You are currently viewing Ganesh Visarjan vidhi Marathi : घरच्या घरी असे करा बाप्पाचे विसर्जन
Ganesh Visarjan Vidhi

Ganesh Visarjan vidhi Marathi : घरच्या घरी असे करा बाप्पाचे विसर्जन

मुंबई : (Ganesh Visarjan vidhi Marathi) दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरूवात होतो. त्याचबरोबर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला या सणाची सांगता होते. अनंत चतुर्दशीचा सणही याच दिवशी साजरा केला जातो. दहा दिवस पाहुणा म्हणून आलेल्या गणपती बाप्पाचे या दिवशी वाजत गाजत विसर्जन केले जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी जगाचे पालनहर्ता भगवान विष्णूच्या पुजेलाही विशेष महत्त्व आहे. तुम्ही जर घरीच बाप्पाला निरोप देणार असाल तर त्याची पद्धत आपण जाणून घेऊया.

अनंत चतुर्दशी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 03:10 वाजता सुरू होत आहे. त्याच वेळी, ही तारीख 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11:44 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत मंगळवार, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी होणार आहे. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे आहे.

या शुभ मुहूर्तावर गणेशाचे विसर्जन करा

सकाळचा मुहूर्त- सकाळी 09.11 ते दुपारी 01.47 पर्यंत.

दुपारचा मुहूर्त – दुपारी 03:19 ते 04:51 पर्यंत.

संध्याकाळचा मुहूर्त – 07:51 ते रात्री 09:19 पर्यंत.

रात्रीचा मुहूर्त – 18 सप्टेंबर रोजी रात्री 10:47 ते 03:11 पर्यंत

घरी गणपतीचे विसर्जन कसे करावे

गणेश विसर्जन घरीच करायचे असेल तर एका टबमध्ये पाणी भरावे. विसर्जन करण्यापूर्वी गणपती बाप्पाची घरातूनच टाळ वाजवत आणि गणरायाचा जयजयकार करीत मिरवणूक काढावी. विसर्जनाच्या ठिकाणी विधीवत पूजा करावी.

गणेश विसर्जन पूजा विधी

सर्वप्रथम गणपतीवर आणि मृशकावर फुलाने पाणी शिंपडावे

गणपतीला दुर्वा, लाल फुल आणि शेंदूर अर्पण करा.

गणतीला मोदक आणि डाळ काकडीचा नैवेद्य दाखवा.

विसर्जनाच्या वेळी गणपतीला डाळ तांदूळाची शिदोरी बांधून द्यावी.

गणपतीला निरोप देण्यापूर्वी त्याला मनातली इच्छा सांगा.

पणपती अथर्वशिर्ष म्हणावे.

गणपतीची आरती करावी.

आधी मृशकाचे विसर्जन करावे.

नंतर गणपती बाप्पाचा निरोप गजर करावा. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… असं म्हणून मुर्ती पाण्यात विसर्जीत करावी.

विसर्जनानंतर कलशातले पाणी घरात शिंपडावे. नारळ फोडावे आणि सर्वाना प्रसाद वाटावा.

Ganesh Visarjan Vidhi
Ganesh Visarjan Vidhi

गणपतीची आरती (Ganpati Aarti)

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply