मुंबई ; (Bookmyshow Coldplay) चित्रपट आणि मनोरंजनाशी संबंधीत तिकीट बुक करण्यासाठी लोकप्रिय असलेले ऑनलाईन प्लॅटफॉम Bookmyshow चे सर्वर ठप्प झाले आहे. लोकप्रिय बँन्ड कोल्डप्लेच्या कॉनसर्ट शोचे तिकीट बुकमायशो या प्लॅटफॉमवर आजपासून उपलब्ध झाले आहे. या तिकीट बुकींगसाठी लाखो लोकं एकाच वेळी बुकमायशोच्या सर्वर वर आल्याने वेबसाईटचे सर्वर क्रॅश झाले. येत्या १९ जानेवारी २०२५ ला नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडीयमवर कोल्डप्लेचा कॉन्सर्ट होणार आहे.
अजुनही काही युजर्सला येत आहे समस्या (Bookmyshow server Down)
Bookmyshow अॅप आणि वेबसाईटवरून कोल्डप्लेच्या कॉन्सर्टच्या तिकीटांची विक्री सुरू आहे. तिकीटांची विक्री सुरू होण्याआधीच कंपनीने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. मात्र लाखोंच्या संख्येने वापरकर्ते वेबसाईटवर आल्याने ‘सर्वर डाऊन’ झाले. तुर्तास ही समस्या दूर झाल्याचे काही वापरकर्त्यांनी X वर सांगितले आहे.
विषेशतः कोल्डप्लेच्या तिकीट बुकींकसाठी bookmyshow ने क्यू प्रणाली अमंलात आणली होती. जेणेकरून एकाच वेळी वापरकर्त्यांना सर्वरवर येण्यापासून रोखले जाऊ शकेल. मात्र वापरकर्त्यांच्या संख्येपूढे ही प्रणाली सक्षम नव्हती.
किती आहे कोल्डप्लेच्या कॉन्सर्टची तिकीट? (Coldplay concert ticket rate)
कॉन्सर्टसाठी तिकिटांची किंमत रु. 2,500 ते रु. 12,500 पर्यंत आहे, ज्यात रु. 3,000, रु. 3,500, रु. 4,000, रु. 4,500, रु. 9,000 आणि रु. 9,500 असे पर्याय आहेत. लाउंज सीटसाठी तिकिटांची सर्वाधिक किंमत 35,000 रुपये आहे. हे पाहण्यासाठी उंच जागा आणि खाद्यपदार्थ आणि पेय सेवांसह येते. प्रत्येक व्यवहार कमाल आठ तिकिटांपर्यंत मर्यादित आहे.
म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूरचा भाग म्हणून आयकॉनिक ब्रिटीश बँड, कोल्डप्ले नऊ वर्षांच्या विश्रांतीनंतर भारतात त्याचे अत्यंत अपेक्षित पुनरागमन करत आहे. प्रख्यात बँडने शनिवार, 18 जानेवारी 2025 आणि रविवार, 19 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर त्यांचे प्रदर्शन जाहीर केले.
पाच भागात विभागले आहे स्टेडियम (DY Patil stadium arrangement for Coldplay Concert)
BookMyShow नुसार, चाहते कॉन्सर्टमध्ये नवीन सिंगल We Pray, Feels Like Falling in Love तसेच बँडचा आगामी अल्बम मून म्युझिकची अपेक्षा करू शकतात. यासोबतच बँड यलो, द सायंटिस्ट, क्लॉक्स, फिक्स यू, व्हिवा ला विडा, पॅराडाइज, ए स्काय फुल ऑफ स्टार्स आणि ॲडव्हेंचर ऑफ अ लाइफटाईम ही गाणी सादर करणार आहेत. मुंबईतील ज्या स्टेडियममध्ये हा कॉन्सर्ट होणार आहे त्याची पाच भागात विभागणी करण्यात आली आहे. हे तीन-स्टेज स्टँड, लाउंज आणि ग्राउंडमध्ये आहेत, त्यापैकी तीन-स्टेज स्टँडच्या तिसऱ्या स्तराचे तिकीट सर्वात स्वस्त आहे.
तीन दिवस चालणार आहे कोल्डप्लेचा कॉन्सर्ट (Coldplay Concert date 2025 India)
कोल्डप्ले बँडची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूरची घोषणा झाल्यापासून लोक या कॉन्सर्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, कोल्डप्लेकडून त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील बँडचा कॉन्सर्ट दोन ऐवजी तीन दिवसांची असेल, असे या घोषणेमध्ये सांगण्यात आले आहे. त्यात 21 जानेवारी ही नवीन तारीखही जोडण्यात आली आहे. सध्याच्या घडीला २१ तारखेच्या काही तिकीटा शिल्लक आहेत. मात्र थोड्याच वेळात त्या संपतीलही.