You are currently viewing Bajaj CNG Bike Price : बजाज सीएनजी बाईकची किंमत आणि मायलेज
Bajaj CNG Bike

Bajaj CNG Bike Price : बजाज सीएनजी बाईकची किंमत आणि मायलेज

मुंबई : (Bajaj CNG Bike Price) काळ बदलत असतो आणि काळासोबत तंत्रज्ञानही बदलते. सध्या पेट्रोल आणि इलेक्ट्रीक दुचाकी रस्त्यावर धावतात मात्र आता यापुढे सीएनजी दुचाकीसुद्धा रस्त्यावर धावताना दिसणार आहे. देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने जे आजपर्यंत जगात कोणीही केले नाही ते करून दाखविले आहे. बजाज ऑटोने आज अधिकृतपणे जगातील पहिली CNG बाइक बजाज फ्रीडम विक्रीसाठी लाँच केली आहे. या ऐतिहासिक मोटारसायकलच्या लाँचिंगला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते, त्यांनी या मोटरसायकलला गेम चेंजर म्हटले. आकर्षक लुक आणि स्पोर्टी डिझाईनने सुसज्ज असलेल्या या बाईकची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.

बाईकमध्ये असणार 125 सीसी इंजिन

बजाजच्या सीएनजी मोटरसायकलमध्ये 125 सीसी इंजिन असेल, जे फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह जोडले जाईल. आता त्याच्या सिलिंडरची पोझिशनिंग काय असेल, हे लाँच झाल्यानंतरच कळेल, एकंदरीत पाहाता ही मोटरसायकल इतर दुकाकींसारखीच आहे मात्र त्यात अतिरिक्त सीएनजी सिलेंडर बसवण्यात आलेले आहे. हँडलबारच्या डाव्या बाजूला एक स्विच असेल, ज्याला दाबून लोक त्यांच्या गरजेनुसार थेट पेट्रोलवरून सीएनजीवर स्विच करू शकतील आणि हे खरोखरच एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य आहे.

मायलेज किती असेल?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बजाजच्या CNG मोटरसायकलचे मायलेज पेट्रोलपेक्षा जास्त असेल. मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की एक लीटर सीएनजीवर एक सीएनजी मोटरसायकल 100 किलोमीटरपर्यंत धावू शकते.

Bajaj CNG Bike Price
Bajaj CNG Bike Price

फीचर्सबद्दल थोडक्यात

फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने दमदार फीचर्स असलेली ही बाईक तयार केली आहे. बाईकमध्ये कम्फर्टची काळजी घेण्यात आली असून सीट ही सेगमेंटमध्ये सर्वात लांब आहे.

याशिवाय स्टायलिंगवरही भर दिला आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान पॅकेजिंग देखील प्रदान केले गेले आहे आणि आणखी मजबूत ट्रेलीस फ्रेम तसेच लिंक्ड मोनोशॉक प्रदान केले गेले आहेत. कंपनीने बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प दिले आहेत, जे सध्याच्या काळात सर्वात लोकप्रिय वैशिष्ट्यांपैकी एक आहे. जर आपण बाहेरून पाहिले तर आपल्याला दुहेरी रंगाचे ग्राफिक डिझाइन दिसू शकते.

 किंमत किती असणार?

कंपनीने बजाज फ्रीडम एकूण तीन प्रकारांमध्ये सादर केले आहे. जे डिस्क ब्रेक आणि ड्रम ब्रेक ब्रेकिंग सिस्टम दोन्हीसह येते. ही बाईक एकूण 7 रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये कॅरिबियन ब्लू, इबोनी ब्लॅक-ग्रे, प्युटर ग्रे-ब्लॅक, रेसिंग रेड, सायबर व्हाईट, प्युटर ग्रे-येलो, इबोनी ब्लॅक-रेड रंगांचा समावेश आहे.

  • बजाज फ्रीडम ड्रम 95,000 रुपये
  • बजाज फ्रीडम ड्रम LEDRs 1,05,000 रूपये
  • बजाज फ्रीडम डिस्क एलईडी 1,10,000 रुपये

बजाज ऑटोचा दावा आहे की या बाइकची रनिंग कॉस्ट कोणत्याही पेट्रोल मॉडेलपेक्षा खूपच कमी आहे. दैनंदिन वापरादरम्यान त्याच्या ऑपरेशनची किंमत अंदाजे 50 टक्के कमी केली जाईल. या अर्थाने, या बाईकचा वापर करून वाहन वापरणारे पुढील 5 वर्षात अंदाजे 75,000 रुपयांची बचत करू शकतात.

सीएनजी बाइकचे धोके काय आहेत?

सीएनजी बाईक पहिल्यांदाच बाजारात आली असल्याने अनेकांना हा प्रश्न पडला असेल की, सीएनजी मोटारसायकल धोकादायक आहेत का? पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि प्रदूषणामुळे CNG (कंप्रेस्ड नॅचरल गॅस) बाइक्सकडे किफायतशीर आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. पण सीएनजी बाईक त्या वाटतात तितक्या सुरक्षित आहेत का? वास्तविक, सीएनजी हा ज्वलनशील वायू आहे आणि टाकी किंवा पाइपलाइनमध्ये गळती झाल्यास आगीचा धोका वाढतो. अपघातात सीएनजी टाकी खराब होण्याची शक्यता असते.

सीएनजी टाकीमध्ये जास्त दाब निर्माण झाल्यास ती फुटू शकते. हे क्वचितच घडत असले तरी, तसे झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सीएनजी मोटारसायकलमध्ये पेट्रोल बाईकपेक्षा अधिक जटिल इंधन प्रणाली आहे, ज्यामुळे यांत्रिक बिघाडाचा धोका वाढतो, तथापि, सीएनजीने व्हिडिओद्वारे स्पष्टपणे सांगितले आहे की फ्रीडम 125 ने सुरक्षिततेशी संबंधित सर्व समस्यांचे निराकरण केले आहे . येथे एक गोष्ट नमूद करणे महत्त्वाचे आहे की भारतात सीएनजी रिफिलिंग स्टेशनचे नेटवर्क अजूनही विकसित होत आहे, ज्यामुळे बाइकस्वारांना इंधन भरण्यात अडचण येऊ शकते.

किती ग्राहकांनी केली खरेदी?

गेल्या जुलैमध्ये जेव्हा बजाज ऑटो लिमिटेडने देशातील आणि जगातील पहिली CNG मोटारसायकल बजाज फ्रीडम 125 लाँच केली तेव्हा अचानक लोकांमध्ये या बाईकबद्दल प्रचंड उत्साह निर्माण झाला आणि आतापर्यंत 60 हजारांहून अधिक ग्राहकांची चौकशी झाली आहे. आता डिलिव्हरी सुरू झाल्यानंतर पहिल्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये किती लोकांनी ते विकत घेतले हा प्रश्न येतो, 16 जुलै रोजी पुण्यात डिलिव्हरी सुरू झाल्यानंतर पुढील 15 दिवसांत 1,933 युनिट्सची डिलिव्हरी झाली. ते मर्यादित ठिकाणी होते. कंपनीने 15 ऑगस्टपर्यंत देशातील 78 शहरांमध्ये बजाज फ्रीडम 125 ची विक्री सुरू केली आहे आणि येणाऱ्या काळात सीएनजी बाईक लोकांना किती आवडते हे विक्रीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होईल.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply