You are currently viewing Benefits of Diamond : रातोरात नशिब बदलतो ‘हा’ रत्न, चुंबकासारखे आकर्षित करते धन
Benefits of Dimond

Benefits of Diamond : रातोरात नशिब बदलतो ‘हा’ रत्न, चुंबकासारखे आकर्षित करते धन

मुंबई :  महिलांना हिऱ्याच्या दागिण्यांचे प्रचंड आकर्षण असते. त्यामुळे बऱ्याचदा लग्नाची मागणी घालताना किंवा साक्षगंधाला हिऱ्याची अंगठी (Benefits of Diamond) घालण्याला प्राधान्य दिले जाते. नेकलेस असो किंवा अंगठी, ती दिसायला जितकी सुंदर असते तितकीच ती परिधान केल्यावर तुमचे व्यक्तिमत्व वाढवते. आहिऱ्याचा वापर केवळ दागिने बनवण्यासाठी केला जात नाही. त्याला जोतिषशास्त्रातही विशेष महत्त्व आहे. हिरा हे एक अतिय शक्तिशाली रत्न आहे, जे रातोरात तुमचे भाग्य बदलू शकते.

हिऱ्याचे जोतिषशास्त्रात महत्त्व

हिरा ते फक्त दागिन मानून परिधान केले जाते जे चुकीचे आहे. हे एक अतिशय शक्तिशाली रत्न आहे आणि त्याचा योग्य वापर केल्यास तुमची सर्व भौतिक स्वप्ने पूर्ण होऊ शकतात.

वास्तविक हिरा शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो आणि त्याचा कारक आहे, म्हणूनच जेव्हा तुम्ही हिरा परिधान कराता तेव्हा तुमचा शुक्र आणखी मजबूत होतो. त्यामुळे पैसा, गाडी, बंगला, मालमत्ता, सौंदर्य आणि आकर्षक व्यक्तिमत्व यासारख्या गोष्टी माणसाच्या आयुष्यात आकर्षित होतात. पण, याचा अर्थ असा नाही की कोणीही हिरा घालू शकतो आणि फायदा मिळवू शकतो. ज्याच्या पत्रिकेत शुक्र योग्य स्थितीत असेल तोच हिरा धारण करू शकतो.

ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती ठीक नाही अशा व्यक्तीने जर त्याने हिरा घातला तर हे रत्न त्याचे उलट परिणाम होतील थोडक्यात काय तर, त्या व्यक्तीला धन हानीचा सामना करावा लागतो. त्याचा विपरीत परिणाम प्रत्येक गोष्टीत दिसून येईल. व्यक्तीचे आरोग्य बिघडेल आणि चिंता तसेच तणावासारखी परिस्थिती निर्माण होईल.

कोणत्या राशीच्या लोकांनी धारण करावा हिरा?

ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ, मिथुन, कन्या, मकर, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हिरा परिधान करणे शुभ मानले जाते. यापैकी, वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांसाठी हे सर्वात फायदेशीर सिद्ध होते. कारण तूळ आणि वृषभ राशीचा गुरू शुक्र आहे. त्याच वेळी, जर पत्रिकेत शुक्र सकारात्मक स्थितीत असेल तर आपण हिरा परिधान करू शकता.

Liquor Policy Scam : असा आहे मद्य घोटाळा ज्यामुळे केजरीवाल फसले

या क्षेत्रांशी संबंधित लोक देखील करू शकतात परिधान

जे लोक फॅशन डिझायनिंग, फिल्म किंवा मीडिया लाईनशी संबंधित आहेत ते हिरा घालू शकतात. जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात समस्या येत असतील तर हिरा धारण करणे शुभ मानले जाते. कारण शुक्र ग्रह हा वैवाहिक जीवनाचा कारक मानला जातो.

परिधान करण्याचा विधी

हिरा चांदीच्या किंवा सोन्याच्या अंगठीत मढवून घालता येतो. हिरा शुक्रवारी सूर्योदयानंतर धारण करावा. त्याआधी तुम्ही तुमची अंगठी पाण्यात गंगाजल, दूध, साखर आणि मध मिसळून त्यात ठेवावी. यानंतर शुक्रदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर त्या पाण्यातून अंगठी काढून लक्ष्मीच्या चरणी ठेवावी. यानंतर तुम्ही ती परिधान करू शकता.

सगळ्यांसाठीच लाभदायक नाही हिरा

हिरा घालण्याचे तोटे

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक राशीसाठी हिरा शुभ मानला जाऊ शकत नाही. अशा काही राशी आहेत ज्यांनी कोणत्याही स्वरूपात हिऱ्याचे दागिने घालू नयेत. जर या राशीच्या लोकांनी हिरा दागिने म्हणून परिधान केला तर त्यांच्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. अशा लोकांना व्यवसाय आणि नोकरीत नुकसान होऊ लागते. घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते, त्यामुळे जर तुम्ही हिरा घालणार असाल तर विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेणे चांगले.

कोणत्या राशीच्या लोकांनी हिरा घालू नये?

काही लोक दागिने म्हणून हिरे घालतात, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशी आहेत ज्यांनी हिऱ्याच्या अंगठी किंवा हिऱ्याचा हार घालू नये. यामध्ये मेष, मीन, कर्क आणि वृश्चिक यांचा समावेश आहे. या राशीच्या लोकांना हिरा धारण केल्याने किंवा ठेवल्याने नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. जर या राशीच्या लोकांनी हिरा रत्न कोणत्याही रूपात धारण केले तर त्यांना जीवनात अडचणी येऊ लागतात.
लाल किताबानुसार ज्या राशीच्या लोकांच्या पत्रिकेत शुक्र तिसऱ्या, पाचव्या आणि आठव्या घरात आहे त्यांनी हिरा घालू नये.

जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र, मंगळ आणि गुरू ग्रह किंवा त्यांपैकी कोणत्याही एका राशीत ठेवल्यास हिरा माराकेशप्रमाणे वागतो. अशा स्थितीत ती व्यक्ती कोणत्या ना कोणत्या प्रकारचे पाप किंवा आत्महत्येकडे प्रवृत्त होते.

जेमोलॉजीनुसार, हिरा माणिक आणि कोरलसह देखील परिधान करू नये.
मिथुन राशीच्या लोकांनी हिरा घालू नये. कारण त्याचे नक्षत्र मृगाशिरा आहे. अशा परिस्थितीत जर या राशीच्या लोकांनी हिरा धारण केला तर व्यभिचार जवळजवळ निश्चित आहे.
(अस्विकरण – वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दूजोरा देत नाही.)

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply