मुंबई : (Blogging Tips Marathi) ब्लॉगिंग करून महिन्याला लाखो रूपये कमावणारे अनेक जण आहेत. अनेकांसाठी ब्लॉगिंग हा पूर्णवेळ व्यवसाय आहे, तर काही जण हा व्यवसाय पार्ट टाईम करून महिन्याला 50 ते 60 हजार रूपये कमावतात. अनेकांना ब्लॉगिग हा पैसे कमावण्याचा सोपा मार्ग आहे असे वाटतं मात्र तसं नाही. ब्लॉगिंगमधून पैसे कमावण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. याचा एकमेव फायदा आहे की, मिळणारा पैसा हा डॉलरमध्ये असल्याने तो भारतीय चलनात परवडणारा असतो. म्हणजेच एखाद्याने ब्लॉगिंग करून महिन्याला 1500 डॉलर कमावले तरी रूपयांत त्याला 125000 रूपये मिळतात. आता प्रश्न असा आहे की, ब्लॉगिंग क्षेत्रातही प्रचंड स्पर्धा वाढल्यामुळे 2024 मध्ये ब्लॉगिंग सुरू करावं का?
2024 मध्ये ब्लॉगिंग सुरू करावं का? (Should you start blogging in 2024)
2016 पासून ब्लॉगिंग क्षेत्रात करियर करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली. या क्षेत्रात ज्यांनी 2016 ते 2018 या काळात पदार्पण केले आणि आजही जे सातत्याने काम करत आहेत त्यांचे महिन्याचे उत्पन्न आठ ते दहा लाखांच्या घरात आहे. 2016 ते 2018 या काळात ब्लॉगिंग क्षेत्रात फार स्पर्धा नव्हती. जसजसे या क्षेत्रात कमाईला संधी असल्याचे लक्षात आले तसतसे अनेकांनी स्वतःची वेबसाईट सुरू करून पैसे कमावण्यास सुरूवात केली.
ब्लॉगिंग श्रेत्रात इतकी स्पर्धा असतानाही आता 2024 मध्ये ब्लॉगिंग सुरू करावी का? असा प्रश्न अनेकांना आहे. तर उत्तर आहे होय. कितीही स्पर्धा असली तरी ब्लॉगिंगमध्ये पैसे कमावण्यासाठी आताही संधी आहे. अनेक जण ब्लॉगिंग मोठ्या उत्साहाने सुरू करतात मात्र त्यांचा उत्साह काळी काही काळासाठीच असतो. यामागचे कारण म्हणजे एखाद्याने वेबसाईट सुरू केली की, लगेच त्याचे उत्पन्न सुरू होत नाही. वेबसाईट सुरू केल्यानंतर त्यावर कंटेन्ट टाकावा लागतो. तो कंटेट ओरिजनल आणि लोकांना आवडणारा तसेच कामाचा असावा लागतो.
वेबसाईटवर टाकलेला कंटेंट हा वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवासुद्धा लागतो. या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं किमान सहा ते सात महिने सातत्याने कारावे लागते. त्यानंतर वेबबाईटवर ट्राफिक येऊ लागते. एकदा का वेबसाईटवर ट्राफिक येऊ लागले की त्यावर गुगल अॅड सेंसद्वारे पैसे कमाविता येते. आता ही मेहनत प्रत्त्येकज जण साततत्याने करणारे फार कमी आहेत.
अनेक जण महिन्या-दोन महिन्यातच आपले काम बंद करतात, असे सगळे या स्पर्धेतून बाद होतात. फक्त सातत्याने काम करणारे तेवढे टिकून राहतात. आजच्या तारखेलासुद्धा वेबसाईट सुरू करून त्यावर पाच ते सहा महिने साततत्याने काम केल्यास उत्त्पन्न निघू शकते. लोकांना आवणाऱ्या तसेच कामाच्या विषयावर माहिती दिल्यास तीला चांगला वाचक वर्ग मिळेल आणि गुगलही अशा पोस्टला रँक करतो.
अॅडसेंसने पैसे कसे कमावतात? (How to make money with Adsense)
वेबसाईटवर होणारी कमाई ही Google Adsence मधून होत असते. वेबसाईटवर ट्राफिक येत असेल तर तूम्ही Google Adsence साठी अप्लाय करू शकता. Adsence अप्रुव्ह करण्यासाठी गुगलचे काही मानक आहेत. जे गुगलने त्याच्या Google for creators या त्याच्या वेबसाईटवर दिलेले आहे. ते पाळले जात असल्यास अशा वेबसाईटवर गुगल जाहिराती दाखवतो. या जाहिराती जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहचतील त्याप्रमाणे गुगल त्या वेबसाईटला पैसे देतो. म्हणजे थोडक्यात काय तर आपल्या वेबसाईटवर जाहिराती दाखवण्याचे गुगल पैसे देतो.
एखाद्या वेबसाईटवर जितके जास्त ट्राफिक तितकी जास्त त्यातून कमाई होते. असे असले तरी वेबसाईटवर येणाऱ्या ट्राफिकवर आणि टाकल्या जाणाऱ्या कंटेंटवर गुगलचे बारीक लक्ष असते. कुठल्याही नियमांचे उल्लंघन केल्यास गुगल त्याचे Adsence अकाउंट रद्द देखील करू शकतो.
दोन प्रकारे करता येते कमाई
जर एखादा वापरकर्ता ब्लॉग साइट, न्यूज साइट, मंच आणि चर्चा मंडळ, सोशल नेटवर्क किंवा इंटरनेटवर विनामूल्य ऑनलाइन टूल चालवत असेल तर तो Google वरून कमाई करू शकतो. मजकूर वेबसाइट व्यतिरिक्त, वापरकर्ता YouTube चॅनेल तयार करून Google च्या या प्लॅटफॉर्मवरून देखील कमाई करू शकतो.
आपण ऑनलाइन वेबसाइटवर पैसे कसे कमवू शकता?
ॲडसेन्स कस्टम सर्चची मदत ऑनलाइन वेबसाइट्सवर घेतली जाऊ शकते. जेव्हा एखादा वापरकर्ता एखाद्या विशिष्ट सामग्रीसाठी आपल्या वेबसाइटला भेट देतो तेव्हा त्याला शोध बटण पर्यायावर जावेसे वाटेल.
वापरकर्त्याने सामग्री शोधताच आणि एंटर बटणावर क्लिक करताच, त्याला संबंधित शोध पर्याय मिळतील आणि AdSense सानुकूल शोधाच्या मदतीने, जाहिराती देखील पॉप अप होतील, सामग्री निर्मात्याला या जाहिरातींसाठी पैसे दिले जातील.
अशा प्रकारे तुम्ही यूट्यूब चॅनलवरून कमाई करू शकता
जर तुम्ही YouTube वर कंटेंट तयार करून एखादे चॅनेल तयार केले तर येथेही तुम्ही गुगलच्या मदतीने पैसे कमवू शकता. त्यासाठी चॅनल लोकप्रिय होणे गरजेचे आहे. तुम्ही चॅनल फीचर्स विभागात जाऊन कमाई पर्यायावर क्लिक करू शकता.
AdSense खात्याशी चॅनेल लिंक करण्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून कमाई केली जाऊ शकते. येथे सामग्री निर्मात्याला त्याच्या आवडीच्या जाहिराती निवडण्याची सुविधा देखील मिळते.
Google मोफत सेवा का पुरवते?
वास्तविक हे दोन पक्षांमध्ये मध्यस्थाचे काम करते. सामग्री निर्मात्याला पैसे देण्यास इच्छुक असलेली जाहिरात कंपनी त्याच्या वेबसाइट किंवा चॅनेलवर जाहिराती दाखवण्यासाठी पैसे देते. या किमतीच्या 100 टक्के पैकी, Google काही भाग स्वतः ठेवत असताना, सामग्री निर्मात्याच्या नावावर एक मोठा भाग हस्तांतरित करते.
कमाईसाठी चांगले ट्राफीक आवश्यक आहे
Google कडून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी, कंटेंट क्रिएटरला त्याच्या वेबसाइटवर चांगले ट्राफिक आणणे आवश्यक आहे. Google चे हे प्लॅटफॉर्म वेबसाइटवरील जाहिरातींवर क्लिक करून काम करते.
वेबसाइटवर व्हिजीटर्सची संख्या जितकी जास्त असेल तितकी जाहिराती क्लिक होण्याची शक्यता जास्त असेल. त्याचप्रमाणे, युट्युब चॅनलला भेट देणाऱ्या युजरला कंटेंट पाहण्यापूर्वी जाहिरात पाहावी लागते. ही जाहिरात सामग्री निर्मात्यासाठी उत्पन्नाचा स्रोत आहे.
आपण किती कमवू शकता?
Google कडून कमाईची किंमत पूर्णपणे कंटेंट क्रिएटरलाच्या सामग्रीवर अवलंबून असते. जर चांगले चांगले असेल आणि वेबसाइटला भेट देणाऱ्यांची संख्या जास्त असेल, तर कमाईचा आकडा लाखो रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. Google कंटेंट क्रिएटरलाची कमाई त्याच्या बँक खात्यात हस्तांतरित करते. ते दर महिन्याच्या एका निश्चित तारखेला मिळते.