You are currently viewing D Mart Case Study : इतका मोठा डिस्काउंट देऊनही डी मार्ट नफा कसा कमावतो?
डी मार्ट पैसा कसा कमावतो?

D Mart Case Study : इतका मोठा डिस्काउंट देऊनही डी मार्ट नफा कसा कमावतो?

मुंबई : रिटेल श्रेत्रातला बादशाहा कोण? असं जर तुम्हाला विचारलं तर तुम्ही क्षणाचाही विलंब न करता डी मार्ट (How D mart Earn profit) असं उत्तर द्याल.  तुम्ही जर शहरी भागात किंवा मेट्रो सीटीमध्ये राहत असाल तर किराणा तसंच गृह उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी डी मार्डला नक्कीच जात असाल. मार्केटपेक्षा स्वस्त म्हणजेच डिस्काउंटेड रेटमध्ये इथे सर्व सामान उपलब्ध आहे. फक्त किराणाचं नाही तर भांडे, कपडे, होम अप्लांयसेस, स्टेशनरी, खेळणी अशा सर्व गोष्टींची मोठी रेंज आपल्याला डी मार्टमध्ये पाहायला मिळते. 

काही काही वस्तू तर इथे खरंच 40 ते 50 टक्के डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहेत. आता हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल की, इतका मोठा डिस्काउंट देऊनही डी मार्ट कोट्यावधी रूपयांचा प्रॉफीट कसा कमावतो? डी मार्ट ही कंपनी ज्यांची आहे ते राधाकृष्णण दमानी यांची बिझनेस स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे? डी मार्टच्या अशा कोणत्या स्ट्रॅटेजी आहेत ज्या वापरून आपणसुद्धा आपल्या व्यावसायाला मोठं करू शकतो? (D mart Case Study) 

आज तुम्हाला बिझनेसच्या अशा अनेक स्ट्रॅटेजीबद्दल माहिती मिळणार आहे ज्यामुळे लो प्रॉफीट बिजनेस तुम्ही हाय प्रॉफीट बनवू शकता.  डी मार्टचा बिझनेस मॉडेल समजण्याआधा आपल्याला त्याचे सर्वेसर्वा राधाकृष्णन दमानी यांच्याबद्दल जाणून घेणं आवश्यक आहे. 

कोण आहेत राधकृष्णन दमानी?

अत्यंत साधी राहाणी असणारे राधाकृष्णन दमानी हे फोर्ब्स वेबसाईटनुसार भारतातले नवव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मॅनेजमेंटच्या बाबतीत राधाकृष्णन दमानी यांची जितकी स्तुती करावी तितकी कमीचं आहे. तुम्हीजर कधी डीमार्टमध्ये गेले असाल तर क गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल ती म्हणजे अनावश्यक तामझाम कधीच पाहायला मिळत नाही. 

डीमार्टचा फंडा सरळ सरळ आहे. तुम्ही कस्टमरला स्वस्तात वस्तू द्या ते आपोआप तुमच्याकडे येतील. डीमार्टमध्ये खरेदी करणारे तर गमतीने म्हणतात की त्यांना वेअरहाऊसमधून खरेदी केल्याचा अनुभव येतो. 

डीमार्टचा सगळ्यात मोठा फंडा काय आहे तर, ते कधीच रेंटेड जागेत आपलं आउटलेट सुरू करत नाही. म्हणजेच त्यांची इमारत ही स्वतःच्या मालकीची असते.  त्यामुळे जो काही पैसा लागायचा तो त्यांना एकदाच लागतो. दर महिन्याला भाडं देण्याची त्यांना गरज नसते. रिलायन्स मार्ट आणि फ्युचर ग्रुप सारखे आउटलेट तुम्हाला प्राइम एरीयात पाहायला मिळू शकतात मात्र डी मार्टसाठी तुम्हाला थोडा लांबचा प्रवास करावा लागतो.  मार्केट रेट पेक्षा वस्तू थोड्या स्वस्त मिळतात त्यामुळे लोकांना याची फारशी तक्रारही नसते. 

( Zomato case Study : झोमॅटो आणि स्विगी पैसे कसे कमावतात?)

अशा प्रकारे काम करते डी मार्ट

  • मित्रांनो डी मार्टचा एकच उद्देश आहे तो म्हणजे लोकांना स्वस्तात मालाचा पुरवठा करणे. त्यासाठी त्यांनी काही स्ट्रॅटेजी वापली आहे ती काय आहे ते आपण जाणून घेऊया. मालाचा पुरवठा करणारे जे वेंडर्स आहे त्यांना इतर ठिकणी  पैसे मिळण्यासाठी 20 ते 25 दिवसांची वाट पाहावी लागते, तर दुसरीकडे डीमार्ट मात्र फक्त सात दिवसातंच वेंडरला पैसे देऊन मोकळा होते. 
  • डीमार्ट वेळेच्याआधी पैसे देत असल्याने वेंडर्स आणखी स्वस्तात डीमार्टला मालाचा पुरवठा करते. त्यामुळे डीमार्टलाही आपल्याला जास्तीत जास्त डीस्काउंट देणं शक्य होते. जास्त डीस्काउंट दिल्यानं कस्टमरही मोठ्याप्रमाणात खरेदी करतात. आणि ही सायकल सुरूच असते. 
  • डीमार्टची दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे तिथे काम करणारे जे वर्कर्स आहेत ते हायली स्कील्ड एम्ललॉईज नसतात. डीमार्टच्या वर्करकडे दोनच मुख्य कामं असतात ते म्हणजे ज्या शेल्फमधला स्टॉक संपला आहे तीथे रिस्टॉक करणे आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांनी कोणती वस्तू कुठे आहे ते विचारल्यास त्याची माहिती देणे. 
  • इथल्या कर्मचाऱ्यांना कोणतही सेल्स टार्गेट नसते आणि पगार वेळेवर मिळतो त्यामुळे तेही थोड्या कमी पगारात काम करतात. डीमार्टची तीसरी आणि महत्त्वाची स्ट्रॅटेची म्हणजे तो स्लॉटींग फिस घेतो. स्टोअरच्या प्राइम एरीयात जसं की एन्ट्री केल्यानंतर लगेच किंवा ज्या ठिकाणी लोकांचं लक्ष जाईल अशा ठिकाणी एखाद्या कंपणीला आपले प्रॉडक्ट ठेवायचे असेल तर त्यासाठी ते स्लॉटींग फीस आकारतात. 

 

याचा फायदा डीमार्ट आणि मॅन्युफॅक्चरर कंपनी दोघांनाही होतो. कस्टमरच्या नजरेच्या टप्प्यात वस्तू लावल्या असल्याने त्या वस्तूंचा लवकर खप होतो आणि त्या स्पेसीफीक जागेचं भाडं मिळाल्याने डीमार्टलाही एक्ट्रा इनकम मिळते. 

डी मार्टमध्ये या गोष्टी मिळत नाही

आणखी एक गोष्ट डी मार्टमध्ये तुम्हाला भाज्या, फळं दुध अशी फ्रेश फुड अॅटम कधीच मिळणार नाही जसं,  स्टोअर्ड अॅटम म्हणजेच ज्या जास्त कालावधीसाठी ठेवले जाऊ शकतात अशा वस्तू डी मार्टमध्ये मिळतील. यामागचे कारण म्हणजे. लवकर खराब होणाऱ्या वस्तू ठेवल्या तर त्यामाचा व्यापही वाढेल. 

रोज रिस्टॉक करावं लागल्याने लॉजिस्टीकचा खर्चही वाढेल. पैश्यांचा अपव्यय होईल अशा सर्व गोष्टींपासून डीमार्ट दूर राहातो. वार्षीक उलाढालीबद्दल बोलायचे झाल्यास डी मार्टची वार्षीक उलाढाल ही 24 हजार कोटींपेक्षा जास्त आहे आणि त्यात प्रॉफीट 1300 कोटी कमावतो. 

डी मार्ट सुरू करण्याआधी राधाकृष्णन दमानी यांनी जगभरातल्या अनेक मार्केटचा स्टडी केला. विशेषतः वॉलमार्ट कशाप्रकारे काम करते भारतातल्या ग्राहकाला आपण अशी सुविधा देऊ शकतो काय याचा अभ्यास केला. 

कोणताही व्यवसाय सुरू करण्याआधी त्याचा मार्केट रिसर्च किती महत्त्वाचा असतो हे यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल. 

डिमार्टच्या यशामागचं कारण म्हणजे तो पैसा खेळता ठेवतो. तसंच कोणाचाही पैसा अडवून ठेवत नाही. बिनकामाच्या गोष्टींमध्ये पैसा खर्च करत नाही. त्याचा एकच उद्देश आहे तो म्हणजे चांगल्यात चांगला माल स्वस्तात स्वस्त द्या आणि लोकांनाही तेच पाहिजे आहे.  कस्टमर हा मार्केटचा राजा आहे. तो डी मार्ट सारख्या कंपनीला डोक्यावर चढवू शकतो तसंच बिग बझार सारख्या कंपनीला बंदही पाडू शकतो. 

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply