You are currently viewing CNG Bike : लवकरच येणार पहिली सीएनजी बाईक, किती असणार किंमत?
Bajaj CNG Bike

CNG Bike : लवकरच येणार पहिली सीएनजी बाईक, किती असणार किंमत?

मुंबई : (CNG Bike)  देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक बजाज ऑटो लवकरच आपली पहिली CNG बाईक भारतीय बाजारपेठेत लॉन्च करणार आहे. ही बाईक कधी लाँच होणार याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. जगातील पहिली CNG बाईक कधी लाँच होणार? याची उत्सुकता तुम्हालासुद्धा असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे.

 यापूर्वी मिळाली होती ही माहिती

सीएसजी बाईक 18 जून 2024 ला लॉन्च होणार असल्याची माहिती कंपनीकडून आधी देण्यात आली होती, पण त्यानंतर लॉन्चची तारीख बदलून नवीन तारीख 17 जुलै असल्याचे सांगण्यात आले. बजाजचे कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांच्या वतीने सांगण्यात आले की, कंपनी आपली पहिली CNG बाइक अधिक किफायतशीर आणि चांगल्या पद्धतीने डिझाइन करण्यासाठी वेळ घेत आहे.

चाचणी दरम्यान झळकली बाईक

बजाजची सीएनजी बाईक लाँच होण्याआधी चाचणी दरम्यान अनेक वेळा पाहिली गेली आहे. लॉन्च करण्यापूर्वी सर्व प्रकारच्या परिस्थितीत याची चाचणी घेण्याची कंपनीची योजना आहे. या कालावधीत काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त केल्या जाऊ शकतात.

सीएनजी बाईकमध्ये असणार ही वैशिष्ट्ये

बजाजच्या सीएनजी बाइकमध्ये वर्तुळाकार एलईडी हेडलाइट, लहान साइड व्ह्यू मिरर, झाकलेली सीएनजी टँक, लांब सिंगल सीट, हँड गार्ड, अलॉय व्हील, फ्रंट डिस्क ब्रेक आणि डिजिटल स्पीडोमीटर यांसारखी वैशिष्ट्ये दिली जाऊ शकतात. याशिवाय बाइकचे एकापेक्षा जास्त व्हेरियंटही सादर केले जाण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या एंट्री लेव्हल बाईकमध्ये CNG तंत्रज्ञान सादर करू शकते. त्यामुळे त्याचे मायलेज 100 किलोमीटर प्रति किलोपर्यंत असू शकते. हा फक्त एक अंदाज आहे योग्य माहिती लॉन्चच्या वेळीच उपलब्ध होईल.

हा तपशील झाला उघड

सीएनजी बाईकच्या डिझाईनची माहिती लॉन्च होण्यापूर्वीच लीक झाली आहे. लीक झालेल्या ब्लूप्रिंटमध्ये बाइकची चेसिस, सीएनजी आणि पेट्रोल टाकीची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समोर झालेल्या माहितीवरून असे दिसून आले आहे की सिलेंडर थांबवण्यासाठी बाईक ब्रेसेससह डबल क्रॅडल फ्रेमसह सुसज्ज असू शकते. बाईकमध्ये सीएनजी सिलिंडर सीटच्या खाली ठेवता येतो. तर सीएनजी भरण्यासाठी पुढील बाजूस नोजल दिले जाईल. यासोबतच एक छोटी पेट्रोल टाकीही यात मिळणार आहे.

या चार सुपरहीट चित्रपटांनी बदलले होते सुशांत सिंह राजपूतचे करिअर

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply