मुंबई : (Who is Murlikant Petkar) कुठलाही चित्रपट रिलीज होण्याआधी त्याचा ट्रेलर रिलीज केला जातो. दोन तासाचा चित्रपट कसा असेल याची झलक ट्रेलरवरून प्रेक्षकांना मिळते. रणवीर कपूर आणि बॉबी देओल यांचा नुकताच धुमाकुल घातलेला चित्रपट ‘अॅनिमल’ हा फक्त त्याच्या ट्रेलरमुळे इतका चालला. साजिद नाडियावाला यांचा ‘चंदू चॅम्पियन’ (Chandu Champion) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच जारी करण्यात आला आहे. हा चित्रपट 2024 चे सर्व रेकॉर्ड तोडणार असा दावा केला जात आहे. मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारीत हा बायोपीक आहे. कार्तीक आर्यन याने मुरलीकांत पेटकर यांची भूमीका साकारली आहे.
कोण आहेत मुरलीकांत पेटकर?
- मुरलीकांत यांचा जन्म 1944 साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच खेळाकडे त्यांचा कल होता.
- सप्टेंबर 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मुरलीकांत यांना नऊ गोळ्या लागल्या होत्या. पाकिस्तानने भारतावर केलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान पेटकर यांच्या मांडीला, गालावर आणि कवटी असा एकूण नऊ गोळ्या लागल्या होत्या. दरम्यान, सैन्याची जीपसुद्धा त्यांच्या अंगावरून गेली.
- या घटनेनंतर मुरलीकांत यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यांना दिव्यांग घोषित करण्यात आले, पण त्यांनी हार मानली नाही.
- मुरलीकांत यांना जलतरणात आपली कारकीर्द घडवली आणि 1972 मध्ये जर्मनीमध्ये झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.
- मुरलीकांत यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. त्यांना सन्मान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. 1982 मध्ये त्यांनी अर्जुन पुरस्कारासाठी अर्ज केला, पण तो नाकारण्यात आला.
- जर्मनीतील हेडलबर्ग येथे झालेल्या 50 मीटर फ्री स्टाईलमध्ये त्यांनी 37.33 सेकंद वेळेसह इतिहास रचला. भालाफेक आणि स्लॅलममध्येही ते सहभागी झाले होते. पेटकर तिन्ही स्पर्धेत अंतिम फेरीत होते.
- तेल अवीव, इस्रायल येथे 1968 च्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांची निवड झाली. या काळात टेबल टेनिसमध्ये मुरलीकांत पेटकर दुसऱ्या क्रमांकावर राहिला. नंतर ते पुण्यात एका टेल्कोमध्ये नोकरीला होते. 2018 मध्ये मुरलीकांत पेटकर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नुकताच रिलीज झाला चंदू चॅम्पियनचा ट्रेलर
सहसा चित्रपटाचा ट्रेलर त्याच्याबद्दल उत्सुकता निर्माण करते मात्र चंदू चॅम्पियन या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याचं सगळं सिक्रेट फोडलं असल्याचं प्रेक्षकांचं मत आहे. चित्रपटात मुर्लीकांत पेटकर यांचा जीवन प्रवास दाखवला आहे. लहानपणापासून त्यांचं कुस्ती आणि बॉक्सींगमध्ये चॅम्पियन बनण्याचं स्वप्न असतं. शाळेतले मुलं त्यांची टिंगल करतात. त्यांना चंदू चॅम्पीयन या नावाने चिडवले जाते.
त्यानंतर ते गावातचं काही कुस्ती स्पर्धेत भाग घेतात. त्यानंतर त्यांना उच्च स्थरावर स्पर्थेत भाग घेण्यासाठी सैन्यात जाण्याबद्दल त्यांचा मित्र सांगतो. यानंतर त्यांचा सैन्य दलातला प्रवास दाखवण्यात आला आहे. त्यांना 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धात गोळ्या लागतात असंही दाखवण्यात आलं आहे.
1965 च्या युद्धात मला नऊ गोळ्या लागल्या, त्यामुळे मी अपंग झालो. नऊपैकी एक गोळी अजूनही माझ्या पाठीत आहे.
असे 1972 च्या जर्मनी पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे मुरलीकांत पेटकर यांनी म्हटले आहे. सध्या ते महाराष्ट्रातील पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात राहतात. पेटकर यांनी आपल्या देशासाठी केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही तर पॅरालिम्पिक जलतरणात विश्वविक्रमही केला. देश आणि क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान पाहून भारत सरकारने 2018 साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले.
मुरलीकांत पेटकर हे महाराष्ट्रातील सांगली-इस्लामपूरचे रहिवासी होते. त्यांना लहानपणापासूनच कुस्तीचे वेड होते. रिंगणात दंगल लढवताना त्याने आपल्या गावच्या सरपंचाच्या मुलाचा पराभव केला होता आणि त्यामुळे रागाच्या भरात सरपंचाने त्याला वयाच्या 13-14 व्या वर्षी गाव सोडण्यास भाग पाडले. तो गाव सोडून पुण्याला आला. तो पुण्यात राहत असलेल्या महिलेने मुरलीकांतला शाळेत प्रवेश मिळवून दिला. नंतर त्याच्या मावशीच्या पतीने त्याला ‘आर्मी बॉईज’ (सैन्य प्रशिक्षण देणारी कंपनी) मध्ये दाखल केले.
बॉक्सिंगपासून सुरुवात केली
सुरुवातीला त्याने सैन्यात हॉकी खेळायला सुरुवात केली. पण जेव्हा त्याची अंतिम संघात निवड होऊ शकली नाही. त्यानंतर त्याने बॉक्सिंगला सुरुवात केली. मुरलीकांतने बॉक्सिंगमध्ये अनेक पदके जिंकली. 1964 मध्ये जपानमध्ये झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेतही त्याने रौप्यपदक पटकावले होते. पण 1965 च्या भारत-पाक युद्धाने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले.
जीवन कसे बदलले आहे?
ऑक्टोबर 1965 ची गोष्ट आहे. संध्याकाळी चारच्या सुमारास भारत-पाकिस्तान सीमेवर एक शिट्टी वाजवण्यात आली. वास्तविक ही शिट्टी युद्धाच्या सुरुवातीची होती. पण तिथे उपस्थित सैनिकांनी ही चहाची शिट्टी आहे असे समजून सर्वजण चहा पिण्यासाठी बाहेर पडले. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी पाहिले की वरून लढाऊ विमानांकडून जोरदार गोळीबार होत आहे. सैनिकांनी ताबडतोब आपली पोझिशन घेतली आणि हल्ला करण्यासाठी सज्ज झाले. या सैनिकांमध्ये मुरलीकांत पेटकर यांचाही समावेश होता. शत्रूशी लढत असताना मुरलीकांत एका डोंगरावर आला आणि अचानक त्यांच्या डोक्यात आणि पाठीला गोळी लागली. तो जखमी होऊन खाली पडला आणि त्याचवेळी एक वाहन त्याना धडकले. ते तिथेच बेशुद्ध पडले.
पराभव स्वीकारला नाही
मुरलीकांत जवळपास दोन वर्षे कोमात राहिले. स्मरणशक्ती कमी झाल्यामुळे त्यांना सुरुवातीला आपले नावही आठवत नव्हते, पण त्यांनी मृत्यूशी लढाई जिंकली. दुर्दैवाने ते आयुष्यभरासाठी अपंग झाले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईतील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना पायांचा व्यायाम करण्यासाठी पोहायला आणि खेळ खेळण्याचा सल्ला दिला. आणि इथूनच त्यांचा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा प्रवास सुरू झाला. या काळात पोहण्याबरोबरच त्यांनी अनेक खेळांमध्येही हात आजमावला.
अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s
(स्रोत- विकिपीडीया)