You are currently viewing APJ Abdul Kalam’s Death Anniversary 2024 : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार
Dr. APJ Abdul Kalam's Quote Marathi

APJ Abdul Kalam’s Death Anniversary 2024 : डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार

मुंबई : (APJ Abdul Kalam’s Death Anniversary 2024)  ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे भारतरत्न आणि प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रत्येक भारतीयांच्या मनात एक आदराचे स्थान आहे. 27 जूलैला त्यांची पुण्यतीथी असते. डॉक्टर एपीजे अब्दूल कलाम यांचा जीवनप्रवास अत्यंत खडतर होता. प्रतिकूल परिस्थीतीवर मात करून त्यांनी एक इतिहास घडविला आहे. त्यांचे विचार हे जीवनात उंची गाठण्यासाठी प्रचंड प्रेरणा देतात. डॉक्टर एपीजे अब्दूल कलाम यांच्या पुण्यतिथी निमीत्त त्यांचे काही अनमोल विचार जाणून घेऊया.

डॉ. एपीजे अब्दूल कलाम यांचे प्रेरणादायी विचार (Dr. APJ Abdul Kalam Quotes Marathi)

  • जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे जळा.
  • स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत पाहतात, स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत.
  • जीवन एक कठीण खेळ आहे. तुम्ही एक माणूस असण्याचा तुमचा जन्मसिद्ध हक्क जपून तुम्ही यावर मात करू शकता.
  • विज्ञान ही मानवतेला मिळालेली एक सुंदर देणगी आहे, ती आपण खराब करू नये.
  • स्वप्ने पूर्ण होण्याआधी तुम्हाला स्वप्न पहावे लागेल.
  • आपण काही गोष्टी बदलू शकत नाही हे मान्य करणे आवश्यक आहे.
  • हे शक्य आहे की आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसेल पण आपल्या सर्वाना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी आहे.
  •  वेगळा विचार करण्याचे धाडस करा, शोध लावण्याचे धाडस करा, अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा, अशक्य गोष्टी शोधण्याचे धाडस करा आणि समस्यांवर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा. हे उत्कृष्ट गुण आहेत ज्यासाठी आपण कार्य केले पाहिजे.
  •  जर एखाद्या देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचा असेल तर मला असे वाटते की आपल्या समाजात असे 3 लोक आहेत जे ते करू शकतात. हे तीनजण म्हणजे वडील, आई आणि शिक्षक आहेत.
  •  जेव्हा आपल्याला अडथळ्यांचा सामना करावा लागतो तेव्हा आपल्याला आढळते की आपल्यामध्ये धैर्य आणि लवचिकता आहे, ज्याची आपल्याला स्वतःला जाणीव नव्हती आणि जेव्हा आपण अपयशी होतो तेव्हाच ते समोर येते. आपण त्यांना शोधून जीवनात यशस्वी व्हायला हवे.
  •  जोपर्यंत भारत जगाच्या बरोबरीने उभा राहणार नाही, तोपर्यंत कोणीही आपला आदर करणार नाही. या जगात भीतीला जागा नाही. इथे फक्त शक्ती शक्तीचा आदर करते.
  • पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले.
  • जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.
  • जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.
  •  सर्जनशीलता म्हणजे एकाच गोष्टीचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे.
  • यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास

तामिळनाडूच्या रामेश्वरममध्ये 1931 मध्ये जन्मलेल्या मुलाची ही गोष्ट आहे. या मुलाने आपले बालपण अत्यंत गरिबीत घालवले, त्याचे वडील एक साधे मासेमार होते. वडिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही अवघड होते. घरची परिस्थिती जेमतेम असलेल्या वातावरणात राहूनही या मुलाला सुरुवातीपासूनच अभ्यास करण्याची इच्छा होती. त्यांच्या कुटुंबातील 4 भाऊ आणि एका बहिणीमध्ये ते सर्वात लहान होते. हा मुलगा पुढे भारताचा 11वा राष्ट्रपती झाला. होय, ही गोष्ट आहे देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची

डोळ्यात शिक्षणाचे स्वप्न घेऊन लहान मुलाचे बालपण, खेळण्या बागडण्याच्या दिवसात शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी वर्तमानपत्रे विकावी लागली. अब्दुल कलाम 8 वर्षांचे असताना 4 वाजता उठायचे, रोजच्या कामानंतर गणिताचा अभ्यास करायला जायचे. शिकवणीवरून परतल्यानंतर त रामेश्वरम रेल्वे स्थानक आणि जवळच्या बस स्थानकांवर दररोज वर्तमानपत्रे विकायचा.

या दिवशी घेतला एरोनॉटिकल इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्याचा निर्णय

वर्षांमागून वर्षे गेली. ते कष्टाळू लहान मूल पाचवीत आले. एके दिवशी पाचवीच्या वर्गात शिक्षकांनी मुलांना विचारले की पक्षी कसे उडू शकतात. मुलांपैकी एकही उत्तर देऊ शकले नाही. दुसऱ्या दिवशी शिक्षक मुलांना समुद्रकिनारी घेऊन गेले. तेथे त्यांनी मुलांना उडणारे पक्षी दाखवले, त्यांच्या उडण्याचे कारण आणि पक्ष्यांच्या शरीराची रचना सांगितली. सर्व मुले शिक्षकांचे म्हणणे ऐकत होती, पण अबद्दुल कलाम यांच्या डोक्यात अनेक विचार सुरू होते.  याच दिवशी त्यांनी भविष्यात विमान क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. मग मोठे झाल्यावर त्यांनी मद्रास अभियांत्रिकी महाविद्यालयातून भौतिकशास्त्र आणि वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले.

‘मिसाईल मॅन’ या पदवीने सन्मानित

अत्यंत गरिबीत वाढलेले अब्दुल कलाम साध्या स्वभावाचे होते. ते भारताचे माजी राष्ट्रपती, एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून प्रसिद्ध झाले. सुमारे चार दशके त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ची शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून देखरेख केली. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि वाहन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारतातील ‘मिसाईल मॅन’ ही पदवी प्रदान करण्यात आली.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply