You are currently viewing Good Sleep Tips : आठ तास झोपल्यानंतरही दिवसभर सुस्ती जाणवते? ‘हे’ आहे कारण
Good Sleep Tips

Good Sleep Tips : आठ तास झोपल्यानंतरही दिवसभर सुस्ती जाणवते? ‘हे’ आहे कारण

मुंबई  : (Good Sleep Tips) निरोगी शरीर आणि चांगली झोप हे एका नाण्याच्या दोन बाजू आहे पण आजच्या काळात चांगली झोप मिळणे ही एक मोठी समस्या बनली आहे. वाईट जीवनशैली, फोनचे व्यसन आणि अंमली पदार्थांचे व्यसन यामुळे झोपेच्या संबंधीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. झोपेच्या कमतरतेमुळेही अनेक आजार होत आहेत. झोपेच्या अनियमीततेमुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि बिघडलेले मानसिक आरोग्य यांना अनेक जण बळी पडत आहेत. सोशल मीडियाच्या जमान्यात झोप न लागणे हा आजार बनत चालला आहे. त्यासाठी लोक औषधे घेतात आणि उपचारही वर्षानुवर्षे सुरू असतात. पण चांगली झोप म्हणजे काय? किती तास असावी? चांगली झोप कशी मिळेल? असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

अमेरिकन ॲकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिननुसार, एखाद्या व्यक्तीने दिवसातून किमान 8 तास झोपले पाहिजे. काहींना आठ तासांची झोप मिळणे शक्य होते तर बऱअयाच जणांना त्यापेक्षा कमी वेळेत त्यांची झोप पूर्ण करावी लागते. झोपेचा कालावधी महत्तावाचा आहे की त्याची गुणवत्ता महत्त्वाची आहे याबद्दल अनेक मत-मतांतर आहेत. जाणून घेऊया तज्ञ याबद्दल काय सांगतात.

झोपेची गुणवत्ता महत्वाची

तज्ञांच्या मते. झोपेच्या कालावधीपेक्षा झोपेची गुणवत्ता महत्त्वाची आहे. अनेक संशोधने सांगतात की सात ते आठ तासांची झोप ही सर्वोत्तम असते, पण ती प्रत्त्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते. काही लोकं 8 किंवा त्याहून कमी तास झोपतात आणि पूर्णपणे ताजेतवाने वाटतात, तर इतरांना विश्रांतीसाठी 8 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. काही लोकांची झोप 4 तासातही पूर्ण होऊ शकते.

आपली झोप ही आपण किती वेळ झोपतो यापेक्षा किती गाढ झोपतो यावर अवलंबून असते. ज्यांना गाढ झोप लागत असेल त्यांना 4 तासांची झोप पुरेशी आहे. त्यांना डीप स्लीपर म्हणतात. अशा लोकांना कमी झोपल्यानंतरही आरोग्याच्या कोणत्याही समस्या येत नाहीत, तर जे लोक सावध झोपतात त्यांना 7 ते 8 तास झोपल्यानंतरही अपूर्ण झोप येऊ शकते.

झोप समजून घेण्यासाठी, आपल्याला झोपेच्या चक्राबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

झोपेचे चक्र म्हणजे काय?

झोपेचे चक्र म्हणजे झोपेचे पूर्ण चक्र. यात झोपेपासून उठण्यापर्यंत अनेक टप्पे असतात. हलक्या झोपेपासून सुरुवात होते. अंथरुणावर झोपल्यानंतर झोपेची भावना सुरू होते तेव्हा हा टप्पा सुरू होतो. यामध्ये झोप उकल राहते आणि डोळ्यांच्या बाहुल्या हलतात. या अवस्थेत मेंदूमध्ये कोणतीही क्रिया होत नाही.

या अवस्थेचे तास व्यक्तीपरत्वे बदलू शकतात. सहसा, या अवस्थेपासून 2 तासांनंतर शरीर पुढील टप्प्यावर जाण्याची तयारी करू लागते. या काळात डोळ्यांची हालचाल मंदावते आणि हृदय गतीही सामान्य होऊ लागते. येथून दुसरा टप्पा सुरू होतो.

दुसरा टप्पा

दुसरा टप्पा म्हणजे गाढ झोप. यामध्ये मेंदू शांत राहतो आणि गाढ झोप लागते. जो माणूस दीर्घकाळ गाढ झोपेत असतो, त्याला कमी तास झोपल्यानंतरही पूर्ण झोप लागते. या अवस्थेत झोपेत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नाही. या काळात कोणत्याही प्रकारची स्वप्ने पडत नाहीत.

शेवटचा टप्पा

शेवटच्या टप्प्याला REM SLEEP म्हणतात. या अवस्थेत झोपेचा टप्पा पूर्ण होत आहे. यामध्ये व्यक्ती स्वप्न पाहते. स्वप्नांमुळे डोळ्यांच्या बाहुल्या इकडे तिकडे फिरतात, ही वेळ दोन तासांपर्यंत टिकू शकते.

प्रत्येक टप्प्यासाठी वेगवेगळ्या वेळा

गाढ झोप, हलकी झोप आणि आरईएम या तीन टप्प्यांसाठी लागणारा वेळ प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. जे लोक दीर्घकाळ हलकी झोप घेतात, त्यांना 7 ते 8 तास झोपल्यानंतर पूर्ण वाटते, तर जे लोक दीर्घकाळ गाढ झोपेत असतात, त्यांची झोप 4 तासांच्या झोपेनंतरच पूर्ण होऊ शकते. जे लोक REM स्टेजमध्ये म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात दीर्घकाळ राहतात त्यांना कधीकधी असे वाटू शकते की त्यांना 8 तास झोपल्यानंतरही पुरेशी झोप मिळत नाही.

झोपेचे चक्र समजून घ्या

झोप समजून घेण्यासाठी, तुमच्या झोपेच्या चक्राबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. रात्री 10 ते 11 च्या दरम्यान झोपल्यानंतर तुमचे डोळे 6 वाजता उघडले तर याचा अर्थ तुमची झोप पूर्ण झाली आहे. अशा स्थितीत पुन्हा झोपू नये. असे केल्याने, शरीर पुन्हा झोपेच्या दुस-या चक्रात जाऊ लागते आणि या काळात, जर तुम्ही पुन्हा 8 किंवा 9 वाजण्याच्या दरम्यान उठलात तर तुमची झोप खंडित होते. यामुळेच काही लोकांना 8 ते 9 तास झोपल्यानंतरही फ्रेश वाटत नाही.

गाढ झोपेसाठी काय करावे

  • वेळेवर झोपण्याची सवय लावा
  • दररोज व्यायाम करा
  • आरामदायी गादी आणि उशा वापरा
  • रात्री दारू, चहा किंवा कॉफी पिऊ नका
  • झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा.

अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s

(अस्विकरण- वरील लेख माहितीच्या हेतूने देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Nitish Gadge

आठ वर्षांपासून पत्रकारीतेत सक्रिय कार्यरत आहे. माझा विदर्भ, जीटीपीएल, महाराष्ट्र टुडे, तरूण भारत, नवराष्ट्र आणि tv9 मराठी या संस्थांमध्ये डिजीटल विभागात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Leave a Reply