मुंबई : (Summer Health Tips) यावेळी उष्णतेने सर्व विक्रम तोडले आहे. संपूर्ण देश कडक उन्हाचा सामना करत आहे, उन्हामुळे लोकांचे हाल होत आहेत. अतिउष्णतेमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचीही देखील माहिती आहे. राजधानी दिल्लीतही पारा 52 च्या पुढे गेला आहे. मात्र ताज्या माहितीनुसार आता उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हा आकडा 56 च्या पुढे गेला आहे. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोकं विविध उपाय करत आहेत, मात्र या सगळ्यात पारा कितीवर थांबणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जर तापमान 60 च्या आसपास पोहोचले तर शरीर ते कसे सहन करू शकेल?
देशात उष्माघात आणि उष्णतेच्या लाटा कहर करत आहेत. थंडीची ठिकाणे सोडली तर संपूर्ण भारतच त्याच्या विळख्यात आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी येत्या काही दिवसांत कडक उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असली, तरी तीही फक्त दिल्ली आणि परिसरातच, दिल्लीत अनेक भागात पाणीटंचाई आहे. ठिकठिकाणी लोक पाण्याच्या टँकरच्या मागे धावत असल्याचे चित्र समोर आले आहे.
किती अंश सेल्सियसपर्यंत तापमान सहन करू शकते शरीर?
हे खरे आहे की मानवी शरीर सर्व प्रकारच्या हवामानाचा सामना करू शकते परंतु ते अति उष्णतेला सहन करू शकत नाही. शरीराचे सामान्य तापमान सुमारे 37 अंश सेल्सिअस (98.6 अंश फॅरेनहाइट) असते. 40 °C (104 °F) पेक्षा जास्त तापमान उच्च ताप मानले जाते आणि 41 °C (105.8 °F) ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे, ज्यासाठी तत्काळ वैद्यकीय सेवा घेणे आवश्यक आहे.
बाहेरील तापमानाबद्दल बोलायचे झाल्यास, जास्तीत जास्त तापमान किती आहे ज्यामध्ये माणूस जगू शकतो याचा कोणताही ठोस पुरावा नाही, पण त्यालाही मर्यादा आहेतच. याबाबत शास्त्रज्ञांनी काही अभ्यास केला आहे.
60 अंश सेल्सियस तापमानात काय होतं?
सामान्य परिस्थितीत, मानवी शरीर कोणत्याही समस्येशिवाय 37 अंश सेल्सिअस तापमानात जगू शकते. पण यानंतर समस्या सुरू होऊ शकते. 50 अंशांपर्यंतचे तापमान मानवी शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. जर तापमानाचा पारा केवळ 45 अंशांवर पोहोचला तर रक्तदाब कमी होऊन मूर्च्छा येणे, चक्कर येणे किंवा अस्वस्थता यासारख्या तक्रारी येऊ शकतात. या तापमानात जास्त वेळ राहिल्याने स्नायूंना नुकसान होऊ शकते आणि यामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.
ही परिस्थिती धोकादायक आहे
50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात मेंदूला इजा होते आणि पेशीही नष्ट होतात, हे आरोग्य तज्ज्ञांनीही मान्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दिल्लीस्थित थिंक टँक, सेंटर फॉर सायन्स एन्व्हायर्नमेंट सीएसईने म्हटले आहे की मानवी शरीर 36 ते 37 अंशांच्या आसपास सर्वात जास्त सक्रिय राहते, पण 50 च्या आसपास एक गंभीर समस्या निर्माण करते. जर तापमान 60 अंशांवर पोहोचले तर मेंदूच्या पेशी मरण्यास सुरवात होते.
कोणते सोपे उपाय केले जाऊ शकतात?
- तापमान वाढत असल्यास सावलीत रहा. थेट सूर्यप्रकाश टाळा
- सैल-फिटिंग, हलक्या रंगाचे कपडे घाला. हे घामाचे बाष्पीभवन होण्यास मदत करतात.
- सतत पाणी प्या. डिहायड्रेशन टाळा.
- थंड पाण्याने आंघोळ करा.
- इलेक्ट्रोलाइट युक्त पेये प्या.
- उपलब्ध असल्यास एसी किंवा कुलर वापरा .
- एकटे बाहेर पडू नका.
हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला उष्माघाताची लक्षणे जसे की चक्कर येणे, मळमळ होणे किंवा उष्णतेमुळे गोंंधळल्यासारखे होणे यांसारखी लक्षणे दिसली तर ताबडतोब थंड ठिकाणी जा, पाणी प्या आणि वैद्यकीय मदत घ्या.
नारळ पाणी प्या
जेव्हा स्वतःला हायड्रेट करण्याचा प्रश्न येतो तेव्हा त्यात नारळाच्या पाण्याचा उल्लेख नाही हे अशक्य आहे. नारळाच्या पाण्यात कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक पोषक आणि खनिजे असतात.
नारळाच्या पाण्यात असलेले गुणधर्म उष्णतेमध्ये गमावलेले द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्स पुन्हा भरतात. एवढेच नाही तर फळांच्या रसापेक्षा नारळ पाणी जास्त फायदेशीर आहे. त्यामध्ये साखर नाही किंवा त्याद्वारे कॅलरी वापरण्याचा धोका नाही. याशिवाय नारळाचे पाणी अनेक आजारांपासून आराम देते.
भरपूर पाणी प्या
या सर्व गोष्टींव्यतिरिक्त, तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुम्हाला हायड्रेटेड राहण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे लागेल. साधारणपणे एका व्यक्तीने दिवसातून २ ते ३ लिटर पाणी प्यावे.
सर्व पेय चांगले नाहीत
फार कमी लोकांना माहित आहे की सर्व पेये तुम्हाला हायड्रेट करत नाहीत. खरं तर, काही तुम्हाला डिहायड्रेट करतात, जसे गोड सोडा, कॉफी, बिअर, वाईन, लिंबूपाणी, चहा, एनर्जी ड्रिंक्स, स्मूदी आणि फ्लेवर्ड दूध इ.
या सर्व पेयांमध्ये साखर आणि मिठाच्या प्रमाणाबरोबरच इतर पदार्थही आढळतात ज्यामुळे शरीरात निर्जलीकरण होते. अशा परिस्थितीत या गोष्टींचे सेवन केल्यानंतर जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही पूर्णपणे हायड्रेटेड राहू शकाल.
इन्फ्यूस्ड वॉटर प्या
खूप साधे पाणी पिणे जरा कंटाळवाणे झाले आहे. अशा परिस्थितीत, तूम्ही इन्फ्यूस्ड वॉटर सेवन करू शकता. यासाठी, तुम्हाला फक्त लिंबू, संत्री, ब्लॅकबेरी, पुदिना, काकडी इत्यादी काही नैसर्गिक साखरयुक्त पदार्थ पाण्यात घालावे लागतील. यामुळे पाण्याची चव तर बदलेलच शिवाय तुम्ही जास्त पाणी पिऊ शकता. गेल्या काही वर्षांत, इन्फ्यूस्ड वॉटर वापराचा कल खूप वेगाने वाढला आहे.
ताजे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनल जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s