You are currently viewing Ganpati decoration idea 2024 : गणपतीसाठी अशाप्रकारे करा आकर्षक सजावट
Ganpati decoration idea

Ganpati decoration idea 2024 : गणपतीसाठी अशाप्रकारे करा आकर्षक सजावट

मुंबई : (Ganpati decoration idea 2024) गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पाला घरात आणून पूजा केली जाते. यंदा 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी होणार असून, त्यापूर्वीच लोकांनी बाप्पाला घरी आणण्याची तयारी सुरू केली आहे. बाप्पा ज्या ठिकाणी विराजमान होणार आहे त्या ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात येते. अनेक जण दरवर्षीपेक्षा काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतात. यंदाच्या गणेशोत्सवात काहीतरी हटके सजावट करायची असेल तर खालील कल्पना नक्कीच कामात येतील.

आकर्षक फुलांची सजावट

यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्ही झेंडूच्या तसेच गुलाबाच्या फुलांनी आकर्षक सजावट करू शकता. झेंडूची फुले लवकर कोमेजत नाहीत. हे किमान 2-3 दिवस ताजे दिसतात. याशिवाय तुम्ही त्यात पानांची माळही घालू शकता. तुमच्या घरी बाप्पा दहा दिवस विराजमान राहाणार असेल तर, तुम्ही नकली झेंडूच्या फुलांचाही वापर करू शकता.

रंगीत कागदाची सजावट

रंगीबेरंगी कागदानेही तुम्ही गणपतीची सजावट करू शकता. या रंगीबेरंगी कागदांपासून तुम्ही फुले, हार, दिवे, वॉल हँगिंग्ज इत्यादी बनवू शकता. यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रंगात फ्लोरोसेंट पेपर किंवा ग्लिटर शीट्सही निवडू शकता.

स्कार्फ किंवा दुपट्टा

गणपतीच्या सजावटीत तुम्ही रंगीबेरंगी दुपट्टेही वापरू शकता. दुपट्ट्याचा वापर करून तुम्ही स्कार्फची मागील बाजू अनेक प्रकारे सजवू शकता. आकाराचा विचार करून दुपट्ट्यांना  आकर्षकपणे सजवा. यामध्ये तुम्ही लायटिंगही करू शकता.

फुग्याची सजावट

फुग्याची सजावट करूनही तुम्ही गणपती बाप्पाला विराजमान करू शकता. तुम्ही फुगे वेगवेगळ्या प्रकारे लावू शकता. फुले, झालर इत्यादींप्रमाणे ते देखील खूप सुंदर दिसतात.

थर्मोकॉलचे डेकोरेशन

थर्माकोलच्या शीट्सने तुम्ही सहज सुंदर सजावट करू शकता. थर्माकोल कापून तुम्ही खूप सुंदर डिझाइन बनवू शकता. फुले, मोदक, मूषक इत्यादी गणपती बाप्पाला प्रिय आहेत, हे आकार बनवून तुम्ही गणपतीची सजावट करू शकता.

लाईटींगची आणि दिव्यांची सजावट

गणपतीवर साधी सजावट करून घर सजवायचे असेल तर घरात लाईटींग लावू शकता. जर तुम्ही गणेश चतुर्थीच्या दिवशी देवघरात गणपतीची प्रतिष्ठापना करत असाल तर तुम्ही देवघराला सर्वत्र लाईटींग आणि दिव्यांनी सजवू शकता. संपूर्ण देवघरजा प्रकाशाने उजळून निघेल तसेच आकर्षक आणि प्रसन्न वाटेल.

झाडांची सजावट

यंदाच्या गणेशोत्सवात तुम्हाला जर इको फ्रेंडली थीम साकारायची असेल तर, तुम्ही सजावटीसाठी झाडे आणि वनस्पवूनतींचा वापर करू शकता. बाप्पाच्या सभोवताल काही आकर्षक रोपटे लावू शकता. तसेच बोनसाय झाडांची सजावट केल्यास अधीकच आकर्षक दिसेल.

रांगळीने करा सजावट

धार्मिक प्रसंगी सजावटीसाठी रांगोळी काढली जाते. तसेच ते शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्हाला जर गणपतीच्या डेकोरेशनमध्ये भर घालायची असेल तर रांगोळी काढू शकता. ज्या ठिकाणी बप्पा विराजमान आहेत तेथे रांगोळी काढावी. रांगोळीमध्ये तुम्ही फुलं आणि तांदूळ तसेच इतर धान्याचा वापर करून आकर्षक करू शकता. रांगोळी दीर्घकाळ टिकवून ठेवायची असेल, तर रंगाच्या साह्याने कलाकृती बनवून काही दिवस कायमस्वरूपी रांगोळीची रचना करता येते.

कागदी फुलांची सजावट

फुलांचा सजावट ही नेहमीच आकर्षक असते. मात्र एका दिवसापेक्षा जास्त काळासाठी फुलांची सजावट कराची असल्यास तो पर्याय वगळावा लागतो, कारण फुलं शीळी झाल्यानंतर आकर्षक दिसत नाही. याशिवाय दररोज नवीन फुलांचे डेकोरेशन बनवणे खर्चिक आणि वेळखावू ठरेल. यावर एक चांगला पर्याय म्हणजे कागदी फुलांची सजावट करणे आहे.

आकर्षक अशी कागदी फुलं डेकोरेशनसाठी सहज उपलब्ध असतात. याशीवाय रंगीबीरंगी कागदांपासून तुम्ही स्वतःही फुलं बनवू शकता. कागद हा पर्यावरणासाठी अनुकूल असल्याने त्आयाला तुम्ही इको फ्रेंडली स्वरूपही देऊ शकता. सजावटीसाठी कागदी फुलं ऑनलाईन देखील उपलब्ध आहेत. या कागदी फुलांसह, तुम्ही गणपतीच्या सजावटीच्या सोप्या कल्पना वापरून पाहू शकता.

याशिवाय, तुम्ही रंगीत कागद वापरून सुंदर ओरिगामी देखील निवडू शकता. तुम्ही YouTube ट्यूटोरियल ते स्वतः बनवण्यासाठी फॉलो करू शकता किंवा तुमच्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना या फुलांच्या सजावटीचा उपक्रम देऊ शकता. यामुळे सजावटीसोबतच मुलांचा बौद्धीक विकास होण्यातही मदत होईल.

तयार केलेली कागदी फुलं ही सहसा खराब होत नाही त्यामुळे ती तुम्ही पुढच्या वर्षी किंवा इतर कार्यक्रमांनाही वापरू शकता. वेगवेळ्या आकारांना सजावट केल्यास दरवेळेस नवीन डिजाईन करता येणे शक्य आहे. कागदी फुलांना सोबत म्हणून तुम्ही थरमाकोल देखील वापरू शकता.

कागदी फुलांचे डेकोरेशन करताना एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. ती म्हणजे दिव्यापासून आणि आगीपासून त्याला कोणता धोका तर नाही ना याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. कागदी फुलांचे डेकोरेशन करताना कोणताही अनर्थ घडणार नाही याची काळजी घ्या.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply