You are currently viewing PM Kisan yojna Marathi : खात्यात पैसे जमा झाले का? असे तपासा
PM Kisan yojna 17th Installment Status

PM Kisan yojna Marathi : खात्यात पैसे जमा झाले का? असे तपासा

नवी दिल्ली : (PM Kisan yojna 17th Installment Status) पंतप्रधान किसान योजनेचा 17 वा हप्ता जारी करण्यास पंतप्रधानांनी मंजुरी दिली, ज्याची रक्कम सुमारे 20,000 कोटी रुपये आहे आणि ती 9.3 कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. ही रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत असेल त्यांना पीएम किसानच्या 17 व्या हप्त्याचा लाभ दिला जाईल. पैसे मिळतील की नाही? हे तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता.

तुम्हाला पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार आहे का? असे तपासा

शेतकरी या चरणांमध्ये लाभार्थी यादीत त्यांचे नाव तपासू शकतात.

  •  पीएम किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • फार्मर्स कॉर्नरवर जा आणि लाभार्थी यादीकडे जा. 3. तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करा.
  • “डेटा मिळवा” वर क्लिक करा.
  • लाभार्थी स्थिती पहा.
  • देयक स्थिती तपासा.

पैसे खात्यात मिळवण्यासाठी तुमचे ई-केवायसी पूर्ण होणे आणि आधार कार्ड खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे, त्याशिवाय पैसे तुमच्या खात्यात येणार नाहीत.

जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर तुम्ही पीएम किसान हेल्पलाइन नंबर 1800-115-5525 वर संपर्क साधू शकता.

पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी येणार?

मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला देशातील करोडो शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. याचा अर्थ त्यांची प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येऊ शकते. तथापि, PM किसान (PM Kisan 17th Kist) चा पुढचा हप्ता कधी येईल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी किसान सन्मान निधी योजना चालवली जात आहे. 24 फेब्रुवारी 2019 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाली. या अंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6000 रुपये दिले जातात.

तथापि, पीएम किसान सन्मान योजनेद्वारे, सरकार शेतकऱ्यांना एकाच वेळी 6000 रुपये देत नाही तर 2000-2000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये देते.

पीएम किसानचा पुढील हप्ता मिळविण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. जर तुम्ही PM किसान योजना (PM Kisan Yojna 2024) चे लाभार्थी असाल आणि तुम्हाला पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमच्यासाठी e-KYC करणे अनिवार्य आहे. म्हणूनच, जर तुम्ही हे महत्त्वाचे काम अद्याप केले नसेल तर, विलंब न करता आजच ते पूर्ण करा. तुम्ही असे न केल्यास तुम्हाला पीएम किसान सन्मान योजनेच्या 17 व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते.

पीएम किसान सन्मान निधीसाठी असे करा आवेदन

स्टेप 1

तुम्हीही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही अर्ज करू शकता आणि दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांच्या हप्त्याचा लाभ घेऊ शकता.
यासाठी सर्वप्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल.

स्टेप 2

पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला ‘न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन’ हा पर्याय दिसेल.
तुम्हाला यावर क्लिक करावे लागेल
मग तुम्हाला ‘ग्रामीण शेतकरी नोंदणी’ किंवा ‘शहरी शेतकरी नोंदणी’ यापैकी एक निवडावा लागेल.
यानंतर तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक भरावा लागेल.

स्टेप 3

त्यानंतर तुमचे राज्य निवडा आणि स्क्रीनवर दिलेल्या कॅप्चा कोडवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला Get OTP पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्ही टाकलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो इथे भरा.

 स्टेप 4

आता तुम्हाला ‘नोंदणीसाठी पुढे जा’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा, बँक आणि आधार कार्डची माहिती द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्रे अपलोड करावी लागतील
मग शेवटी तुम्हाला ‘सेव्ह’ बटणावर क्लिक करावे लागेल.
हे केल्यानंतर तुमचा अर्ज पूर्ण होईल.

ही योजना नेमकी काय आहे ते देखील जाणून घेऊया

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू झाली. ही योजना पूर्णपणे शेतकऱ्यांना समर्पित असून, केंद्र सरकारकडून 100 टक्के निधी दिला जातो. योजनेअंतर्गत, सर्व पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ते आर्थिक मदतीसाठी पात्र शेतकरी कुटुंबांना ओळखतात आणि नंतर त्यांना हप्त्याने पैसे मिळू लागतात. किसान सन्मान निधीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेचा उद्देश लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजांसाठी खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणे हा आहे. अनेकदा शेतकरी आपल्या किरकोळ गरजांसाठी सावकारांच्या तावडीत अडकतात. अशा संकटातून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आहे. पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या अशा शेतकरी कुटुंबांना योजनेचा लाभ उपलब्ध आहे. तसेच ज्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन आहे. योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये वर्ग केले जातात.

केवायसी कसे अपडेट करावे (How to update PM Kisan Yojna KYC)

सर्वप्रथम https://fw.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx ही लिंक ओपन करा. येथे तुम्हाला OTP आधारित ई-केवायसी दिसेल. बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. आता आधार कार्डशी लिंक केलेला तुमचा मोबाईल नंबर टाका. यानंतर, OTP बटणावर क्लिक करा आणि येथे मोबाइलवर प्राप्त झालेला OTP प्रविष्ट करा. आता सबमिट बटण दाबा.

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply