You are currently viewing Apple logo history : खाल्लेलं सफरचंद नाही तर, असा होता Apple चा पहिला लोगो
Apple first logo

Apple logo history : खाल्लेलं सफरचंद नाही तर, असा होता Apple चा पहिला लोगो

मुंबई : (Apple logo history) ऍपलल म्हंटल्यानंतर डोळ्यासमोर येणारी पहिली गोष्ट हे सफरचंद नाही Apple कंपनीचा iPhone किंवा MacBook येतो. गेल्या काही वर्षात iPhone ने लोकांना अशी काही भूरळ घातली आहे की, ज्यामुळे प्रत्त्येकाला आपल्या जवळ Apple कंपनीचा iPhone असावा असं वाटतं. ऍपल कंपनीच्या कोणत्याही उत्पादनावर एक गोष्ट कायमच लक्ष वेधते ती म्हणजे त्याचा अर्धा खाल्लेल्या सफरचंदाचा लोगो. (Why apple logo is half bitten)

ऍपल कंपनीचा लोगो जगभरात प्रसिद्ध आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे, पण आज आपण पाहात असलेला लोगो हा कंपनीचा पहिलाच लोगो नाही. यात काळानुसार कंपनीने आपल्या लोगोमध्ये बदल केला. जाणून घेऊया कंपनीच्या लोगोचा काय इतिहास आहे. तसेच या लोगोचे नेमके काय वैशिष्ट्य आहे.

असा होता ऍपलचा पहिला लोगो

टेक कंपनी ऍपलचा लोगो आपण सगळ्यांनीच पाहिला आहे, पण या लोगोमध्ये खाल्लेले सफरचंदच का दाखवण्यात आले आहे? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? याशिवाय या ऍपलचा संबंध नेमका काय आहे असा प्रश्नही तुम्हाला कधी ना कधी नक्कीच पडला असेल खरं तर, सफरचंदची कथा आयझॅक न्यूटनशी संबंधित आहे. झाडावरून पडणाऱ्या सफरचंदाचे गूढ न्यूटनने सोडवले आणि गुरूत्वाकर्षणाचा शोध लागला.

अशा परिस्थितीत, खूप कमी लोकांना माहित असेल की Apple कंपनीचा पहिला लोगो 1976 मध्ये सफरचंदाच्या झाडाखाली बसलेल्या न्यूटनशी संबंधित होता. नंतर खाल्लेल्या सफरचंदाला ॲपल कंपनीचा लोगो बनवण्यात आला.

Frist Apple Logo
Frist Apple Logo

ऍपलचा लोगो कोणी डिझाइन केला?

खरं तर, Apple चे संस्थापक, स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक यांनी ठरवले की त्यांना त्यांच्या नवीन कंपनीसाठी अधिक आधुनिक लोगोची आवश्यकता आहे. या कामासाठी जॉब्सने ग्राफिक डिझायनर रॉब जॅनॉफची निवड केली. Apple लोगोसाठी ही प्रक्रिया अवघ्या दोन आठवड्यांत पूर्ण झाली आणि 1977 मध्ये Apple चा पहिला वैयक्तिक संगणक Apple II लाँच झाला. ज्यावर नवीन लोगो दिसत होते.

इंद्रधनुष्य सफरचंद लोगो

जॅनॉफची रचना त्याच्या साधेपणासाठी खास होती. हा लोगो 2D सफरचंद द्वारे दर्शविला गेला होता ज्याचा तुकडा कापला होता. ॲपलच्या या लोगोला इंद्रधनुष्याचा रंग देण्यात आला होता. कंपनीचा लोगो त्या काळातील ब्रँड्समध्ये एक वेगळी ओळख निर्माण करता यावा म्हणून हे करण्यात आले.

या कराणासाठी तयार केला गेला खाल्लेल्या सफरचंदाचा लोगो

सफरचंद अख्खे असू शकले असते का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. वास्तविक, असे म्हटले जाते की सफरचंदच्या या वेगळ्या आकाराचे कारण चेरी फळापेक्षा वेगळे दिसणे हे होते. सफरचंद आणि चेरीचे आकार सारखा आहे. अख्खा सफरचंद लोगो म्हणून ठेवला असता तर, लोकांना तो चेरी सारखा वाटू शकला असता. मात्र खाल्लेल्या सफरचंदामुळे हा फरक दिसून येतो.

लोकांना कुठलाही संभ्रम न होता या लोगोमध्ये दिसणारं फळं हे सफरचंद म्हणजेच ऍपल आहे हे सहज ओळखता येतं.आज दिसणारा ऍपल लोगो राखाडी रंगात खाल्लेले सफरचंद आहे. यापूर्वी हा लोगो काळ्या, पांढऱ्या आणि निळ्या रंगातही दिसला आहे.

 एकेकाळी बुडण्याच्या मार्गावर होती ऍपल कंपनी

ऍपलसाठी टिम यांना भाग्यशाली मानली जाते. ते 1998 मध्ये ऍपल कंपनीत रुजू झाले तेव्हा कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती. 2000 मध्ये, टिम कुक ऍपलचे विक्री आणि व्यवस्थापनाचे उपाध्यक्ष बनले. यानंतर, 2004 मध्ये, त्यांनी अंतरिम सीईओ आणि मॅकिंटॉश विभागाचे प्रमुखपद भूषवले. 2009 मध्ये, जेव्हा स्टीव्ह जॉब्स प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर गेले, तेव्हा कुक यांना अंतरिम सीईओ म्हणून घोषित करण्यात आले. ऑगस्ट 2011 मध्ये स्टीव्ह जॉब्सच्या मृत्यूनंतर टिमला ॲपलचे सीईओ बनवण्यात आले.

 

आज 235 लाख कोटी रुपयांची कंपनी आहे ऍपल

2011 मध्ये टीम कुक सीईओ बनल्यापासून, ऍपल 235 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅपसह जगातील सर्वात श्रीमंत टेक कंपनी बनली आहे. 2018 मध्ये टीम कुकला बोनस म्हणून 84 कोटी रुपये मिळाले. 2022 मध्ये Apple CEO म्हणून टिम कुकचे वार्षिक पॅकेज $99.4 दशलक्ष म्हणजेच 815 कोटी रुपये होते. त्यानुसार त्यांची एका दिवसाची कमाई 2.23 कोटी रुपये होती. पण 2023 मध्ये, टीम कुकने स्वतःचे वार्षिक पॅकेज $ 49 दशलक्ष म्हणजे सुमारे 402 कोटी रुपये कमी केले. त्यानुसार आता त्यांची रोजची कमाई 1.10 कोटी रुपये आहे.

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply