मुंबई : (Food delivery Viral Video) माय असे उन्हातील सावली. माय असे पावसातील छत्री. माय असे थंडीतील शाल. यावीत आता दु:खे खुशाल. असं एका कवीने म्हंटल आहे. आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा आहे. KGF चित्रपटातील हा संवाद तुम्हाला आठवत असेलच. पण हा नुसता संवाद नसून एक सत्यही आहे. ज्याचे जिवंत उदाहरण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आपल्या मुलासोबत बाईकवर बसून फुड डिलेव्हरी करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या मुलासह घरोघरी डिलेव्हरी करताना दिसत आहे. तीच्या नोकरीसोबतच ती आपल्या मुलाचीही काळजी घेत आहे.
महिलेनं सांगितली तीची कहाणी
इन्स्टाग्रामवर @vishvid नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती महिला एका सोशल मिडीया इंन्फुएंसरला तिच्या संघर्षाची कहाणी सांगत आहे. महिलेला सांगितले की ती आपल्या मुलाला मागे ठेवून कामावर जाऊ शकत नाही, म्हणून ती तीच्या मुलाला घेऊन कामावर जाते. मुलामुळे तिला नोकरीच्या अनेक संधी सोडाव्या लागल्याचेही महिलेने सांगितले. व्हिडिओमध्ये महिलेने पुढे सांगितले की ती हॉटेल मॅनेजमेंटची विद्यार्थिनी आहे. लग्नानंतर तिला नोकरी शोधण्यात खूप अडचणी आल्या. अखेरीस तिला Zomato मध्ये फूड डिलिव्हरी पर्सन म्हणून नोकरी मिळाली आणि आता ती आपल्या मुलासह घरोघरी जाऊन अन्न पोहोचवते. गेल्या महिनाभरापासून ती हे काम करतेय. हे काम करताना तीला अनेक अडचणी आल्या मात्र सकारात्मक दृष्टीकोण ठेऊन ती प्रत्त्येक अडचणींवर मात करत पुढे जात आहे.
View this post on Instagram
महिलेच्या कार्याला लोकांनी केला सलाम
लोक व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. या व्हिडिओवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंटही केल्या आहेत. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. जिथे एका यूजरने कमेंट करत लिहिले – हे फक्त आईच म्हणू शकते – मी माझ्या मुलाशिवाय कामावर जाणार नाही. दुसऱ्याने लिहिले – ज्यांना त्रास देऊन पुरुषांची संपत्ती बळकावायची आहे अशा लोभी महिलांनी या महिलेकडून शिकले पाहिजे . तिसऱ्या व्यक्तीने लिहिले – आई तिची नोकरी सोडू शकते परंतु ती आई आहे म्हणून आपल्या मुलांना सोडू शकत नाही.