You are currently viewing Chanakya Neeti Marathi : चाणाक्य नितिनुसार ‘या’ तीन गोष्टींसाठी खर्च करताना विचार करू नये
Chanakya neeti Marathi

Chanakya Neeti Marathi : चाणाक्य नितिनुसार ‘या’ तीन गोष्टींसाठी खर्च करताना विचार करू नये

मुंबई : (Chanakya Neeti Marathi) आचार्य चाणक्य हे एक महान अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी अनेक नितिशास्त्र बनवले जे आजच्या काळातही अत्यंत प्रभावी मानल्या जाते. यांचे नीतिशास्त्र जीवन योग्य मार्गाने जगण्यासाठी प्रभावी आहेत. आचार्य चाणक्य यांच्या मते दान करणे हे सर्वोत्तम कार्य आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते काही ठिकाणी दान केल्याने पैसा कमी होत नाही उलट वाढतो. काही ठिकाणी दान करताना आपला हात सढळ ठेवावा असं चाणाख्य निति सांगते. चाणक्यानुसार, व्यक्तीने या तीन ठिकाणी दान केले पाहिजे, जे फायदेशीर ठरते.

गरजूंना दान करणे

चाणक्य नीतिनुसार, जर एखाद्या व्यक्तीला पैशाची कमतरता नसेल तर त्याने या तीन ठिकाणी दान करावे. प्रथम गरजूंना दान करणे. गरजूंसाठी उदार मनाने पैसा खर्च करा. गरजू व्यक्तीसाठी करणे व्यर्थ जात नाही. आचार्य चाणक्य मानतात की या ठिकाणी पैसा खर्च केल्याने मनाला समाधान मिळते, तुमचा पैसा धार्मिक आणि सामाजिक कार्यात वापरला जातो, ज्यामुळे अंतःकरण आणि मन आतून समाधानी होते. अशाप्रकारच्या दानामुळे सकारात्मक उर्जा प्राप्त होते.

धर्माच्या नावावर पैसा खर्च करणे

आचार्य चाणक्य यांच्या मते, पैसा खर्च करण्याचे दुसरे स्थान म्हणजे धार्मिक कार्य. धार्मिक कार्यात पैसे खर्च करणे देखील योग्य मानले जाते. आचार्य चाणक्य म्हणतात की एखाद्या व्यक्तीने मंदिर किंवा धार्मिक स्थळाला दान केले पाहिजे. याशिवाय सामाजीक कार्यासाठी खर्च केल्याने पैसा सत्कारणी लागतो.

समाज आणि देशाच्या कल्याणासाठी दान करणे

आचार्य चाणक्य म्हणतात की, समाज, देश आणि सामाजिक कार्यात पैसा गुंतवला तर वाया जात नाही. या ठिकाणी पैसे गुंतवल्याने पैसे कमी होत नाहीत तर वाढतात. त्यामुळे या तीन ठिकाणी पैसे गुंतवण्याची संधी मिळेल तेव्हा ते करा असं आचार्य चाणाक्य सांगतात.

धार्मिकदृष्ट्या ‘या’ गोष्टींना मानले जाते महादान

  • अन्नदान: अन्नदानाला सळ्याच धर्मात विशेष महत्त्व आहे. गरजू लोकांना अन्नदान केल्याने त्यांचे आशिर्वाद मिळतात.
  • कपडे दान करणे : कपडे दान केल्याने गरीब आणि गरजू व्यक्तीला संरक्षण मिळते. वस्त्र दानाला सर्वच धर्मात विशेष महत्त्व आहे.
  • शिक्षण दान : शिक्षण दानातून गरीब मुलांना शिक्षणाची संधी मिळते आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होते. त्यामुळे शक्य असल्यास शिक्षणाशी संबंधीत दान अवश्य करावे.
  • आरोग्य दान : वैद्यकीय आणि आरोग्य सुविधांदांचे दान करणे धार्मिक आणि समाजीक दृष्ट्या महत्त्वाचे दान मानले जाते.
  • धार्मिक स्थळाला देणगी :  धार्मिक स्थळांच्या विकास कामासाठी मदत करते आणि धार्मिक कार्यांना समर्थन देण्यासाठी देणगी देण्याला महादान मानले जाते.
  • विद्यादान : विद्यादान केल्याने गरिबांना शिक्षणाची संधी मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
  • वन्यदान : वन्यदान नैसर्गिक संतुलन राखते आणि वन्य प्राण्यांचे संरक्षण करते.
  • जल दान : जलदानाद्वारे, सामाजिक समुदायांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मिळते.
  • रक्तदान : रक्तदानामुळे एखाद्याचा जीव वाचवू शकतो. सामाजीक आणि धार्मिक दृष्ट्या रक्तदानाला महादान मानले जाते.

आचार्य चाणाक्य यांच्या मते आर्थिक प्रगतीसाठी या गोष्टी अवश्य पाळाव्या

जर तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचायचे असेल तर तुम्ही आचार्य चाणक्याच्या धोरणांचे जीवनात पालन केले पाहिजे, असे म्हटले जाते की चाणक्य निती गरीबांनाही श्रीमंत बनवते. जाणून घेऊया चाणक्याने श्रीमंत होण्यासाठी काय सांगितले आहे.

यशस्वी होण्याचे पहिले सूत्र म्हणजे कामाबद्दल प्रामाणिकपणा. कष्ट करणाऱ्यांवर माता लक्ष्मी कृपा करते. चाणक्य नीती म्हणते की संकटाच्या वेळी लोक अनेकदा चुकतात आणि चुकीच्या मार्गावर जातात. जे कठीण प्रसंगातही आपले काम प्रामाणिकपणे करतात, त्यांची मेहनत व्यर्थ जात नाही. असे लोक लवकर श्रीमंत होतात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो आपल्या जबाबदाऱ्या योग्य वेळी पार पाडतो तो कधीही अपयशी होत नाही. असे लोक देवी लक्ष्मीला तर प्रिय असतातच पण कुबेरांचाही वरदान असतो. त्यामुळे तुमची जीवनशैली नेहमी शिस्तबद्ध ठेवा.

माणसाची कृती त्याच्या वाईट आणि चांगल्या काळाचे कारण बनते. चांगल्या काळात पदाचा किंवा पैशाचा अभिमान बाळगू नका, पण वाईट काळात संयम गमावू नका. असे करणाऱ्या व्यक्तीला कधीही दुःख होत नाही आणि त्याचे आयुष्य आनंदाने जाते.

माणसाच्या यश-अपयशात वाणी आणि वागणूक या दोन गोष्टींचा मोठा वाटा असतो. बोलण्यावर नेहमी नियंत्रण ठेवा. त्याच वेळी, एखाद्याच्या वागण्याने व्यक्तीचे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान होऊ नये याची काळजी घ्या

एखाद्या व्यक्तीने आपले ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी लक्ष केंद्रित केले पाहिजे. यामुळे व्यक्तीला ध्येय गाठण्यात मदत होते. तुम्हाला कामातही लवकर यश मिळेल.

अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s

(अस्विकरण- वरिल माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply