मुंबई : (Interesting Facts About Monalisa) ‘मोनालिसा’ हे जगातील सर्वात रहस्यमय, महागडे आणि प्रसिद्ध पेंटिंग मानले जाते. आत्तापर्यंत या चित्रकलेबद्दल सर्वाधिक लिहिले, वाचले आणि संशोधन झाले आहे. हे पेंटिंग प्रसिद्ध चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी सुमारे 500 वर्षांपूर्वी बनवले होते, त्यांनी हे पेंटिंग 1503 मध्ये बनवण्यास सुरुवात केली आणि 14 वर्षांनंतर ही पेंटिंग पूर्ण झाले. आज आपण या पेंटींगबद्दल काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे ते सर्वात रहस्यमय आणि लोकप्रिय मानले जाते.
फक्त ओठ बनवण्यासाठी लागली 12 वर्षे
मोनालिसा म्हणजे माय लेडी. हे केवळ एक चित्रच नाही तर स्वतःमध्ये एक रहस्य देखील आहे. या चित्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे स्मितहास्य. यावर आतापर्यंत अनेक संशोधने झाली आहेत. मोनालिसाच्या पेंटिंगच्या चेहऱ्यावरचे हास्य प्रत्येक कोपऱ्यातून वेगवेगळ्या कोनातून दिसते. प्रथम ते अधिक दृश्यमान होते, नंतर हळूहळू ते कोमेजणे सुरू होते आणि शेवटी ते पूर्णपणे अदृश्य होते. मोनालिसाचे फक्त ओठ तयार करण्यासाठी लिओनार्डो दा विंचीला 12 वर्षे लागली.
मोनालिसासाठी दिला जीव
लुक मास्पेरो या फ्रेंच कलाकाराने 23 जून 1852 रोजी पॅरिसच्या हॉटेलच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली. मोनालिसाच्या गूढ हास्य आणि सौंदर्याने तो वेडा झाला होता. त्याने त्याच्या सुसाईड नोटमध्ये मोनालिसाच्या प्रेमात वेडे असल्याचे लिहिले होते. एवढेच नाही तर संग्रहालयात या पेंटिंगसाठी अनेक प्रेमपत्रे आणि फुलेही पाहायला मिळतात. मोनालिसाच्या प्रेमात वेडे झालेले लोक आपली प्रेमपत्रे समोर ठेवून जातात.
पेंटींग बनवायला लागली 14 वर्षे
लिओनार्डो दा विंची यांना हे पेंटिंग बनवण्यासाठी 14 वर्षे लागली. त्यांनी 1503 मध्ये ते रेखाटण्यास सुरुवात केली आणि 1517 मध्ये ते पूर्ण केले. हे पेंटिंग बनवण्यासाठी 30 हून अधिक थरांचा वापर करण्यात आला. त्यातील काही मानवी केसांपेक्षा बारीक होते. पेंटिंग मोठे दिसत असले तरी ते अगदी लहान आहे. ते 30 बाय 21 इंच आणि वजन 8 किलोग्रॅम आहे. ते कागदावर किंवा कॅनव्हासवर नव्हे तर चिनार लाकडावर ऑइल पेंटने बनवले गेले आहे.
चोरीनंतर प्रसिद्ध झाले पेंटिंग
हे पेंटिंग सुरुवातीला फारसे प्रसिद्ध नव्हते, पॅरिसमधील रेस लोब म्युझियममधून चोरीला गेल्यावर त्याला प्रसिद्धी मिळाली. 21 ऑगस्ट 1911 रोजी एवढ्या मोठ्या संग्रहालयातून एका पेंटिंगची चोरी ही मोठी गोष्ट होती. चोरी झाल्यानंतर पहिला संशय चित्रकार पाब्लो पिकासोवर आला, पण त्याची चौकशी केल्यानंतर हा आरोप त्याच्याकडून काढून घेण्यात आला. बरेच संशोधन केल्यानंतर असे आढळून आले की ते संग्रहालयातील कर्मचारी विन्सेंझो पेरुगिया याने चोरले होते. त्याला हे पेंटिंग पुन्हा इटलीला घेऊन जायचे होते. हा इटलीचा वारसा आहे, असं त्याचं म्हणणं होतं. काही काळ इटलीमध्ये ठेवल्यानंतर ते संग्रहालयात परत करण्यात आले. यासाठी व्हिन्सेंझोला 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु इटलीच्या लोकांनी यासाठी त्याला देशभक्त मानले.
मोनालिसाची ट्विन पेंटिंग देखील आहेत
असे मानले जाते की लिओनार्डो दा विंचीचा विद्यार्थी फ्रान्सिस्को मेलझी याने मोनालीसाचे हुबेहुब पेंटींग बनवले होते. हे स्पेनची राजधानी माद्रिदमधील म्युझिओ डी प्राडोमध्ये ठेवण्यात आले आहे. 1514-1516 च्या दरम्यान, त्याच्या एका विद्यार्थ्याने मोनालिसाची नग्न आवृत्ती देखील तयार केली. ज्यांच्या हातांची आणि शरीराची स्थिती मूळ पेंटिंगसारखी आहे. त्याला मोन्ना व्हन्ना म्हणतात. असे म्हटले जाते की हे पेंटिंग देखील लिओने बनवले असावे.
मोनालिसा अजूनही एक रहस्य आहे
मोनालिसा कोणती महिला आहे, हे अद्याप एक रहस्य आहे. लिओनार्डो दा विंची हे चित्रकार तसेच लेखक होते, परंतु त्यांनी या चित्रकलेबद्दल कधीही काहीही लिहिले नाही. तसेच ही महिला कोण आहे, हे चित्र कोणाचे आहे हेही सांगितले गेले नाही. काही संशोधकांचा असा विश्वास आहे की हे चित्र फ्लोरेन्स येथील लिसे घेरार्डिनी या इटालियन महिलेचे आहे. काही लोक म्हणतात की या पेंटिंगमध्ये त्यांनी स्वत: ला एक स्त्री बनवले होते.
पेंटींगला हानी पोहचवण्याचे अनेक प्रयत्न झाले
जेव्हा दुसरे महायुद्ध सुरू होते तेव्हा लोकांनी अनेक वेळा हानी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मोनालिसाची पेंटिंग 6 वेळा बदलली गेली. जेणेकरून ते जर्मन लोकांच्या हाती लागू नये. या पेंटिंगचे नुकसान करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. एकदा 1956 मध्ये, एका पर्यटकाने त्यावर दगड फेकले, ज्यामुळे त्याच्या डाव्या हातावर एक खूण झाली, जी नंतर दुरुस्त करण्यात आली. एवढेच नाही तर एका व्यक्तीने त्यावर ॲसिड फेकले होते. त्यानंतर ते बुलेट प्रूफ फ्रेममध्ये ठेवण्यात आले होते. त्यावर एका महिलेने लाल रंगाचा स्प्रे केला होता. या पेंटिंगची किंमत सुमारे 867 दशलक्ष डॉलर्स आहे, ज्याची भारतात किंमत सुमारे 6.4 हजार कोटी रुपये आहे.