मुंबई : (Vat Savitri 2024 Date) वट सावित्री हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. विवाहित महिला या दिवशी आपल्या पतीच्या दिर्घ आयुष्यासाठी व्रत करतात. यंदा वट सावित्री 21 जून 2024 ला साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रात वट सावित्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. तसेच वटसावित्रीची कथा वाचतात. वट सावित्रीच्या व्रताची कथा जाणून घेऊया.
वट सावित्रीची कथा
पौराणिक कथेनुसार, मद्रदेशावर अश्वपती नावाच्या राजाचे राज्य होते. राजा धार्मिक होता. त्यांना मूलबाळ नव्हते. मूल होण्यासाठी राजाने एक यज्ञ केला, त्यामुळे काही काळानंतर त्याला मुलगी झाली, या मुलीचे नाव सावित्री ठेवले गेले. जेव्हा सावित्री विवाहास पात्र ठरली तेव्हा तिने द्युम्तसेनचा मुलगा सत्यवान याला पती म्हणून निवडले. सत्यवानाचे वडील सुद्धा राजा होते पण त्यांचे सिंहासन हिसकावून घेण्यात आले, त्यामुळे ते गरिबीत जगत होते. सत्यवानच्या आई-वडिलांचीही दृष्टी गेली. सत्यवान जंगलातून लाकूड तोडून विकून आपला उदरनिर्वाह करत असे.
जेव्हा सावित्री आणि सत्यवानाच्या लग्नाची चर्चा होती तेव्हा नारद मुनींनी सावित्रीचे वडील राजा अश्वपती यांना सांगितले की सत्यवानाचे आयुष्य कमी आहे आणि लग्नाच्या एका वर्षातच त्याचा मृत्यू होईल. त्यानंतर सावित्रीच्या वडिलांनी तिची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला पण हे सगळं कळल्यावरही सावित्री आपल्या निर्णयावर ठाम राहिली. शेवटी सावित्री आणि सत्यवान यांचा विवाह झाला. यानंतर सावित्रीने सासू, सासरे आणि पतीची सेवा सुरू केली.
वेळ निघून गेली आणि नारद मुनींनी सत्यवानाच्या मृत्यूचे भाकीत केले होते तो दिवस आला. त्याच दिवशी सावित्रीही सत्यवानासह जंगलात गेली. सत्यवान जंगलात लाकूड तोडण्यासाठी झाडावर चढू लागताच त्याच्या डोक्यात असह्य वेदना होऊ लागल्याने तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. काही वेळातच यमराज अनेक दूतांसह त्यांच्यासमोर उभे राहिले. यमराज सत्यवानाच्या आत्म्याने दक्षिणेकडे चालू लागले, सावित्रीही त्यांच्या मागे चालू लागली.
पुढे जाऊन यमराज सावित्रीला म्हणाले, हे भक्त स्त्री! तुम्ही तुमच्या नवऱ्याला माणसाने जेवढे आधार देता येईल तेवढे समर्थन दिले आहे, आता तुम्ही परत जा. यावर सावित्री म्हणाली, ‘माझा नवरा जाईल तिथे मी त्याच्या सोबत जाईल. सावित्रीचे बोलणे ऐकून यमराज प्रसन्न झाले आणि तिला तीन वरदान मागायला सांगितले. सावित्री म्हणाली, ‘माझी सासू आणि सासरे आंधळे आहेत, त्यांना दृष्टी द्या.’ यमराज ‘तथास्तू’ म्हणाले त्यानंतर सावित्रीने वरदान मागितले, ‘माझ्या सासऱ्यांना त्यांचे हरवलेले राज्य परत मिळो.
यानंतर सावित्रीने यमदेवाकडे वर मागितले, ‘मला सत्यवानाच्या पुत्राची आई व्हायचे आहे. यमराज सावित्रीला तथास्तू म्हणाले, त्यानंतर सावित्री यमराजाला म्हणाली की, जर तूम्ही माझ्या पतीचा जीव घेतला आहे, तर माझे पुत्रप्राप्तीचे वरदान कसे पूर्ण होईल. तेव्हा यमदेवाने शेवटचे वरदान देऊन सत्यवानाच्या आत्म्याला फासातून मुक्त केले. जेव्हा सावित्री त्याच वटवृक्षावर परतली तेव्हा तिला वडाच्या झाडाखाली पडलेला सत्यवानाचा मृतदेह जिवंत झाल्याचे दिसले. काही वेळाने सत्यवान उठून बसला. दुसरीकडे, सत्यवानच्या आई-वडिलांचे डोळेही बरे झाले आणि त्यांचे गमावलेले राज्यही परत मिळाले. अशी ही वटसावित्रीची पौराणिक कथा आहे.
वटवृक्षात असतो तीन देवांचा वास
धार्मिक मान्यतेनुसार, विवाहित स्त्री या दिवशी व्रत पाळते आणि वटवृक्षाची पूजा करते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच कुटुंबात सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव वडाच्या झाडात वास करतात असे मानले जाते. वट सावित्री व्रतामुळे घरात सुख-समृद्धी येते आणि प्रलंबित कामे पूर्ण होतात.
या तीन गोष्टी प्रसाद म्हणून द्यायला विसरू नका
ज्येष्ठ महिन्यात पाळण्यात येणारे हे व्रत कडाक्याच्या उन्हामुळेही कठीण आहे. उष्णता शिगेला असल्याने. पूजेच्या शुभ मुहूर्तावर विधीनुसार पूजा झाल्यानंतर महिला कथा ऐकतात. पूजेमध्ये हंगामी फळे, पक्वान्न, हरभरा इत्यादी अर्पण केले जातात. उपवास करणारी महिला वडाला पाणी अर्पण करण्यासाठी डोक्यावर कलश ठेवून वड पूजायला जाते.
वट सावित्री व्रत शुभ मुहूर्त
ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी 05 जून 2024 रोजी संध्याकाळी 06:24 वाजता सुरू होईल. तसेच, ही तारीख 06 जून रोजी दुपारी 04:37 वाजता संपेल. अशा परिस्थितीत हिंदू कॅलेंडरनुसार वट सावित्री व्रत गुरूवार, 06 जून रोजी पाळण्यात येणार आहे.
या पद्धतीने पूजा करावी
वट सावित्री व्रताच्या दिवशी सर्व विवाहित महिलांनी प्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर जरी काठाची साडी नेसावी आणि श्रृंगार करावा. या दिवशी वटवृक्षालची जागा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.
यानंतर वटवृक्षाला जल अर्पण करून उदबत्ती, आणि दिवा लावावा. आता कच्चा धागा गुंडाळून सात वेळा वटवृक्षाभोवती प्रदक्षणा मारावी. शेवटी वट सावित्री व्रताची कथा ऐकावी. पूजेनंतर फळे, फुले, धान्य, कपडे इत्यादी टोपलीत ठेवा आणि ब्राह्मणाला दान करा.
अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s
(अस्विकरण- वरिल माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)