मुंबई : (Dark circles) डोळ्याखाली काळ्या वर्तुळाची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांसाठीही त्रासदायक असते. डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसली की चेहरा विद्रृप दिसतो. तुम्हीसुद्दा या समस्येचा सामना करत असाल तर डार्क सर्कलसारख्या समस्येला तोंड देणारे तुम्ही एकटे नाही. अगदी प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींनाही या समस्येचा सामना करावा लागला आहे आणि ही काळी वर्तुळे लपवण्यासाठी मेकअप आणि कन्सीलरचा सहारा घ्यावा लागला आहे. वास्तविक, डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा अतिशय संवेदनशील असते. अशा परिस्थितीत, ते कमी करण्यासाठी, आपण रासायनिक उत्पादनांऐवजी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला पाहिजे. आज आपण काळी वर्तुळे येण्याची कारणे कोणती आहेत आणि या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही कोणते उपाय (Home remedies) केले पाहिजेत या बद्दल जाणून घेऊया.
या कारणांमुळे होऊ शकतात डोळ्यांखाली काळी वर्तुळे
- दोन्ही डोळ्यांखालील त्वचा सामान्यपेक्षा जास्त गडद झाली की काळी वर्तुळे दिसतात.
- जेव्हा तुम्ही थकलेले असता तेव्हा डोळ्यांखाली काळी वर्तुळे अधिक दिसतात.
- जास्त मद्यपान केल्याने आणि मानसिक ताण घेतल्यानेही डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात.
- जास्त टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यानेही ही समस्या उद्भवते.
काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर
एका भांड्यात 2 चमचे दूध घ्या आणि त्यात 1 चमचा व्हिटॅमिन ई तेल, 1 चमचे कॉफी आणि 1 चमचा ग्रीन टी घाला. हे सर्व साहित्य चांगले मिसळा. याची पेस्च तयार करा. ही पेस्ट डोळ्यांखाली लावा. 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. हा आय मास्क आठवड्यातून तीन दिवस लावा. यामुळे काही दिवसात तुमची काळी वर्तुळे कमी होतील.
काही सोपे आणि घरगुती उपाय
- कच्चा बटाटा : कच्चा बटाटा मॅश करून त्याचा रस काढा. कापसाच्या मदतीने हा रस डोळ्यांखाली लावा. नंतर 10 मिनिटांनी धुवा. बटाट्याला नैसर्गिक ब्लीचिंग एजंट मानले जाते, ते त्वचा उजळ करते आणि काळी वर्तुळे कमी करते.
- काकडी : काकडीचे दोन तुकडे करा आणि डोळ्याखाली ठेवा. 15-20 मिनिटांनी काढा आणि चेहरा धुवा. काकडी रोज लावल्यास डोळ्यांना आर्द्रता मिळते आणि रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे काळी वर्तुळे कमी होतात.
- थंड चहाच्या पिशव्या : यासाठी सर्वप्रथम टी बॅग पाण्यात बुडवून फ्रिजमध्ये ठेवा. नंतर ते थंड झाल्यावर टी बॅग डोळ्यांवर 10 ते 12 मिनिटे ठेवा. त्याचा रोज वापर करा. कॅफिन जळजळ दूर करण्याचे काम करते.
- कोरफड : एलोवेरा जेल काढा आणि डोळ्यांखाली लावा आणि रात्रभर राहू द्या. याशिवाय तुम्ही ते लावू शकता आणि 5 ते 7 मिनिटे मसाज करू शकता. त्यानंतर चेहरा धुवा. कोरफड हा एक जादुई उपाय आहे आणि त्वचेला अनेक फायदे देतो. यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळेही कमी होतात.
- टोमॅटो आणि लिंबाचा रस : टोमॅटोचा रस काढा आणि त्यात लिंबाचे काही थेंब घाला. आता हे मिश्रण 10 मिनिटे डोळ्यांखाली लावा. नंतर थंड पाण्याने धुवा. टोमॅटो एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे आणि त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात, जे काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.
- गुलाब पाणी : कॉटन बॉलच्या मदतीने डोळ्यांवर गुलाबपाणी लावा. 10-15 मिनिटांनी चेहरा धुवा. गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करण्याचे काम करते. याव्यतिरिक्त, त्यात त्वचा उजळण्याचे गुणधर्म देखील आहेत.
- थंड दूध : कापसाच्या साहाय्याने डोळ्याभोवती थंड दूध लावा. 10 मिनिटे राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. ते रोज लावा. थंड दूध हे नैसर्गिक क्लींजर आहे, जे डोळ्यांच्या आजूबाजूच्या नाजूक त्वचेला फायदेशीर ठरते. तसेच, दुधामध्ये असलेले पोटॅशियम त्वचेला मॉइश्चरायझेशन ठेवते.
- संत्र्याचा रस : संत्र्याचा रस काढा आणि त्यात ग्लिसरीनचे काही थेंब घाला. आता हे मिश्रण 10-15 मिनिटे डोळ्यांखाली लावा. नंतर कोमट पाण्याने धुवा. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर असते. त्यात ग्लिसरीन घातल्यास ते त्वचेला नैसर्गिक चमक देण्याचे काम करते.
- खोबरेल तेल : खोबरेल तेलाचे काही थेंब घेऊन डोळ्यांखाली मसाज करा आणि रात्रभर राहू द्या. सकाळी पाण्याने धुवा. नारळाच्या तेलामुळे त्वचा स्वच्छ तर होतेच पण ती मऊही होते. त्यामुळे डोळ्यांभोवतीची सूजही कमी होते.
- पुदीनाची पाने : पुदिन्याची काही पाने घेऊन बारीक करा. नंतर डार्क सर्कलवर लावा. 10-15 मिनिटांनी धुवा. पुदीना नैसर्गिकरित्या थंडगार आहे, ज्यामुळे थकलेल्या डोळ्यांना आराम मिळतो. व्हिटॅमिन सीमुळे काळी वर्तुळे कमी होतात.
उपायाव्यतिरिक्त, आपण आपली जीवनशैली सुधारली पाहिजे. चांगला आहार पाळा. आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करा. स्वतःला हायड्रेटेड ठेवा. रात्री लवकर झोप अजिबात टेन्शन घेऊ नका. स्क्रीन वेळ कमी करा. डोळ्यांची काळजी घ्या. नियमीत व्यायाम करा.