम्हीसुद्धा गारमेंट क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची ठरू शकते. यासाठी तुम्हाला कुठलाही मॅन्युफॅक्चरींग सेटअप करण्याची गरज नाही.

अशा प्रकारे सुरू करता येईल व्यवसाय

पुण्याजवळील राजगुरूनगर येथे मिलींद पिंगळे यांचा साई गारमेंट या नावाने गारमेंट मॅन्युफॅक्चरींचा कारखाना आहे. गेल्या वीस वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. त्यांच्या या कारखान्यात ग्राहकांच्या मागणीनुसार कस्टमाईज गारमेंटचे मॅन्युफॅक्चरींग केले जाते. शाळेसाठी, हॉस्पिटलसाठी व हॉटेल्ससाठी लागणारे युनिफॉर्म, सांस्कृतीक कार्यक्रमासाठी तसेच मंडळासाठी लागणारे टी शर्ट्स, स्पोर्ट युनिफॉर्म, जॅकेट, हुडीज, ट्रॅक पॅन्ट, निवडणूक प्रचारात वाटण्यासाठी टी शर्ट्स, छत्र्या, गमछे, बॅग्ज, कॅप अशा अनेक प्रकाच्या वस्तूंचे ठोक प्रमाणात मॅन्युफॅक्चरींग केले जाते.

हायटेक अॅटोमॅटीक मशिनरीच्या साहाय्याने त्यावर ग्राहकांच्या मागणीनुसार आकर्षक एम्ब्रॉडरी आणि प्रिंटींग केले जाते. अनेक नामांकित कंपन्यांसाठी ते एब्रॉडरी आणि प्रिंटींग करून गारमेंटचा सप्लाय करतात. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात त्यांच्या मालाला मागणी आहे. तुम्ही जर गारमेंट क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करण्याचा विचार करत आसाल तर, साई गारमेंटच्या माध्यमातून हे शक्य आहे. आपल्या गावातच दुकान टाकून परिसरातील शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, मंडळ या सारख्या संस्थांचे गारमेंट मॅन्युफॅक्चरींगचे बल्क ऑर्डर घेऊ शकता.

तो ऑर्डर साई गारमेंटच्या कारखान्यातून पुर्ण करून तुमच्या कस्टमरला डिलिव्हर करू शकता. गारमेंटमध्ये ५ ते ३० टक्यांचे मार्जीन आहे. अशाप्रकारे व्यवसाय केल्यास तुमचा मॅन्युफॅक्चरींग सेटअपचा खर्च वाचतो. तसेच रिस्क देखील कमी होते. तुम्हाला बल्क कॉन्टीटीमध्ये गारमेंटचे मॅन्युफॅक्चरींग करायचे असल्यास तुम्ही साई गारमेंटशी संपर्क साधू शकता.

संपर्क-

साई गारमेंट्स, मिलींद पिंगळे, राजगुरूनगर, पुणे.

मो. 9822636171

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply