लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल काल जाहीर झाला. मागच्या दोन लोकसभा निवडणुकींपेक्षा हा निकाल पूर्णपणे वेगळा आहे. 

Created By- Chapa Kata Team

देशातील जनतेने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमताचा कौल दिलेला नाही. 

निश्चित भाजपा देशातील सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यांचे सर्वाधिक 240 खासदार निवडून आले आहेत. 

स्वबळावर बहुमत मिळवण्यापासून भाजप 32 जागा दूर आहेत. 

पुन्हा सरकार बनवण्यासाठी त्यांना मित्र पक्षांची मदत लागणार आहे. 10 वर्षानंतर देशात पुन्हा आघाडी सरकारचा काळ सुरु होतोय. 

मी NDA मध्ये आहे आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी चाललो आहे” असं चंद्राबाबू नायडू म्हणाले.  

चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीचे 16 आणि नितीश कुमार यांच्या जेडीयूचे 12 खासदार आहेत.