You are currently viewing Digital Marketing Carrier : डिजिटल मार्केटींग शिकून या 12 प्रकारे करा कमाई
How To earn from Digital Marketing

Digital Marketing Carrier : डिजिटल मार्केटींग शिकून या 12 प्रकारे करा कमाई

मुंबई : (Digital Marketing Carrier) वाढत्या डिजिटलायझेशनमुळे लोकांचे जीवन बदलले आहे आणि आता नोकऱ्यांची शैलीही मोठ्या प्रमाणात बदलली आहे. अनेक जण सरकारी नोकरी ऐवजी नवीन क्षेत्रात रोजगारांना प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दशकांत देशात आणि जगात डझनभर नवीन गॅजेट्स दाखल झाले आहेत. त्यानंतर मार्केटिंगची संपूर्ण पद्धतच बदलली आहे. आता पारंपरिक मार्केटिंगऐवजी डिजिटल मार्केटिंग सुरू झाले आहे. यामुळे डिजिटल मार्केटिंग आणि ग्राफिक डिझाईन सारख्या क्षेत्रांचा समावेश टॉप 10 जॉब इंडस्ट्रीमध्ये झाला आहे.

यामागचे कारण म्हणजे टेक्नॉलॉजी क्षेत्रात रोज नवीन अपडेट्स येत आहेत. याशीवाय डेटा खूप स्वस्त झाला आहे. आज डिजिटल उद्योग दरवर्षी लाखो तरुणांना रोजगार देतो. एका अभ्यासानुसार  2025 पर्यंत या डिजिटल क्षेत्रात तरुणांना 6 कोटींहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होतील.

तुम्हीही रोजगाराच्या शोधात असाल किंवा तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन करून पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही आजच डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात उतरले पाहिजे. Google प्रमाणित तज्ञांकडून अत्यंत कमी खर्चात डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी तुम्ही यु ट्यूबची मदतत घेऊ शकता.

डिजिटल मार्केटिंगच्या या पद्धतींद्वारे तुम्ही लाखो रुपये कमवू शकता

  • एफिलिएट मार्केटिंग – फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मीशो सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे कमाई करण्याची संधी.
  • सोशल मीडिया मार्केटिंग – सोशल मीडियावर संस्था किंवा कंपनीचे विपणन करणे.
  • नेटवर्क मार्केटिंग – डिजिटल साधनांद्वारे लोकांशी संपर्क साधणे आणि कंपनीची उत्पादने जास्तीत जास्त लोकांना विकणे. तुमची स्वतःची नेटवर्किंग टीम स्थापन करा जी तुम्ही करत असलेल्या कंपनीसाठी तेच काम करेल.
  • SEO – सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये, तुम्ही कंपनीच्या सामग्रीला Google मध्ये रँक करण्यासाठी सेवा देऊ शकता.
  • ईमेल मार्केटिंग – ईमेलद्वारे लोकांशी संपर्क साधून कंपनीचे विपणन करा.
  • सामग्री लेखन – ब्रँडसाठी, त्यांच्या वेबसाइट लीड व्युत्पन्न करण्यासाठी एक उत्तम माध्यम आहेत. ज्यामध्ये तरुणांना कंटेंट रायटिंगची संधी मिळते.
  • ब्लॉगिंग – ब्लॉगिंगद्वारे, तुम्ही तुमच्या साइटवर कमाई करू शकता आणि Google जाहिराती आणि इतर ब्रँडच्या जाहिरातींमधून कमाई करू शकता.
  • ऑनलाइन कोर्सेस विकून – तुमच्याकडे एखादे कौशल्य असेल तर तुम्ही ते इतरांना ऑनलाइन कोर्सद्वारे शिकवू शकता.
  • वेबसाइट मॅनेजर बनून – मोठे नेते, मोठी व्यक्ती किंवा प्रसिद्ध चेहरे त्यांच्या वेबसाइट्स त्यांच्या नावाने ऑपरेट करतात, तुम्ही त्यांच्या वेबसाइट्स मॅनेज करण्याचे काम करू शकता.
  • YouTube आणि Facebook-Insta थंबनेल बनवण्याचे काम – आजकाल रील्सचा व्यवसाय खूप वेगाने विस्तारत आहे, प्रत्येकजण लहान रील्स स्क्रोल करून मोबाईलवर तासनतास घालवत आहे. म्हणूनच उद्योगात थंबनेल तज्ञांची मागणी वाढली आहे.
  • ई-कॉमर्स वेबसाइट उघडून – तुम्ही Shopify किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मद्वारे तुमची ई-कॉमर्स वेबसाइट उघडून उत्पन्न मिळवू शकता.
  • डिजिटल मार्केटिंग तज्ञ बनून – जर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमधील महत्त्वाच्या गोष्टी शिकल्या असतील, तर तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये तज्ञ बनून पैसे कमवू शकता.

डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात प्रगती निश्चित

एखाद्या अॅडमिशनपासून ते वस्तू विकण्यापर्यंत डिजिटल मार्केटिंग कौशल्य असलेल्या तरुणांची गरज आहे. एका अहवालात म्हटले आहे की, सध्या अमेरिकेइतकाच डेटा भारतात वापरला जात आहे. याचा अर्थ इंटरनेट जितक्या वेगाने विकसित होईल तितक्या वेगाने डिजिटल मार्केटिंगची प्रगतीही होईल. सध्या या क्षेत्रात बहुतांश तरुण बी.टेक आणि डिप्लोमा पास आहेत, ज्यांना काही कारणांमुळे त्यांच्या आवडीची नोकरी मिळाली नाही. अशा परिस्थितीत उत्साही तरुणांसाठी अनंत शक्यता आहेत.

अंदाजानुसार, 2024 पर्यंत आपल्या देशात 4G आणि 5G वापरकर्त्यांची संख्या 99 कोटींवर पोहोचू शकते. 2022 मध्ये, जुलै ते डिसेंबर दरम्यान, डिजिटल क्षेत्रासह विविध क्षेत्रांमध्ये 55 टक्के फ्रेशर्सची भरती दिसून आली. यात आणखी वाढ होणार आहे.

अभ्यासक्रम कुठे उपलब्ध आहे?

कोणत्याही नामांकित ऑनलाइन किंवा ऑफलाइन संस्थेतून डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करता येणे शक्य आहे. हा कोर्स तीन, सहा महिने ते एक वर्ष असू शकते. जितक्या जास्त कालावधीचा कोर्स तितकेज जास्त कौशल्यदेखील विकसीत होतील.

जितके अधिक ज्ञान, तितक्या अधिक शक्यता. यानंतर, तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, कंटेंट मार्केटिंग मॅनेजर, सोशल मीडिया मार्केटिंग स्पेशलिस्ट, वेब डिझायनर, ॲप डेव्हलपर, सर्च इंजिन मार्केटर, इनबाउंड मार्केटिंग मॅनेजर, एसइओ एक्झिक्युटिव्ह या महत्त्वाच्या नोकऱ्या दिल्या जातील.

जेव्हा तुम्ही कोर्स निवडता तेव्हा ॲप डेव्हलपर, वेब डिझायनर सारखे स्वतंत्र कोर्स देखील उपलब्ध होतील. हे पाहिल्यानंतर गोंधळून जाऊ नका. डिजिटल मार्केटिंगच्या एका वर्षाच्या अभ्यासक्रमात या गोष्टी शिकवल्या जातात. सहा महिने वेळ गुंतवून, तुम्ही त्यांच्याबद्दल स्वतंत्रपणे देखील जाणून घेऊ शकता.

हे असे कौशल्य आहे की जर तुम्हाला नोकरी करावीशी वाटत नसेल तर तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करू शकता. ज्या छोट्या कंपन्या कर्मचारी नियुक्त करत नाहीत त्या या सेवा आउटसोर्स करतात. याचा फायदा त्यांना तसेच सेवा देणाऱ्या व्यक्तीला होतो.

 

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply