You are currently viewing Chanakya neeti Marathi : यशस्वी व्यक्ती इतरांना ‘या’ गोष्टी कधीच सांगत नाही
Chanakya neeti Marathi

Chanakya neeti Marathi : यशस्वी व्यक्ती इतरांना ‘या’ गोष्टी कधीच सांगत नाही

मुंबई : (Chanakya neeti Marathi) आचार्य चाणक्य हे इतिहासातील महान कुटनितीतज्ञ, इतिहासकार आणि बुद्धिमान व्यक्ती मानले जातात. त्यांची धोरणे व्यक्तीला योग्य मार्ग दाखविण्यास आणि प्रत्येक पावलावर यशस्वी होण्यास मदत करतात. त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूकडे बारकाईने पाहिले आणि त्यावर काही प्रभावी धोरण बनवली. ज्याचा अवलंब करून यश मिळवू शकते.

आयुष्यात अनेकदा असे घडते की, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नाही. बऱ्याचदा काही चुकांमुळे अपयशाला सामोरे जावे लागते. याचे कारण स्वतःच्या काही चुका असू शकतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला यश मिळवायचे असेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्या त्याने कधीच इतरांना सांगू नये. या गोष्टी इतरांना सांगून माणूस कधीच यशस्वी होत नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी ज्या यशस्वी व्यक्ती कायम गुप्त ठेवतो.

स्वतःचे ध्येय

आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने यश मिळवण्यासाठी ध्येय निश्चित करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या ध्येयाबद्दल इतर कोणालाही सांगणे आपल्याला अपयशाच्या मार्गावर आणते. जीवनात यश मिळविण्यासाठी, आपल्या ध्येयाबद्दल कोणालाही सांगू नका, अगदी आपल्या मित्रांना किंवा जवळच्या लोकांनाही नाही. ध्येय साध्य करण्यासाठी फक्त शांतपणे प्रयत्न करत राहा.

तुमची कमजोरी

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला यश मिळवायचे असेल तर त्याने आपल्या कमकुवतपणा कधीही कोणाला सांगू नये. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या कमकुवतपणा दुसऱ्याला सांगितल्या तर हित शत्रू त्यांचा वापर करून तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकते.

स्वतःमधील कौशल्यं

आचार्य चाणक्य यांच्या मते, यशस्वी होण्यासाठी, व्यक्तीने कधीही आपले कौशल्य आणि ते कसे प्राप्त केले हे कोणालाही सांगू नये. तुम्ही तुमचे कौशल्य किंवा कला नेहमी एखाद्या पात्र व्यक्तीलाच सांगावी. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल.

कौटुंबिक किंवा पत्नीशी संबंधित बाबी

यशस्वी व्यक्तीने कौटुंबिक वाद किंवा घराशी संबंधित कोणतीही बाब बाहेरच्या लोकांना सांगू नये. यासोबतच पत्नीचा राग आल्यानंतर तिचे चारित्र्य, वागणूक किंवा सवयी कोणाला सांगू नका. लक्षात ठेवा की तुम्ही या गोष्टी शेअर केल्यास त्या क्षणी कदाचीत काहीच घडणार नाही, परंतु नंतर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात.

अपमान गुप्त ठेवा

जर तुमचा कधी एखाद्या गोष्टीबद्दल अपमान झाला असेल तर अशा गोष्टी कोणाशीही चुकूनही शेअर करू नका. सहसा लोक विनोद करताना अशा गोष्टी आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतात. पण अशा गोष्टी जितक्या जास्त गुप्त ठेवाल तितकं चांगलं. म्हणूनच, जर तुम्ही कधीही अपमानाचे कडू घोट प्यायले असेल तर ते तुमच्या मनातच गुप्त ठेवा.

पैशाशी संबंधित गोष्टी

पैसा तुम्हाला अर्थपूर्ण आणि सक्षम बनवतो. आजच्या काळात पैसा ही प्रत्येक व्यक्तीची शक्ती आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती किंवा पैशाशी संबंधित समस्या कोणालाही सांगू नका. असे केल्याने समाजात तुमचा आदर कमी होतो आणि जेव्हा इतर लोकांना कळते की तुमच्याकडे पैशांची कमतरता आहे, तेव्हा ते तुमच्यापासून दूर राहतात जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे पैसे मागणार नाही.

कठीण काळात आचार्य चाणाक्य यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

खबरदारी

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीने संकटाच्या वेळी सावधगिरी बाळगली पाहिजे, कारण संकटाच्या वेळी व्यक्तीकडे मर्यादित संधी असतात आणि आव्हाने जास्त असतात. अशा परिस्थितीत एक छोटीशी चूक मोठ्या प्रमाणात नुकसान करू शकते, म्हणून सावधगिरी बाळगणे खूप महत्वाचे आहे.

रणनिती

आचार्य चाणक्य म्हणतात की संकटातून बाहेर पडण्यासाठी माणसाला ठोस रणनीती आवश्यक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संकटाचा सामना करण्यासाठी रणनीती बनवते तेव्हा तो त्या रणनीतीनुसार टप्प्याटप्प्याने काम करतो आणि शेवटी विजय मिळवतो. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीच रणनीती नसलेल्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे संकटकाळात काळजी घ्या.

कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या

आचार्य चाणक्य म्हणतात की, संकटाच्या वेळी कुटुंबाप्रती जबाबदारी पार पाडणे हे माणसाचे पहिले कर्तव्य असले पाहिजे. तसेच, कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. असे केल्याने तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकता.

आरोग्याची काळजी घ्या

चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीने सर्वप्रथम आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कारण ती तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. तुमचे आरोग्य चांगले राहिल्यास तुम्हाला संकटातून बाहेर काढता येईल असे सर्व प्रयत्न तुम्ही करू शकाल. तुमच्या मानसिक आणि शारीरिक ताकदीने आव्हानांवर मात करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

पैश्यांची बचत करा

एखाद्या व्यक्तीने संकटकाळासाठी पैसे वाचवले पाहिजेत. जर तुमचे आर्थिक व्यवस्थापन चांगले असेल तर तुम्ही सर्वात मोठ्या संकटातून बाहेर पडण्यात यशस्वी होऊ शकता, कारण संकटाच्या वेळी पैसा हाच तुमचा खरा मित्र असतो. संकटाच्या वेळी पैशाची कमतरता असलेल्या व्यक्तीसाठी संकटावर मात करणे खूप कठीण होते.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply