मुंबई : (Why Shawarma Causes Death Marathi) मुंबईच्या मानखुर्दमध्ये रस्त्यावरचा चिकन शॉर्मा खाल्याने एका 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. याशिवाय काही जाणांना विषबाधा झाल्याचेही सांगण्यात येत आहे. यानिमीत्त्याने निकृष्ट दर्जाच्या ‘स्ट्रिट फुड’चा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई असो किंवा इतर शहरं सध्या स्ट्रिट फुडला प्रचंड मागणी आहे. याच कारणाने रोज नवीन कोणीतरी आपली हातगाडी लावून धंदा थाटतोय. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता फक्त झगमगाट पाहून अनेक जण चमचमीत पदार्थांवर ताव मारतात. तुम्हीसुद्धा यापैकीच एक असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे.
दर्जा की किंमत? कशाला प्राधान्य देता?
महागाईच्या तुलनेत रस्त्याच्या कडेला गाडीवर मिळणारे पदार्थ हे कायमच स्वस्त असतात. एखाद्या स्वच्छ आणि नामांकीत रेस्टोरंटमध्ये जी डिश ज्या किंमतीला मिळते त्याच्या अर्ध्या किंवा त्याहूनही कमी किंमतीत ती हातगाडीवर मिळते. पैसे वाचवण्यासाठी दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्याची संख्या खुप मोठी आहे.
अनेकांना रस्त्यावरचं खाणं फारसं आवडत नसलं तरी खिशाला परवडत नसल्यानं ते आवडून घ्यावं लागतं. याशिवाय अनेकांना काही नाईलाजास्तव बाहेचं खावं लागतं अशात रोजरोज चांगल्या ठिकाणचं महागडं खाणं टाळण्याकडेचं भर असतो.
सहाजीक गोष्ट आहे एखाद्या पदार्थ दर्जेदार बनवण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा मालसुद्धा दर्जात्मकच असावा लागतो. ज्या पदार्थांचा दर्जा किंवा गुणवत्ता चांगली ते बनवण्यासाठी खर्चही तितकाच येतो, पण आपल्याकडे एक मानसीकता आहे, ती म्हणजे कमी पैशात चांगलं आणि दर्जेदार मिळालं पाहिजे. खरंच हे शक्य आहे का? की स्वतःचं समाधान करण्यासाठी आपण ते मानतोय आणि स्वतःच्याच आरोग्याशी खेळ करतोय?
अशा प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी व्हाट्स अप चॅनलला जॉइन करा- https://whatsapp.com/channel/0029VadLYkIE50Uaa2sD712s
रस्त्यावरचा शॉर्मा खावून मृत्यू झाल्याची जी घटना घडली ती काही पहिलीच नाही. अशा विषबाधेच्या घटना घडतच राहतात. आपण अशा बातम्या ऐकतो, वाचतो पण कुठेतरी आपल्यातही एक ‘स्ट्रिट फुड लव्हर’ दडला असल्यानं अशा बातम्या आणि त्याच्या गांभिर्याकडे कानाडोळा करतो. आपल्यासोबत घडलं नाही ना? मग ठिक आहे. काही लोकांना कळत नाही कुठंलं खावं ते, असं म्हणून बाकीच्यांना मुर्खात काढलं की आपलं काम झालं.
इंस्टाग्राम, युट्यूब किंवा फेसबुकचे फिड उघडल्यावर स्ट्रिट फुडचे ठिगभर रिल्स आपण पाहतो. अनेक फुड ब्लॉगर फक्त व्ह्युज वाढवण्यासाठी नको त्या थापा मारत या ठेलेवाल्यांना प्रसिद्ध करतात. यांच्या कच्च्या मालाचा दर्जा, स्वच्छता आणि कोणकोणत्या गोष्टींशी तडजोड करून हे खाद्य पदार्थ बनवतात याचं ‘फॅक्ट चेक’ कोणीच दाखवत नाही. ब्लॉगरच्या रिलला व्ह्युज मिळतात आणि ते ठिकाण आपल्या शहरातलं असेल तर आपणही तीथे न जाण्याचा मोह आवरू शकत नाही.
स्ट्रीट फुड खाल्याने कोणकोणत्या समस्या उद्भवू शकतात?
पोटाशी संबंधीत तक्रारी
घरचे स्वच्छ अन्न खाल्ल्याने पोटच नाही तर मनही तृप्त होते. जर तुम्ही दररोज बाहेरचे अन्न खाल्ले तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. फूटपाथवर शिजवलेल्या अन्नामुळे पोटात संसर्ग म्हणजेच इंन्फेक्शन होऊ शकते. हे अन्न पुन्हा पुन्हा त्याच तेलात घाण पाण्याने तयार केले जाते. मसाल्यांसह प्रत्येक पदार्थात भेसळ असते.
कर्करोग
फूटपाथवर तयार केलेले अन्न खाल्ल्याने कर्करोगासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. हे अन्न दीर्घकाळ तळलेले असते आणि त्यामध्ये धूळ देखील असते ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. फूटपाथवर बनवलेले पकोडे आणि समोसे तुम्ही अनेकदा पाहिले असतील. हे बऱ्याच वेळा तळले जातात आणि उघडेही ठेवले जातात, जे आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.
रक्तातील साखर आणि मधुमेह
फूटपाथवर बनवल्या जाणाऱ्या बहुतेक पदार्थांमध्ये पिठाचा वापर केला जातो. पीठ हे आरोग्यासाठी विष मानले जाते. पिठामुळे रक्तातील साखरेपासून ते मधुमेह आणि हृदयविकारापर्यंत गंभीर समस्या उद्भवू शकतात.
उच्च रक्तदाब
फूटपाथवर शिजवलेल्या अन्नामध्ये भरपूर मीठ असते. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा धोका संभवतो. बाहेरचे खाल्ल्याने ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय फूटपाथवर शिजवलेल्या अन्नातूनही जलजन्य संसर्ग होऊ शकतो. यात डायरिया आणि कॉलरा यांचा समावेश होतो.
अन्न ही रोजची गरज
आपले आरोग्य हे पूर्णपणे आपल्या आहारावर अवलंबून आहे. अन्न ही आपली रोजची गरज आहे. किमान दोन वेळा तरी प्रत्येकाला अन्न हे लागतंच. मग असं असतांना आपल्याला भूक लागण्याआधी त्याची सोय करणे कठीण का जाते? वेळेचं नियोजन तेही ज्यासाठी अनेक जण बारा-बारा तास राबतात त्या अन्नासाठी करणे खरंच इतकं कठीण आहे का? की ऑनलाईन फुड डिलेव्हरीच्या काळात स्वयंपाकाचं नियोजन म्हणजे वेळेचा अपव्यय असं समजुन आपण चालतोय? यापैकी एका प्रश्नाचं उत्तर जरी प्रामाणिकपणाणं स्विकारलं तरी मोठ्या संभाव्य धोक्यापासून आपण वाचू शकतो.
Liquor Policy Scam : असा आहे मद्य घोटाळा ज्यामुळे केजरीवाल फसले