You are currently viewing दसरा आणि विजयादशमी शुभेच्छा संदेश : Dussehra wishes Marathi 2024
विजयादशमी शुभेच्छा संदेश

दसरा आणि विजयादशमी शुभेच्छा संदेश : Dussehra wishes Marathi 2024

मुंबई : (Dussehra wishes Marathi 2024) शारदीय नवरात्रीची आज सांगता होणार आहे. यानंतर दशमी तिथीला विजयादशमी म्हणजेच दसऱ्याचा उत्सव साजरा केला जातो.  उद्या म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी देशभरात दसरा व विजयादशमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील विजयादशमीचा उत्सव (RSS Vijayadashmi Utsav 2024) साजरा केला जातो. विजयादशमी हे वाईट, अहंकार, असत्यावर सत्य आणि चांगुलपणाच्या विजयाचे प्रतीक आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अन्याय आणि अत्याचाराचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध (Ravan Vadh) करून श्रीरामांनी या दिवशी असत्याचा नाश केला. या शुभ मुहूर्तावर सायंकाळी रावण, मेघनाथ आणि कुंभकर्णाचे दहन केले जाते. त्याचा पुतळा जाळला जातो. दसरा मेळा वेगवेगळ्या प्रकारे आयोजित केला जातो. या सोन्यासारख्या सणानिमीत्त एकमेकांना शुभेच्छा पाठवा. खाली काही निवडक दसऱ्याचे शुभेच्छा संदेश देत आहोत.

विजयादशमी शुभेच्छा संदेश  (Vijayadashmi wishes Marathi 2024)

आज आहे दसरा

Problem सारे विसरा

विचार करू नका दुसरा

चेहरा ठेवा नेहमी हसरा

आणि तुम्हाला आमच्याकडून हॅपी दसरा

सोन घ्या सोन्यासारख राहा.

उत्सव आला विजयाचा….दिवस सोने लूटण्याचा

नवे-जुने विसरून सारे…..फक्त आनंद वाटण्याच

तोरण बांधून दारी…..घालू रांगोळी अंग

करू उधळण सोन्याची…..जपू नाती मना-मनाचा

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

उत्सव हा विजयाचा
दिवस सोनं लुटण्याचा
जुने हेवे दावे विसरून सारे
दिवस फक्त आनंद लुटण्याचा
दसरा व विजयादशमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा

वाईटाचा होतो विनाश
रावणाप्रमाणेच होईल तुमच्या दुःखाचाही नाश
आला आहे दसऱ्याचा सण
दसरा शुभेच्छा तुम्हाला आणि कुटुंबाला

झेंडूची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!

हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की,
शेवटी चांगुलपणाचा विजय होतो आणि वाईट गोष्टींचा विजय होतो,
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

आपली चिंता रावणाच्या पुतळ्यासह जळून जावो,
आपण नेहमी आनंदी आणि समाधानी राहो
हीच सदिच्छा!
दसऱ्याच्या शुभेच्छा !

तुमच्या मार्गावरील सर्व अडथळे व त्रास
दसऱ्याच्या दिवशी नाहीसे होवोत,
याच दसऱ्याच्या निमित्ताने शुभेच्छा!

यशाच्या दारावर
माणुसकीचे तोरण बांधुया
सुखाचं सोनं वाटून
सोन्यासारखी माणूसकी जपूया
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

कृषी संस्कृतीच्या उत्सवाचे प्रतिक असणारा दसरा अर्थात विजयादशमी आपण साजरी करत आहोत. यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभो ही सदिच्छा.
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाईटावर चांगल्याची मात
महत्त्व या दिनाचे खास असे
जळोनिया त्या द्वेष-मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे
विजयादशमी आणि दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!!!

आकार,
मनाचे बंध त्यांना प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार,
“विजयादशमी”च्या निमित्ताने करावा शुभेच्छांचा स्वीकार.
!!!!सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!!

मराठी अस्मितेची मराठी शान
मराठी परंपरेचा मराठी मान
आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल,
आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान”
!! शुभ दसरा !!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा….

संस्कृतीचा ठेवूनिया मान
वाटले सोनियाचे पान
स्वीकारताना ठेवा चेहरा हसरा
तुम्हा सर्वांना शुभ दसरा
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा

ठेवुनी चेहरा हसरा, दुख सगळे विसरा
सोनियाचा दिन आपुला, तो विजयादशमी दसरा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

रावणाचा वध करुनी राम राज्याने दिला आसरा
संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा, आनंदाने करू दसरा साजरा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

झेंडूची फुले, आंब्याची पाने घरोघरी तोरणे सजली
रंगबेरंगी रांगोळी सजली
नवरात्रीच्या नऊ दिवसाचा पूर्ण झाला प्रवास
आला दसऱ्याचा दिवस खास
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा

झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा! दसरा शुभेच्छा.

वाईटावर चांगल्याने विजय मिळवण्याची वेळी आलीय
याच उत्साहाने आयुष्यात पुढे जाऊया
दसरा 2024 च्या खूप खूप शुभेच्छा!

आज रात्री फटाक्यांप्रमाणे तुमची सर्व दुःखे जळून खाक व्हावीत
तुमचा आनंद या दसऱ्याला आणखी हजारपट वाढावा
तुमचा दिवस आनंदात जावो!

“झेंडूच्या फुलांचे तोरण आज लावा दारी, सुखाचे किरण येऊ दे तुमच्या घरी, पूर्ण होऊ दे तुमच्या सर्व इच्छा, विजयादशमीच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा”

“उस्तव आला विजयाचा दिवस सोने लुटण्याचा.. नवे जुने विसरुन सारे, फक्त आनंद वाटण्याचा.. विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.”

“पुन्हा एक नवी पहाट, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला, पुन्हा एक नवी दिशा.. नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत नव्या शुभेच्छा.”

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply